lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Inspirational > वडिलांच्या 'त्या' एका गोष्टीमुळे बदललं प्रिटी झिंटाचं आयुष्य, म्हणाली आज मी इंडिपेंडंट आहे कारण....

वडिलांच्या 'त्या' एका गोष्टीमुळे बदललं प्रिटी झिंटाचं आयुष्य, म्हणाली आज मी इंडिपेंडंट आहे कारण....

Preity Zinta's Secret For Successful Life: वडिलांबाबत असं काय सांगते आहे अभिनेत्री प्रिटी झिंटा की त्यामुळे तिचं आयुष्य बदलून गेलं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2024 05:33 PM2024-04-10T17:33:36+5:302024-04-10T17:50:53+5:30

Preity Zinta's Secret For Successful Life: वडिलांबाबत असं काय सांगते आहे अभिनेत्री प्रिटी झिंटा की त्यामुळे तिचं आयुष्य बदलून गेलं....

Preity Zinta's secret for successful life, she says she is indepedant and successful because of one important advice | वडिलांच्या 'त्या' एका गोष्टीमुळे बदललं प्रिटी झिंटाचं आयुष्य, म्हणाली आज मी इंडिपेंडंट आहे कारण....

वडिलांच्या 'त्या' एका गोष्टीमुळे बदललं प्रिटी झिंटाचं आयुष्य, म्हणाली आज मी इंडिपेंडंट आहे कारण....

Highlightsबघा प्रिटी झिंटाचं आयुष्य बदलवून टाकणारी ती गोष्ट नेमकी कोणती होती...

बॉलीवूड अभिनेत्री तसेच आयपीएल टीमची मालकीण असलेली प्रिटी झिंटा तिच्या करिअरमध्ये अतिशय यशस्वी म्हणून ओळखली जाते. अभिनयाचं क्षेत्र असो की आता तिने निवडलेलं क्रिकेटचं क्षेत्र असो. त्या दोन्ही ठिकाणी तिची स्वतंत्र ओळख तिने निर्माण केली आहे. ती म्हणते की आज तिने जे यश मिळवलं आहे किंवा सगळ्यात मुख्य म्हणजे आज ती ज्याप्रकारचं independent आयुष्य जगते आहे, त्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिच्या वडिलांनी तिला लहानपणी सांगितलेली एक खास गोष्ट.. बघा प्रिटी झिंटाचं आयुष्य बदलवून टाकणारी ती गोष्ट नेमकी कोणती होती...(Preity Zinta's secret for successful life)

 

प्रिती झिंटाच्या एका मुलाखतीचा एका छोटासा भाग shethepeopletv या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तिने सांगितलेली गोष्ट खूप काही वेगळी नाही. आपल्यापैकी अनेकांनी ती बऱ्याचदा ऐकलेली आहे.

१ ग्लास पाणी घेऊन तपासा तुमचे केस किती हेल्दी, बघा घरच्याघरी कशी घ्यायची केसांची परीक्षा 

पण एखाद्या गोष्टीचा कोण किती विचार करतं आणि त्यानुसार स्वत:मध्ये किती बदल करवून घेतं, हे व्यक्तीनुसार बदलत जातं. तसंच प्रिती झिंटाचं झालं. तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं की बहुसंख्य भारतीय स्त्रिया लहानपणी त्यांच्या वडिलांवर, तरुणपणी नवऱ्यावर आणि म्हातारपणी मुलावर अवलंबून असतात. पण मला तुला तसं कोणावरही अवलंबून असलेलं पाहायचं नाहीये. 

 

तु स्वावलंबी आयुष्य तेव्हाच जगू शकशील जेव्हा तु आर्थिकदृष्टीने कोणावरही अवलंबून नसशील. प्रिटीने ही गोष्ट अतिशय गांभिर्याने घेतली आणि आज त्यानुसारच ती जगते आहे. ती पुढे हे ही म्हणते की तुम्ही जे ठरवाल तेच आयुष्यात होईल असं काही नाही.

ढाबास्टाईल झणझणीत मसाला भाजी १० मिनिटांत तयार, त्यासाठी करून ठेवा 'हे' खास वाटण

खूप अचानक काही गोष्टी समोर येतात आणि तुम्ही त्यानुसार बदलत जाता. स्वत:चंच उदाहरण देत ती म्हणाली की तिने क्रिमिनल सायकोलॉजी विषयाचं शिक्षण घेतलं पण ती अभिनय क्षेत्रात गेली आणि आता तर आयपीएलच्या माध्यमातून क्रिडा क्षेत्रातही गेली आहे. करिअर कोणतंही असो तुम्ही ते किती यशस्वी पद्धतीने करता आणि त्यातून खरच स्वावलंबी होता का, हे बघणं गरजेचं आहे. 

 

Web Title: Preity Zinta's secret for successful life, she says she is indepedant and successful because of one important advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.