पैठणीवर सजले राजहंस, पाहा सुंदर राजहंस बॉर्डरच्या १० पैठण्या, काठपदराची जरतारी साडी आता झाली अजून मोहक...
Updated:January 26, 2026 13:20 IST2026-01-23T21:30:00+5:302026-01-26T13:20:35+5:30
Rajhansa Border Paithani : Rajhansa Border Paithani Saree : राजहंस बॉर्डरच्या पैठणी साड्यांचे १० मनमोहक डिझाईन्स! अशी पैठणी तुम्ही कधी पाहिलीच नसेल - सुंदर काठाची नाजूक नजाकत...

महाराष्ट्राची शान असलेली पैठणी काळानुसार नवनवीन रूपात आपल्यासमोर (Rajhansa Border Paithani) येत असते. कधी पदरावरील मोराची नजाकत तर कधी बुट्ट्यांची सुंदरता आपल्याला भुरळ घालते. पण सध्या बाजारात आणि सोशल मिडीयावर चर्चा आहे ती म्हणजे 'राजहंस बॉर्डर पैठणीचीच'. नावाप्रमाणेच राजेशाही डौल आणि हंसासारखी शुद्धता या साडीच्या काठांवर पाहायला मिळते.
कोणत्याही शुभकार्यात किंवा सण-समारंभात तुमचा लूक इतरांपेक्षा वेगळा आणि उठावदार दिसावा असं वाटत असेल, तर 'राजहंस काठ' असलेली पैठणी तुमच्याकडे असायलाच हवी. पारंपारिक विणकाम आणि आधुनिक नक्षी यांचा हा सुंदर संगम तुमच्या पारंपरिक साडीतील लुकला चारचांद लावतो.
महाराष्ट्रीयन साड्यांमध्ये पैठणीला खास मानाचं स्थान आहे आणि त्यातही राजहंस बॉर्डर पैठणी (Rajhansa Border Paithani For Bride) ही तर सौंदर्य, परंपरा आणि राजेशाही थाट यांचं प्रतीक मानली जाते. राजहंस म्हणजे पवित्रता, सौम्यता आणि ऐश्वर्याचं प्रतीक. त्यामुळेच राजहंसाच्या नक्षीने सजलेली पैठणी साडी अधिकच खास आणि आकर्षक दिसते.
लग्नसमारंभ, सण-उत्सव, पारंपरिक कार्यक्रम किंवा खास प्रसंगी महिलांची पहिली पसंती असलेली राजहंस बॉर्डर पैठणी तिच्या सुंदर बॉर्डर, पारंपरिक हातमाग काम आणि झळाळत्या रंगसंगतीमुळे प्रत्येकीच्याच नजरेत भरते. काळाच्या ओघात फॅशन बदलली तरी राजहंस बॉर्डर पैठणीचं क्लासिक सौंदर्य कधीच जुनं होत नाही.
पैठणी म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो राजेशाही थाट आणि सौंदर्याचा वारसा. त्यातही 'राजहंस बॉर्डर पैठणी' ही सध्या महिलांच्या पसंतीस उतरणारी एक अत्यंत मोहक आणि लोकप्रिय डिझाइन ठरत आहे.
राजेशाही थाट दाखवणारा मरून रंग आणि सोनेरी धाग्यांनी विणलेली राजहंस बॉर्डर...लग्नसमारंभासाठी एक परफेक्ट निवड ठरतो. सोन्याच्या आणि चांदीच्या जरित विणकामात साकारलेले राजहंस, क्लासिक मरून किंवा जांभळ्या रंगाच्या साडीत अधिक उठून दिसतात.
हिरवा रंग आणि त्यावर चमकणारा राजहंस म्हणजे जणू एकदमच शोभून व उठून दिसणारे सौंदर्य. हिरव्या रंगाच्या राजहंस बॉर्डर पैठणीवर, पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांसोबतच आपले रुप अधिकच खुलून दिसते.
साडीच्या काठावर फक्त राजहंसच नाही, तर त्यासोबतची बारीक पानाफुलांची नक्षी या साडीला अधिक प्रीमियम लूक देते.
आजकालच्या तरुण मुलींची पसंती असलेल्या पेस्टल कलर्समध्येही राजहंस बॉर्डरची जादू पाहायला मिळतेय. ठळक काठ आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊजमुळे राजहंस बॉर्डर अधिक उठून दिसते. क्रीम, ऑफ-व्हाइट, पेस्टल पिंक किंवा फिकट निळ्या रंगातली राजहंस बॉर्डर पैठणी साधेपणा आणि ग्रेस दाखवते.
साडीच्या काठावर राजहंसाची सुंदर रांग विणलेली असते, जी पावित्र्य आणि सौंदर्याचे प्रतीक मानली जाते. सोनेरी आणि चांदीच्या जरीचा वापर करून हे काठ अधिक उठावदार केले जातात. ही साडी शक्यतो 'सेमी पैठणी' आणि 'प्युअर सिल्क' अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध असते.
राजहंस बॉर्डर पैठणीमध्ये काठांवर एकामागोमाग एक अशा राजहंसांच्या प्रतिमा विणलेल्या असतात. राजहंसाच्या मानेचा बाक आणि त्याचे पंख यांचे विणकाम अतिशय कौशल्याने केले जाते. अनेकदा राजहंसाची नक्षी विणताना दोन वेगळ्या रंगांच्या रेशमी धाग्यांचा वापर केला जातो, ज्यामुळे साडी हालचाल करताना हंसाचा रंग बदलल्याचा भास होतो ज्याला 'धूपछाव इफेक्ट' असं म्हणतात.
हिरवा–गुलाबी, निळा–सोनेरी किंवा पिवळा–जांभळा अशा कॉन्ट्रास्ट रंगांमध्ये राजहंस बॉर्डर अधिक उठावदार दिसते.
परंपरेला जपून आधुनिक रंगसंगती आणि हलकं डिझाइन असलेली राजहंस बॉर्डर पैठणी आजच्या तरुणींची पसंती बनत आहे.
बारकाव्यांनी विणलेली राजहंसाची नक्षी, चमकदार जरतारी बॉर्डर आणि रेशमी धाग्यांची मखमली पोत या साडीला अनोखं राजेशाही सौंदर्य देतात. आई–मुलींची परंपरा जपणारी आणि पिढ्यानपिढ्या जपून ठेवावी अशी राजहंस बॉर्डर पैठणी आजही प्रत्येक स्त्रीच्या कपाटात मानाचं स्थान राखून आहे.
मोठ्या आकारातील राजहंस मोटिफ असलेली बॉर्डर साडीला खास आणि उठावदार बनवते.