सत्यनारायणाच्या पुजेसमोर काढा ८ रांगोळ्या; सुंदर सोपी नक्षी-शोभून दिसेल कार्यक्रमात
Updated:January 24, 2026 14:44 IST2026-01-23T16:10:23+5:302026-01-24T14:44:16+5:30
Satyanarayan Rangoli Designs : पुजेच्या ठिकाणी कमळाची रांगोळी काढणं अत्यंत शुभ मानले जाते. किंवा केळीची पानंही तुम्ही रांगोळीत काढू शकता.

सत्य नारायणची पूजा ही अत्यंत पवित्र आणि मंगलमयी मानली जाते. या पुजेमध्ये घराची सजावट आणि विशेषत: रांगोळीला खूपच महत्व आहे. कारण रांगोळी ही मांगल्याचे आणि स्वागताचे प्रतिक आहे. (Satyanarayan Rangoli Designs)
सत्यनारायणाची पूजा ज्या चौरंगावर मांडली जाते. त्याच्य चारही बाजूंनी सबुक रांगोळी काढली जाते. फुलांच्या आणि पानांच्य नाजूनक वेली काढल्या जातात.
पुजेच्या ठिकाणी कमळाची रांगोळी काढणं अत्यंत शुभ मानले जाते. किंवा केळीची पानंही तुम्ही रांगोळीत काढू शकता.
जर तुम्हाला रंगांची रांगोळी आवडत नसेल तर झेंडूची फुलं आणि गुलाबाच्या पाकळ्या वापरून तुम्ही आकर्षक डिझाईन्स काढू शकता.
सत्यनारायण पुजेत पिवळ्या रंगाला प्राधान्य द्या. कारण तो भगवान विष्णूंचा आवडता रंग आहे.
रांगोळी पूर्ण झाल्यावर त्याच्या बाजूला पाच छोटे ठिपके ठेवण्याची प्रथा आहे.
जर तुम्ही नवशिके असाल तर साध्या ठिपक्यांच्या रांगोळीनं सुरूवात करा आणि त्यात रंग भरा.
यात तुम्ही सुस्वागतम असा मेसेज लिहू शकता. तसंच स्वास्तिक, कलश, दिवे काढू शकता.