1 / 6फादर्स डे (Happy Father’s Day 2025) एरव्ही कधी आपण वडिलांविषयी जाहीर आदर प्रेम व्यक्त करत नाही. इतकंच काय अनेकदा तर वडिलांनाही सांगितलं जात नाही की तुमचं काय महत्व आहे आयुष्यात!2 / 6म्हणून हे निमित्त फादर्स डेचं. यादिवशी आपल्या मनातलं आपल्या वडिलांना सांगावं. शुभेच्छांच्या शब्दांपलिकडे जाऊन साधावा संवाद. करावं काही जे त्यांना आवडेल!3 / 6वडिलांचा धाक कायम असतो. बाबा काय म्हणतील ही भीतीही कायम असते. पण त्या धाकाच्या पलिकडे त्यांच्या मनात लेकरांविषयी कायमच प्रेम असतो.4 / 6कायम कठोरच रहायचं, डोळ्यातलं पाणी कधी दाखवायचं नाही असा एक पुरुषी संस्कार असतो. त्यामुळे वडीलही कधी मन मोकळं करत नाहीत, पण मुलांसाठी मात्र सारे उन्हाळे पावसाळे ते झेलतच असतात.5 / 6अहो बाबा ते अरे बाबा असा आता बाबापणाचा प्रवास झाला आहे. बाबाही आता आईएवढाच जवळचा वाटतो आणि लेकरांचे डायपर बदलणे ते त्याच्याशी दोस्ती करणं सारं नव्यानं शिकतो आहे.6 / 6बाबा म्हणजे धाक, बाप म्हणजे दरारा, बाप म्हणजे भीती हे चित्र आता बदलतं आहे. बाबा आता दोस्त असतो, त्याच्याशी मनातलं बोलता येतं आणि स्वत:चे सारे कष्ट विसरुन तो कुटुंबासाठी कायम आधार बनतो.