1 / 8एखादे फळ किंवा भाजी पिकल्यावरच खाल्ली जाते. मात्र काही पदार्थ असे ही असतात जे कच्चेही खाल्ले जातात. त्याची चव छान लागते आणि हे पदार्थही पारंपरिक आहेत.2 / 8केळी फार पौष्टिक असतात. पिकलेली केळी जशी खाल्ली जातात तसेच कच्च्या केळीचे पदार्थ करता येतात. वेफर्स तर केले जातातच, मात्र चमचमीत केळीचे काप करता येतात. चवीला छान लागतात. 3 / 8कच्या टोमॅटोची भाजी चवीला फारच छान लागते. तसेच त्याची चटणी करता येते. हिरवे टोमॅटो बाजारात आरामात उपलब्ध होतात. त्याला छान फोडणी देऊन त्याची चटणी करा. 4 / 8फणसाचे गरे महाराष्ट्रात फार आवडीने खाल्ले जातात. तसेच कच्या फणसाठी भाजी फार चविष्ट असते. करायची पद्धत वेगवेगळी आहे आणि सगळ्याच रेसिपी भारी आहेत. 5 / 8सुरणाचे काप हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध असा पदार्थ आहे. त्यासाठी कच्चे सुरण वापरले जाते. हे फार पौष्टिक असते. चवही मस्तच. 6 / 8वांग्याची भाजी वारंवार केली जाते. मात्र कच्या वांग्याचे छान कापही करता येतात. पिकलेल्या वांग्याचेही काप करतात मात्र कच्या वांग्याचे जास्त चविष्ट लागतात. नक्की करुन पाहा. 7 / 8पपई हे फळ त्वचेसाठी फार फायद्याचे असते. तसेच कच्ची पपई ही खाल्ली जाते. मात्र नुसती नाही तर कच्ची पपई किसून त्याची चटणी केली जाते. ही चटणी चवीला मस्त असते. 8 / 8आंबा जेवढा आवडीने खाल्ला जातो, तेवढ्याच आवडीने कैरीही खाल्ली जाते. कैरी मस्त आंबट गोड असते. नुसती खातात तसेच त्याचे लोणचे, डाळ, सरबत आणि इतरही पदार्थ करता येतात.