आजीच्या काळातील पारंपरिक दागिना पुन्हा ट्रेंडिंग! चिडामोती चोकरचे १० सुंदर डिझाईन्स - असा नखरेल दागिना हवाच...

Updated:January 31, 2026 10:00 IST2026-01-31T10:00:00+5:302026-01-31T10:00:02+5:30

Chidamoti Chokar Design : Chidamoti choker necklace : traditional chidamoti choker : साध्यासुद्या लूकला उठावदार आणि एलिगंट करण्यासाठी चिडामोती चोकर डिझाईन्स हा एक परफेक्ट पर्याय ठरतो.

आजीच्या काळातील पारंपरिक दागिना पुन्हा ट्रेंडिंग! चिडामोती चोकरचे १० सुंदर डिझाईन्स - असा नखरेल दागिना हवाच...

स्त्रियांच्या सौंदर्यात अधिक भर पाडण्यासाठी किंवा तिचे रुप खुलवून (Chidamoti Chokar Design) आणण्यासाठी 'दागिने' खूप महत्वाचे असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांमध्ये आणखी एक असा दागिना आहे जो पिढ्यानपिढ्या स्त्रियांच्या गळ्याची शोभा वाढवत आला आहे, तो म्हणजे 'चिडामोती चोकर'.

आजीच्या काळातील पारंपरिक दागिना पुन्हा ट्रेंडिंग! चिडामोती चोकरचे १० सुंदर डिझाईन्स - असा नखरेल दागिना हवाच...

पूर्वीच्या काळी आजी-पणजीच्या दागिन्यांच्या पेटीत हमखास असणारा हा दागिना (traditional chidamoti choker) आज पुन्हा एकदा नवीन रूपात फॅशनच्या जगात प्रचंड लोकप्रिय होत आहे. लहान, नाजूक आणि चमकणाऱ्या चिडामोत्यांची गुंफण जेव्हा गळ्याभोवती 'चोकर' स्वरूपाच्या दागिन्यांत बसते, तेव्हा त्या स्त्रीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.

आजीच्या काळातील पारंपरिक दागिना पुन्हा ट्रेंडिंग! चिडामोती चोकरचे १० सुंदर डिझाईन्स - असा नखरेल दागिना हवाच...

साडी असो वा भरजरी ड्रेस, चिडामोती चोकर प्रत्येक आऊटफिटवर उठून दिसतो. आजकालच्या मॉडर्न काळातही लग्नसमारंभ असो किंवा सण-उत्सव, तरुणींची पहिली पसंती या पारंपारिक दागिन्याला मिळत आहे. लग्नसमारंभ, हळदी, रिसेप्शन किंवा खास सणावारासाठी दागिन्यांची निवड करताना आजकाल पारंपरिकतेसोबतच थोडा ट्रेंडी टच असलेले दागिने अधिक पसंत केले जातात. अशाच दागिन्यांमध्ये चिडामोती चोकर डिझाईन्स सध्या प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत.

आजीच्या काळातील पारंपरिक दागिना पुन्हा ट्रेंडिंग! चिडामोती चोकरचे १० सुंदर डिझाईन्स - असा नखरेल दागिना हवाच...

मोत्यांची नाजूक चमक, चिड्यांची कलात्मक रचना आणि चोकरचा रॉयल लूक यांचा सुंदर संगम या दागिन्यांमध्ये पाहायला मिळतो. तुमच्या साध्यासुद्या लूकला उठावदार आणि एलिगंट करण्यासाठी चिडामोती चोकर डिझाईन्स हा एक परफेक्ट पर्याय ठरतो.

आजीच्या काळातील पारंपरिक दागिना पुन्हा ट्रेंडिंग! चिडामोती चोकरचे १० सुंदर डिझाईन्स - असा नखरेल दागिना हवाच...

बारीक, तांदळाच्या दाण्यासारख्या आकाराच्या मोत्यांना 'चिडामोती' म्हटले जाते. हे मोती अतिशय नाजूक असतात, म्हणूनच या चोकरची शोभा अधिक वाढते.

आजीच्या काळातील पारंपरिक दागिना पुन्हा ट्रेंडिंग! चिडामोती चोकरचे १० सुंदर डिझाईन्स - असा नखरेल दागिना हवाच...

चिडामोती चोकर हे पारंपरिक दागिन्यांमध्ये एक खास स्थान राखून आहेत. मोत्यांची नाजूक चमक आणि चोकरची घट्ट बसणारी रचना यामुळे हे दागिने प्रत्येक आउटफिटला रॉयल लूक देतात. सध्या बाजारात चिडामोती चोकरचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.

आजीच्या काळातील पारंपरिक दागिना पुन्हा ट्रेंडिंग! चिडामोती चोकरचे १० सुंदर डिझाईन्स - असा नखरेल दागिना हवाच...

चिडामोती चोकर केवळ पारंपरिकच नाही, तर आता आधुनिक रूपातही उपलब्ध आहेत. चिडामोती चोकर यामध्ये अनेक पदरी बारीक चिडामोती असतात, जे गळ्याला पूर्णपणे फिट बसतात. काठपदराच्या साडीवर हा प्रकार अत्यंत खुलून दिसतो.

आजीच्या काळातील पारंपरिक दागिना पुन्हा ट्रेंडिंग! चिडामोती चोकरचे १० सुंदर डिझाईन्स - असा नखरेल दागिना हवाच...

अनेक तरुणींना मोत्यांच्यामध्ये मोठे पेंडंट आवडते. मध्यभागी सोन्याचे किंवा कोरीव काम केलेले पेंडंट असलेला चिडामोती चोकर सध्या लग्नसमारंभात खूप ट्रेंडमध्ये आहे.

आजीच्या काळातील पारंपरिक दागिना पुन्हा ट्रेंडिंग! चिडामोती चोकरचे १० सुंदर डिझाईन्स - असा नखरेल दागिना हवाच...

फक्त पांढरे मोतीच नाही, तर मध्ये पाचू (हिरवे) किंवा माणिक (लाल) मणी गुंफलेले चिडामोती चोकर आकर्षक दिसतात. तुमच्या साडीच्या रंगाशी जुळणारे हे चोकर तुम्ही निवडू शकता.

आजीच्या काळातील पारंपरिक दागिना पुन्हा ट्रेंडिंग! चिडामोती चोकरचे १० सुंदर डिझाईन्स - असा नखरेल दागिना हवाच...

ज्यांना खूप जड किंवा अगदी बटबटीत हेव्ही दागिने आवडत नाहीत, त्यांच्यासाठी लहान फुलांच्या आकाराचे सोन्याचे मणी असलेले चिडामोती चोकर उत्तम पर्याय आहेत. हे चिडामोती चोकर इंडो-वेस्टर्न कपड्यांवरही उठून दिसतात.

आजीच्या काळातील पारंपरिक दागिना पुन्हा ट्रेंडिंग! चिडामोती चोकरचे १० सुंदर डिझाईन्स - असा नखरेल दागिना हवाच...

चिडामोती चोकर यामध्ये मोत्यांची गुंफण अतिशय कलाकुसरीने केलेली असते. हा चोकर थोडा रुंद असतो आणि गळ्याची शोभा वाढवतो. भरजरी पैठणीवर हा दागिना परिधान केल्यास 'रॉयल' लुक मिळतो.

आजीच्या काळातील पारंपरिक दागिना पुन्हा ट्रेंडिंग! चिडामोती चोकरचे १० सुंदर डिझाईन्स - असा नखरेल दागिना हवाच...

सध्या मोठ्या पेंडंटची फॅशन आहे. चिडामोत्यांच्या माळा आणि खाली देवी, लक्ष्मी किंवा मोर असलेले मोठे पेंडंट असा हा प्रकार खूप उठून दिसतो.