1 / 6उन्हाळ्यात मोसंबीचा थंडगार रस पिणं अनेकांना आवडतं. हलकी गोडसर चव, ताजेपणा आणि शरीराला मिळणारा फ्रेशनेस यामुळे मोसंबीचा ज्यूस हा अनेक घरांमध्ये नियमित बनवला जातो. पण अनेकदा घरात रस काढल्यानंतर तो कडवट लागतो आणि पूर्ण चवच बिघडते. मोसंबी गोड असतानाही रस कडू का होतो, असा प्रश्न अनेकांना पडतो.2 / 6यामागचं एक मोठं कारण म्हणजे मोसंबी सोलताना किंवा कापताना तिच्या सालीचा पांढरा भाग रसात जास्त प्रमाणात मिसळणं. मोसंबीच्या सालीखाली असणारा हा पांढरा भाग चवीला किंचित कडवट असतो. ज्यूस काढताना तो जास्त प्रमाणात रसात गेला तर पूर्ण रसाची चव बदलू शकते.3 / 6अनेकदा ज्यूसरमध्ये मोसंबी खूप जोराने किंवा जास्त वेळ फिरवली जाते. त्यामुळे बिया फुटतात आणि त्यातून कडूपणा येऊ शकतो. म्हणूनच मोसंबीचा रस काढताना बिया शक्यतो वेगळ्या कराव्यात आणि ज्यूसरमध्ये फळ जास्त वेळ फिरवू नये.4 / 6मोसंबी खूप वेळ आधी कापून ठेवली तरी रसाची चव बदलू शकते. कापलेलं फळ हवेत जास्त वेळ राहिल्यास त्याचा ताजेपणा कमी होतो आणि कधी कधी हलका कडवटपणा वाढतो. त्यामुळे रस बनवण्याच्या वेळीच मोसंबी कापणं अधिक चांगलं ठरतं.5 / 6काही वेळा मोसंबी पूर्ण पिकलेली नसल्यासही रस कडसर किंवा आंबट-कडू लागू शकतो. त्यामुळे रसासाठी निवडताना भरलेली, ताजी आणि किंचित मऊ मोसंबी निवडणं फायदेशीर ठरतं.6 / 6रस काढल्यानंतर तो लगेच पिणंही महत्त्वाचं असतं. बराच वेळ ठेवलेला रस चवीला बदलू शकतो. विशेषतः उन्हाळ्यात बाहेर ठेवल्यास त्याचा ताजेपणा पटकन कमी होतो.