1 / 9थंडी जशी जवळ येते तसा आहारातही जरा बदल करावा लागतो. काही पदार्थ खाणे कमी करायचे तर काही पदार्थांचा आहारात समावेश करायचा. हे ८ पारंपरिक हिवाळी पदार्थ नक्की खा. 2 / 9मूग डाळ खिचडी सहज पचणारी व पौष्टिक असते. करायला सोपी आणि सगळ्याच्या आवडीची असते. डाळीतून आणि तांदूळातून शरीराला गरजेची असणारी प्रथिने मिळतात. तसेच खिचडीमुळे कार्बोहायड्रेट्स मिळतात. खिचडीला तुपाची फोडणी दिल्यास शरीराला उष्णता मिळते.3 / 9 मेथी पराठा नाश्त्याला करा तसेच जेवणासाठीही उत्तम आहे. हिवाळ्यात मेथी सहज उपलब्ध होते. मेथीचे विविध पदार्थ करता येतात मेथीही लोह व फायबरने समृद्ध असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात नक्की खावी. 4 / 9हरभऱ्याची उसळ म्हणजे प्रथिनांचा अगदी उत्तम असा स्रोत आहे.हिवाळ्याच्या दिवसांत ही भाजी पचायला सोपी आणि तृप्त करणारी ठरते. छान टवटवीत हरभरा या दिवसांमध्ये मिळतो.5 / 9चविष्ट आणि लोकप्रिय असा गोडाचा पदार्थ म्हणजे गाजर हलवा. सगळेच आवडीने खातात. थंडीच्या दिवसांत नक्कीच करायला हवा. फार छान अशी गाजरं या दिवसांमध्ये मिळतात. 6 / 9हिवाळ्यात तीळ नक्की खावेत. हिवाळ्यात घरोघरी केला जाणारा पदार्थ म्हणजे तिळाचे लाडू. रोज एखादा लाडू खाणे आरोग्यासाठी चांगले ठरते. थंडीच्या दिवसांत शरीराला गरजेची असणारी उष्णता तीळ देतात.7 / 9बाजरी आहारात असायलाच हवी. थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी जास्त खायला हवी. यामध्ये लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. थंडीच्या दिवसांत पोटासाठी उत्तम असा हा पदार्थ नक्की खा.8 / 9थंडीच्या दिवसांमध्ये आलं आहारात असायला हवं. आल्याचा चहा प्या. तसेच फोडणीत आलं वापरा, शरीराला गरजेची उष्णता देण्याचे काम आलं करते. त्यामुळे आल्याचा समावेश रोजच्या जेवणात असावा. पचन सुधारते आणि सर्दी होण्याची शक्यता कमी होते.9 / 9घरोघरी केला जाणारा हिवाळी खाऊ म्हणजे शेंगदाण्याचा लाडू. हा पारपरिक थंडीचा पदार्थ पोटासाठी तसेच आरोग्यासाठी फार छान असतो. प्रथिनांनी परिपूर्ण आणि गूळ घातलेला हा लाडू शरीराला उष्णता देतो. तसेच शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवतो.