आजी- आईच्या साडीचा शिवा सुंदर घागरा, पाहा मस्त डिझाईन्स- विकतच्या महागड्या घागऱ्यापेक्षाही कमाल देखणे..
Updated:February 5, 2026 17:51 IST2026-02-05T17:18:44+5:302026-02-05T17:51:59+5:30

लग्नसराईच्या निमित्ताने लेहेंगा, घागरा, शरारा असे ड्रेस खूप घातले जातात. या ड्रेसच्या किमतीही तशा खूप जास्त असतात...
म्हणूनच असे महागडे ड्रेस विकत घेण्यापेक्षा थोडीशी आयडिया केली तर तुम्ही घरात असलेल्या जुन्याच साड्यांपासून खूप मस्त ड्रेस शिवून घेऊ शकता.(beautiful lehenga designs from old silk saree)
हे ड्रेस शिवण्यासाठी अगदी कमी खर्च येतो. साधारण ५०० ते ७०० रुपयांत खूप छान मनासारखा ड्रेस शिवता येतो..(how to stitch lehenga from old saree?)
टिपिकल घागरा नको असेल तर असा थोड्या वेगळ्या प्रकारचा ड्रेसही तुम्ही शिवून घेऊ शकता.
सिल्कची किंवा सिल्क कॉटन प्रकारातली मोठ्या काठांची साडी असेल तर त्यापासून असा सुंदर ड्रेसही शिवता येतो.
साऊथ इंडियन प्रकारचे ड्रेस आवडत असतील तर मोठ्या काठांची एखादी साडी घ्या आणि त्यापासून असा आकर्षक लेहेंगा शिवून घ्या.
मुनिया पैठणीचा हा लेहेंगा बघा.. पारंपरिक आणि अधुनिकता असा दोन्हींचा मिलाफ या ड्रेसमध्ये दिसून येतो.