'नो पेंडंट' मंगळसुत्रांचे १० युनिक डिझाईन्स! कमी सोन्यातही जास्त भारी दागिना - सिंपल ब्यूटीफुल नवा ट्रेंड...
Updated:January 27, 2026 22:48 IST2026-01-26T18:29:08+5:302026-01-27T22:48:12+5:30
latest gold no pendant mangalsutra designs : पेंडंटवाल्या मंगळसूत्राचा जमाना गेला! आता ट्रेंडमध्ये आहेत 'नो पेंडंट' मंगळसूत्राच्या हटके डिझाईन्स...

'मंगळसूत्र' हा फक्त एक दागिना नसून, तर भारतीय संस्कृतीत सौभाग्य प्रतीक मानले जाते. काळ बदलला तसा मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्येही खूप बदल झाले आहेत. पूर्वी मोठे आणि जड पेंडेंट असलेल्या मंगळसूत्रांना मोठी पसंती होती, पण आता सध्याच्या काळात नवंवधू आणि महिलांची पसंती 'नो पेंडेंट' (No Pendant) म्हणजेच पेंडेंट नसलेल्या मंगळसूत्रांना मिळत आहे(simple gold mangalsutra without pendant).
साधं, सोप आणि रोजच्या वापरातील सोयीसाठी हे डिझाईन्स खूपच (stylish no pendant gold mangalsutra for women) लोकप्रिय होत आहेत. पारंपरिक काळे मणी आणि सोबतच सोन्याची बारीक चेन असलेले हे मंगळसूत्र ऑफिसपासून पार्टीपर्यंत कोणत्याही प्रसंगी तुम्हाला एक क्लासी आणि एलिगंट लुक देतात.
साधं, एलिगंट आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट असलेलं हे मंगळसूत्र (latest gold no pendant mangalsutra designs) ऑफिस वियर, कॅज्युअल लूक किंवा अगदी फेस्टिव्ह आउटफिटवरही सुंदर दिसतं.
पेंडेट नसतानाही काळ्या मण्यांची खास रचना, गोल्ड बीड्स आणि मिनिमल पॅटर्नमुळे या मंगळसूत्रांना एक वेगळीच ग्रेस मिळते. हलकं, स्टायलिश आणि ट्रेंडी असलेलं नो पेंडेट मंगळसूत्र आजच्या महिलांसाठी परफेक्ट ज्वेलरी चॉईस ठरत आहे.
फक्त काळ्या मण्यांची सलग रचना असलेलं हे मंगळसूत्र अतिशय साधं आणि एलिगंट दिसतं. रोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय. फक्त काळ्या मण्यांची एक बारीक नाजूक चेन, ज्यात काही ठिकाणी सोन्याचे छोटे मणी किंवा डिझाईन दिलेले असेल. हे डिझाईन अगदी साधे असून रोजच्या वापरासाठी उत्तम आहे.
काळ्या मण्यांच्या दोन पातळ चेन, ज्या एकत्र जोडलेल्या असतील. यामुळे मंगळसूत्राला थोडी जाडी येते, पण पेंडेंट नसल्याने ते फार जड वाटत नाही.
बारीक मण्यांऐवजी थोडे मोठे काळे मणी आणि सोन्याचे मणी वापरून डिझाइन केलेले मंगळसूत्र. हे दिसायला आकर्षक आणि स्टायलिश दिसते.
काळ्या मण्यांमध्ये मधेमधे छोटे गोल्ड बीड्स दिलेले डिझाईन, जे साधेपणातही लक्झरी फील देतात.
अतिशय नाजूक चेन आणि छोट्या मण्यांची रचना असलेलं डिझाईन, जे अगदी ऑफिस वेअर कपड्यांना देखील शोभून दिसतं.
सिंगल लाईन एलिगंट मंगळसूत्र म्हणजेच यात एकाच ओळीत काळ्या मण्यांची रचना असलेलं मंगळसूत्र, हलकं आणि अतिशय कम्फर्टेबल.
साधेपणा, स्टाइल आणि कम्फर्ट या तिन्ही गोष्टी एकत्र हव्या असतील तर हे ' नो पेंडंट मंगळसूत्र' प्रत्येक विवाहित महिलेच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये असायलाच हवं.
कुर्ती, गाऊन किंवा वेस्टर्न ड्रेसेससोबतही परफेक्ट मॅच होणार 'नो पेंडंट मंगळसूत्र' हे दिसायला आकर्षक आणि स्टायलिश दिसते.