सावळ्याची जणू... सावळ्या त्वचेवर उठून दिसतील ५ रंग, चेहऱ्यावरही येईल चकाकी- मिळेल प्रियंका चोप्रासारखा देसी लूक!
Updated:February 5, 2026 19:00 IST2026-02-05T19:00:00+5:302026-02-05T19:00:02+5:30
dusky skin beauty: best colors for dusky skin: Indian skin tone fashion: सावळ्या सुंदरींसाठी ५ बेस्ट कलर्स आणि काही खास फॅशन टिप्स.

भारतीय सौंदर्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे सावळी त्वचा. सावळ्या रंगात एक वेगळेच आकर्षण आणि चमक असते. अनेकदा चुकीच्या रंगाचे कपडे निवडल्यामुळे आपला लूक खराब होतो. प्रियंका असो किंवा दीपिका पदुकोण, या अभिनेत्रींनी सावळ्या त्वचेवर कोणते रंग खुलून दिसतात याचा नवीन ट्रेंड सेट केला आहे.(dusky skin beauty)
आपला देखील सावळा रंग असेल तर सावळ्या सुंदरींसाठी ५ बेस्ट कलर्स आणि काही खास फॅशन टिप्स.(best colors for dusky skin)
डस्की स्किन टोन असणाऱ्यांनी एमरेल्ड ग्रीन रंगाचे कपडे घालायला हवे. हा रंग आपल्याला बोल्ड आणि रिच लूक देतो.
वाइन, बरंगडी आणि प्लम रंग हा त्वचेला अधिक खुलवतो. हे रंग आपल्याला ग्लॅमरस लूक देतात. सध्या ट्रेंडमध्ये असल्यामुळे सावळ्या रंगावर शोभून दिसतील.
रॉयल, पर्शियन आणि कोबाल्ट ब्लू- निळ्या रंगाचे वेगवेगळे रंग आहेत. जे सावळ्या रंगावर सुंदर दिसतात. आपण या रंगांचे कपडे पार्टीसाठी निवडू शकतो.
सावळ्या त्वचेसाठी पिवळ्या रंगाची मस्टर्ड शेड अतिशय रॉयल दिसते. भडक पिवळ्या ऐवजी मस्टर्ड येल्लो निवडल्यास त्वचेचा पोत अधिक उजळ आणि चमकदार दिसतो. वेस्टर्न गाऊन्समध्ये हा रंग अतिशय छान दिसतो.
चॉकलेट ब्राउन, गोल्ड आणि ब्रॉन्झ हा रंग सावळ्या रंगावर सुंदर दिसतो. या रंगांचे कपडे घातल्याने आपण क्लासी, एलिगंट आणि आकर्षक दिसाल.