नाजूक चांदींच्या पैंजणांच्या ८ युनिक डिझाईन्स; रोज वापरायला एकदम सोयीस्कर, लाईटवेट पॅटर्न्स
Updated:January 25, 2026 12:51 IST2026-01-25T12:34:36+5:302026-01-25T12:51:34+5:30
10 Designs Of Delicate Silver Payal : रोज वापरायचे असल्याने साखळीची जाडी मध्यम असावी, जेणेकरून ती लवकर तुटणार नाही.

पैंजण प्रत्येकालाच घालायला आवडतात. काहींना जाड पॅटर्न आवडते तर काहींना रोज वापरण्यासाठी नाजूक पैंजणच्या डिझाईन्स आवडतात. नाजूक पैंजणांच्या काही डिझाईन्स पाहूया. (Silver Payal Designs New Patterns)
रोजच्या वापरासाठी साधे आणि वजनाला हलके पैंजण उत्तम ठरतात, जे पायांना टोचत नाहीत आणि तुम्हाला कम्फर्टेबल लूक मिळतो.
जर तुम्हाला थोडे भरभक्कम डिझाईन हवे असेल, तर कोल्हापुरी साज किंवा मळवट डिझाईनचे पैंजण छान दिसतात.
जास्त आवाज नको असल्यास केवळ १-२ नाजूक घुंगरू असलेले पैंजण ऑफिस किंवा कॉलेज वेअरसाठी सोयीचे असतात.
सध्या ब्लॅक मेटल किंवा 'ऑक्सिडाइज्ड' लुक खूप ट्रेंडमध्ये आहे, जे कोणत्याही कपड्यांवर उठून दिसतात.
रोज वापरायचे असल्याने साखळीची जाडी मध्यम असावी, जेणेकरून ती लवकर तुटणार नाही.
रोजच्या वापरामुळे चांदी काळी पडू नये म्हणून अधूनमधून कोरड्या कापडाने ते स्वच्छ ठेवावेत.
चांदीच्या पैंजणांच्या बारीक पट्टीच्या डिझाईन्स तुम्ही रोजच्या वापरासासाठी घालू शकता.