Lokmat Sakhi >Social Viral > राहा कपूर होणार बॉलीवूडची सगळ्यात श्रीमंत स्टार-किड, आई- वडिलांकडून तिला मिळतोय २५० कोटींचा बंगला

राहा कपूर होणार बॉलीवूडची सगळ्यात श्रीमंत स्टार-किड, आई- वडिलांकडून तिला मिळतोय २५० कोटींचा बंगला

Ranbir Kapoor Gifts Daughter Raha Kapoor 250 Cr Bunglow: रणबीर कपूर आणि आलिया भट यांची लेक राहा कपूर लवकरच बॉलीवूडची सगळ्यात श्रीमंत स्टार किड होणार आहे.  (Raha will be the richest star-kid of bollywood)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2024 11:46 AM2024-03-30T11:46:42+5:302024-03-30T11:47:57+5:30

Ranbir Kapoor Gifts Daughter Raha Kapoor 250 Cr Bunglow: रणबीर कपूर आणि आलिया भट यांची लेक राहा कपूर लवकरच बॉलीवूडची सगळ्यात श्रीमंत स्टार किड होणार आहे.  (Raha will be the richest star-kid of bollywood)

Ranbir kapoor gifts daughter Raha Kapoor 250 Cr bunglow, Raha will be the richest star-kid of bollywood | राहा कपूर होणार बॉलीवूडची सगळ्यात श्रीमंत स्टार-किड, आई- वडिलांकडून तिला मिळतोय २५० कोटींचा बंगला

राहा कपूर होणार बॉलीवूडची सगळ्यात श्रीमंत स्टार-किड, आई- वडिलांकडून तिला मिळतोय २५० कोटींचा बंगला

Highlightsहा बंगला राहाच्या नावावर झाल्यानंतर राहा सगळ्यात कमी वयात सर्वाधिक श्रीमंत झालेली बॉलीवूडची स्टार किड म्हणून ओळखली जाईल.

रणबीर कपूर आणि आलिया भट या स्टार जोडप्यांची लेक असलेली राहा कपूर तिच्या जन्मापासूनच चर्चेत आहे. तिचा क्यूटनेस पाहून तर तिचा वेगळा चाहतावर्गही तयार झाला आहे. रणबीर आणि आलियाचं त्यांच्या लेकीवर असणारं प्रेम, खासकरून रणबीरने तिच्यासाठी घेतलेला मोठा ब्रेक, या सगळ्या गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय असतात. आता पुन्हा एकदा राहा कपूर चर्चेत आली आहे. यावेळी मात्र त्याचं कारण खूप खास असून राहा कपूर लवकरच बॉलीवूडमधली सगळ्यात श्रीमंत स्टार किड म्हणून ओळखली जाणार आहे (Ranbir Kapoor Gifts Daughter Raha Kapoor 250 Cr Bunglow). याचं कारण म्हणजे रणबीर आणि आलिया बांद्रा परिसरात एक अलिशान बंगला बांधत असून हा बंगला ते त्यांच्या लाडक्या लेकीच्या म्हणजेच राहा कपूरच्या नावावर करणार आहेत. (Raha will be the richest star-kid of bollywood)

 

या बंगल्याचं बांधकाम अजून सुरू असून बंगला तयार होण्यासाठी अजून काही महिने लागणार आहेत. हा बंगला जेव्हा पुर्णपणे तयार होईल, तेव्हा त्याची किंमत अंदाजे २५० कोटी रुपये एवढी असणार आहे.

उन्हाचा पारा वाढतोय- उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून ५ गोष्टी करणं कटाक्षाने टाळा

हा बंगला राहाच्या नावावर झाल्यानंतर राहा सगळ्यात कमी वयात सर्वाधिक श्रीमंत झालेली बॉलीवूडची स्टार किड म्हणून ओळखली जाईल. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्या बंगल्याच्या नंतर आता रणबीर कपूरचाच बंगला मुंबईतील बॉलीवूड स्टार्सच्या सगळ्यात महागड्या प्रॉपर्टीपैकी एक म्हणून ओळखला जाणार आहे. 

 

बंगल्याच्या पाहणीसाठी आलिया भट, नितू कपूर, रणबीर कपूर हे तिघे नुकतेच गेले होते. त्यावेळचा त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. असं म्हटलं जातं की या बंगल्याचा सहमालकी हक्क नितू कपूर यांच्याकडेही असणार आहे.

आपण 'हेल्दी' समजून खातो असे ६ जंकफूड, आहारतज्ज्ञ सांगतात पिझ्झा- बर्गरसोबतच 'हे' पदार्थही टाळा

नारायण मुर्ती यांनी त्यांच्या ४ महिन्याच्या नातवाच्या नावावर काही दिवसांपुर्वीच २४० कोटी रुपये इतकी किंमत असणारे शेअर्स केले होते. आता त्या मागोमाग रणबीर कपूरही राहाच्या नावे २५० कोटींचा बंगला करतो आहे. या दोन्ही गोष्टींची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा आहे. 

 

Web Title: Ranbir kapoor gifts daughter Raha Kapoor 250 Cr bunglow, Raha will be the richest star-kid of bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.