दागिन्यांची निवड चुकली की लूक खराब! ब्लाऊज गोल गळ्याचे असो किंवा व्ही-शेप; फॉलो करा सेलिब्रिटींच्या 'या' ५ ट्रिक्स!
Updated:January 26, 2026 19:00 IST2026-01-26T19:00:00+5:302026-01-26T19:00:02+5:30
jewellery styling tips: necklace for blouse design: celebrity jewellery styling: ब्लाऊजच्या नेकलाईननुसार ज्वेलरी कशी निवडायची. त्यासाठी या ५ फॅशन टिप्स लक्षात ठेवा.

लग्न किंवा सणसमारंभात आपल्याला सगळ्यांपेक्षा वेगळा आणि हटके लूक हवा असतो. त्यासाठी आपण विविध साड्या किंवा ड्रेसची निवड करतो. पण अनेकदा आपल्याकडे असणाऱ्या ज्वेलरी साडी-ड्रेसला मॅच होतात खऱ्या पण नेकलाइनमुळे त्याची शोभा निघून जाते. चुकीचे दागिने निवडल्यास आपला संपूर्ण लूक खराब होतो. (jewellery styling tips)
आपल्यालाही रॉयल आणि ग्रेसफुल दिसायचे असेल तर ब्लाऊजच्या नेकलाईननुसार ज्वेलरी कशी निवडायची. त्यासाठी या ५ फॅशन टिप्स लक्षात ठेवा. (necklace for blouse design)
गोल गळ्याचे ब्लाऊज अनेकांकडे असते. त्यावर आपण गळ्याशी चिटकलेला चोकर किंवा हेवी नेकलेस घालू शकतो. उजचा गळा खोल असेल, तर मल्टि-लेयर्ड माळा घालून चांगला लूक मिळवू शकता. यावर छोटे कानातले घाला.
व्ही आकाराचा गळा आपली मान उंच आणि सडपातळ दाखवतो. या गळ्याच्या आकाराला व्ही शेप नेकलेस किंवा लांब लटकन असलेले पेंडेंट घाला. यामुळे मॉर्डन लूक मिळतो.
बोट नेक ब्लाऊजमध्ये गळा बंद असतो. अशावेळी दागिनी घालण्याऐवजी आपण कानातल्यांकडे अधिक लक्ष द्यायला हवे. आपण यावर लांब- जाड झुमके किंवा डँग्लर्स घालू शकतो.
कॉलर किंवा हाय-नेक ब्लाऊजमध्ये स्टेटमेंट लूक हवा असेल तर हार, कानातले घालणे टाळा. त्याऐवजी आपण हातामध्ये जाड कडे किंवा अंगठी घालून लूक पूर्ण करु शकतो. गळा प्लेन असेल, तर वरून एखादा लांब राणी हार घाला.
चौकोनी गळा आपल्या खांद्यांना वेगळा लूक देतो. यावर नाजूक चोकर किंवा मोत्यांच्या माळा खूप छान दिसतात. दागिन्यांची निवड करताना गळ्याच्या कडांच्या आत राहतील याची काळजी घ्या. ज्यामुळे लूक अधिक 'क्लिन' आणि आकर्षक दिसेल.