साडी नेसली की एकदम जाडजूड दिसता? ९ टिप्स-साडी दिसेल शोभून-दिसाल स्लिम
Updated:January 29, 2026 17:27 IST2026-01-28T20:02:34+5:302026-01-29T17:27:25+5:30
How To Look Slim In Saree :

साडीमध्ये स्लिम आणि आकर्षक दिसण्यासाठी खालील ८ ते १० टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. (How To Look Slim In Saree)
शिफॉन, जॉर्जेट किंवा क्रेप यांसारखे हलके आणि अंगाला चिकटून बसणारे कापड निवडा कारण ते फुगत नाही.
काळा, मरून किंवा नेव्ही ब्लू यांसारख्या गडद रंगाच्या साड्यांमध्ये शरीर सडपातळ दिसते.
साडीवर मोठ्या फुलांऐवजी लहान डिझाईन्स किंवा उभ्या रेषा असाव्यात.
पदर मोकळा सोडण्यापेक्षा त्याच्या निऱ्या करून पिन लावल्यास खांदे आणि कंबर सुटसुटीत दिसते.
साध्या पेटीकोटऐवजी साडी शेपवेअर वापारा. ज्यामुळे पोटाचा भाग सपाट दिसतो.
साडीच्या निऱ्या एकाच ठिकाणी खूपच जाड होणार नाहीत याची काळजी घ्या आणि त्या व्यवस्थित पसरवून खोचा.
लांब हाताचे आणि व्ही नेक ब्लाऊज घातल्यानं हात आणि मान लांब आणि स्लिम वाटते. गळ्यात खूप जड दागिने न घालता लांब कानातले निवडा. यामुळे चेहऱ्याचा आणि मानेचा भाग सुंदर दिसतो.
साडी नेसण्यापूर्वी हिल्स किंवा उंच सॅण्डल घातल्यानं तुमची उंची जास्त वाटते लूक स्लिम येतो.