मणी मंगळसूत्र बांगड्या पाहा, नवा ट्रेंड - लग्नसोहळ्यात आनंदानं मिरवावा असा नवा दागिना - नव्या जुन्याचा संगम...
Updated:February 2, 2026 18:08 IST2026-02-02T17:52:51+5:302026-02-02T18:08:07+5:30
Mangalsutra black beads bangles design : latest mangalsutra bangles for women : traditional mangalsutra bangles design : modern mangalsutra bangles design : हलक्या, एलिगंट आणि ट्रेंडी डिझाईन्समुळे मंगळसूत्राच्या काळ्या मण्यांच्या बांगड्या महिलांची पहिली पसंती ठरत आहेत.

भारतीय संस्कृतीत मंगळसूत्राला आणि त्यातील काळ्या मण्यांना विशेष महत्त्व असते. बदलत्या काळानुसार मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्ये अनेक बदल झाले, पण आता हे काळे मणी केवळ गळ्यातच नाही तर (modern mangalsutra bangles design) हातातही मिरवले जात आहेत.
'मंगळसूत्र बांगड्या' किंवा 'ब्लॅक बीड्स बँगल्स' सध्या फॅशन विश्वात फारच ट्रेंडिंग ठरत आहेत( latest mangalsutra bangles for women).
पारंपरिक मंगळसूत्रासोबतच आता काळ्या मण्यांच्या बांगड्या महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहेत. साध्या डेली लूकपासून ते सण-समारंभ आणि खास कार्यक्रमांपर्यंत, या बांगड्या सौंदर्य आणि स्टाईल यांचा सुंदर संगम दाखवतात.
हलक्या, एलिगंट आणि ट्रेंडी डिझाईन्समुळे मंगळसूत्राच्या काळ्या मण्यांच्या बांगड्या आजच्या महिलांची पहिली पसंती ठरत आहेत.
रोजच्या वापरासाठी हलक्या वजनाच्या आणि मिनिमल डिझाईनच्या बांगड्या हातात अगदी शोभून दिसतात.
काळ्या मण्यांसोबतच सोन्याची पिवळी लकाकी आणि नाजूक सोनेरी डिझाईनच्या बांगड्या सण-समारंभासाठी परफेक्ट परम,पारंपरिक लूक देतात.
थोड्या जाड आणि आकर्षक डिझाईनच्या थोड्या भरीव डिझाईन्स असलेल्या बांगड्या साडी किंवा पैठणीसोबत सुंदर दिसतात.
मध्यभागी एखादे छोटे पेंडंट आणि बाजूला काळ्या मण्यांची नाजूक व बारीक डिझाईन्स असलेला कडा देखील आपण ड्रेस किंवा साडीवर मॅच करू शकतो.
काळ्या मण्यांच्या ३ ते ४ पदरी ओळी असलेल्या या बांगड्या मनगटावर भरून दिसतात.
काळ्या मण्यांसोबत अमेरिकन डायमंड्सचा वापर करून बनवलेली इंडो-वेस्टर्न डिझाइन देखील सुंदर दिसते.
जशी गळ्यात ठुशी असते, अगदी तशाच प्रकारची विणकाम केलेली काळ्या मण्यांची बांगडी हातात शोभून दिसते.
सोन्याच्या तारा आणि काळ्या मण्यांची वेणी घातल्याप्रमाणे केलेली कलाकुसर म्हणजे अप्रतिमच.