kangana ranaut Controversial Statement : दुसरा गाल दिल्याने भिक मिळते, स्वातंत्र्य नाही! कॉट्रोवर्सी क्विन कंगनानं आतापर्यंत केलीत 'ही' वादग्रस्त वक्तव्य

Published:November 18, 2021 05:59 PM2021-11-18T17:59:34+5:302021-11-18T19:57:36+5:30

Kangana Ranaut Controversial Statement : स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाल्याच्या वक्तव्यानंतर कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेत्यांनी केली .

kangana ranaut Controversial Statement : दुसरा गाल दिल्याने भिक मिळते, स्वातंत्र्य नाही! कॉट्रोवर्सी क्विन कंगनानं आतापर्यंत केलीत 'ही' वादग्रस्त वक्तव्य

आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक लेख शेअर केला आहे. त्याच्या मथळ्यात असे लिहिले आहे की, ‘तुम्ही एकतर गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक. कंगना याआधी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होती.

kangana ranaut Controversial Statement : दुसरा गाल दिल्याने भिक मिळते, स्वातंत्र्य नाही! कॉट्रोवर्सी क्विन कंगनानं आतापर्यंत केलीत 'ही' वादग्रस्त वक्तव्य

स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाल्याच्या वक्तव्यानंतर कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेत्यांनी केली तर स्वातंत्र्यावर बोलण्याची कंगनाची औकात नाही', राजू शेट्टींचा सणसणीत टोला लगवला.

kangana ranaut Controversial Statement : दुसरा गाल दिल्याने भिक मिळते, स्वातंत्र्य नाही! कॉट्रोवर्सी क्विन कंगनानं आतापर्यंत केलीत 'ही' वादग्रस्त वक्तव्य

तांडव या वेब सीरिजवरुन अभिनेत्री कंगना रणौत हिनं आता संताप व्यक्त करत त्या वेब सीरिजमध्ये ती दृश्ये जाणूनबुजून टाकल्याचं म्हटलं होतं त्यामुळे ती वादात सापडली. ''समस्या केवळ हिंदू फोबिक कंटेंटची नाही. हे रचनात्मकपणेही खराब आहे. प्रत्येक पातळीवर ते आपत्तीजनक आहे. यासाठीच जाणूनबुजून वादग्रस्त दृश्ये ठेवण्यात आली आहेत. त्यांना ना केवळ गुन्हाच्या पार्श्वभूमीवर तर प्रेक्षकांना टॉर्चर केल्यामुळेही तुरुंगात टाकलं पाहिजे," असं कंगना म्हणाली होती.

kangana ranaut Controversial Statement : दुसरा गाल दिल्याने भिक मिळते, स्वातंत्र्य नाही! कॉट्रोवर्सी क्विन कंगनानं आतापर्यंत केलीत 'ही' वादग्रस्त वक्तव्य

मुंबईचा उल्लेख ‘पाकव्याप्त काश्मीर’ असा केल्यानंतर कंगनाविरोधात वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार करण्यात आली होती. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कंगनाने केल्याचा आरोप करण्यात आला होता.

kangana ranaut Controversial Statement : दुसरा गाल दिल्याने भिक मिळते, स्वातंत्र्य नाही! कॉट्रोवर्सी क्विन कंगनानं आतापर्यंत केलीत 'ही' वादग्रस्त वक्तव्य

इतकंच नाही तर शेतकरी आंदोलनाविरोधात ट्विट करून कंगना रणौत अनेकांच्या निशाण्यावर आली. ट्विटरवर तीचे अॅक्टर-सिंगर दिलजीत दोसांझसोबत जबरदस्त व्हर्बल वॉर झाले.

kangana ranaut Controversial Statement : दुसरा गाल दिल्याने भिक मिळते, स्वातंत्र्य नाही! कॉट्रोवर्सी क्विन कंगनानं आतापर्यंत केलीत 'ही' वादग्रस्त वक्तव्य

शेतकऱ्यांचा अपमान केल्यामुळे आधीच FIR दाखल झालेल्या कंगनाविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचीही तक्रार दाखल झाली होती. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेलला समन्स पाठवला होता. यावर तिने ट्विटमध्ये लिहिले की, 'किती पछाडलेली आहे ही पेंग्विन सेना. महाराष्ट्राचे पप्पूप्रो. फार आठवण येते क-क-क-क कंगना, काही हरकत नाही. लवकरच येईन'.

kangana ranaut Controversial Statement : दुसरा गाल दिल्याने भिक मिळते, स्वातंत्र्य नाही! कॉट्रोवर्सी क्विन कंगनानं आतापर्यंत केलीत 'ही' वादग्रस्त वक्तव्य

कंगनाने बॉलिवूड या नावावरच टार्गेट करून एक ट्विट केलं होतं. तिच्यामते, बॉलिवूड हा शब्द अपमानजनक आहे. त्यामुळे लोकांनी हा शब्दच रिजेक्ट करावा. आश्चर्याची बाब म्हणजे कंगनाने सुरू केलेल्या या मोहिमेला ट्विटरवरून अनेक लोकांचा सपोर्टही मिळाला.

kangana ranaut Controversial Statement : दुसरा गाल दिल्याने भिक मिळते, स्वातंत्र्य नाही! कॉट्रोवर्सी क्विन कंगनानं आतापर्यंत केलीत 'ही' वादग्रस्त वक्तव्य

कंगनानं ट्विट करत आपल्या फॅन्सना 'जजमेंटल है क्या' सिनेमा बघण्याची अपील केली होती. तेच दीपिकाबाबत तिने नाव न घेता लिहिले होते की, 'ते जे डिप्रेशनची दुकान चालवतात'. आपल्या ट्विटमध्ये कंगनाने लिहिले की, 'मेंटल हेल्थ अवेअरनेससाठी आम्ही जो सिनेमा बनवला होता, त्याला त्या लोकांनी कोर्टात खेचलं जे डिप्रेशनचं दुकान चालवतात. मीडिया बॅननंतर सिनेमाचं नाव बदलण्यात आलं. ज्यामुळे या सिनेमाच्या मार्केटींगवर प्रभाव पडला' असं ती म्हणाली.

kangana ranaut Controversial Statement : दुसरा गाल दिल्याने भिक मिळते, स्वातंत्र्य नाही! कॉट्रोवर्सी क्विन कंगनानं आतापर्यंत केलीत 'ही' वादग्रस्त वक्तव्य

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका होऊ लागली, चाहत्यांनी यावरुन करण जोहर, सलमान खान यांना लक्ष्य केले होते. यातच अभिनेत्री कंगना रणौत हिनेही या प्रकरणात सातत्याने आवाज उचलला. याबाबत कंगना रणौतने आता ट्विट करुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला होता. (Image Credit- Social Media)