स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकाला माहिती हव्याच 'या' गोष्टी, पोेषक आहारासाठी कायमची गुरुकिल्ली

Updated:June 18, 2025 19:55 IST2025-06-18T17:02:10+5:302025-06-18T19:55:35+5:30

स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकाला माहिती हव्याच 'या' गोष्टी, पोेषक आहारासाठी कायमची गुरुकिल्ली

भाजी, पोळी, वरण, भात हा आपला रोजचा स्वयंपाक. पण हा स्वयंपाक करताना आपल्याला काही गोष्टींची माहिती नसते म्हणून नकळतपणे काही चुका आपल्याकडून होतात आणि त्यामुळे आपल्या हातानेच आपण त्या पदार्थांमधलं पोषण कमी करतो..

स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकाला माहिती हव्याच 'या' गोष्टी, पोेषक आहारासाठी कायमची गुरुकिल्ली

आता आपण अशा काही टिप्स पाहूया जेणेकरून आपला रोजचा स्वयंपाक अधिक चवदार तर होईलच पण त्याच्यातल्या पौष्टिक घटकांचा पुरेपूर लाभही आपल्या शरीराला होईल. या किचन टिप्स नेमक्या कोणत्या ते पाहूया..

स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकाला माहिती हव्याच 'या' गोष्टी, पोेषक आहारासाठी कायमची गुरुकिल्ली

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आमटी किंवा वरण करण्यासाठी डाळ शिजवायला लावण्यापुर्वी ती दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवावी. यामुळे त्याच्यातून जास्त प्रमाणात प्रोटीन्स आणि लोह मिळतं. त्याच्यातलं फायटिक ॲसिड, लेक्टिन्स, टॅनिंग्स कमी होतं त्यामुळे मग ॲसिडीटी, अपचनाचा त्रास होत नाही.

स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकाला माहिती हव्याच 'या' गोष्टी, पोेषक आहारासाठी कायमची गुरुकिल्ली

कोणतीही पालेभाजी केल्यानंतर तिच्यावर लिंबू पिळावं आणि मग ती खावी. कारण लिंबामधलं व्हिटॅमिन सी मिळालं तरच भाज्यांमधलं लोह आपल्या शरीरात जास्त चांगल्याप्रकारे शोषून घेतलं जातं.

स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकाला माहिती हव्याच 'या' गोष्टी, पोेषक आहारासाठी कायमची गुरुकिल्ली

मशरूमचा कोणताही पदार्थ करण्यापुर्वी जर ते चिरून १५ मिनिटांसाठी सुर्यप्रकाशात ठेवले तर त्यामुळे त्यांच्यातलं व्हिटॅमिन डी आणखी जास्त वाढण्यास मदत होते.

स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकाला माहिती हव्याच 'या' गोष्टी, पोेषक आहारासाठी कायमची गुरुकिल्ली

ताकामध्ये चिमूटभर हिंग घालून मग ताक प्यावं. यामुळे ताकामधले पौष्टिक घटक आणखी जास्त वाढतात आणि ते पचन चांगलं होण्यासाठी अतिशय उत्तम ठरतं..