विद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला !

Published:March 16, 2021 11:06 PM2021-03-16T23:06:45+5:302021-03-16T23:18:48+5:30

विद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला !

विद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला !

विद्या बालन . बस नामही काफी है! तिचे चित्रपट आजही तिच्या नावावर आणि तिच्या अभिनयावर चालतात.

विद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला !

उत्तम आशयाचे दर्जेदार चित्रपट हे विद्या बालनच्या करिअरचे विशेष. केवळ अभिनयाच्या जोरावर विद्या बालन प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणते.

विद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला !

मात्र आपल्या अभिनयासाठी सतत कौतुकाचा वर्षाव झेलणाऱ्या विद्या बालनला आपलया वाढत्या वजनासाठी सतत टीकेला सामोरं जावं लागलं.

विद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला !

एवढी सुंदर, उत्तम अभिनय करणारी, यशाच्या सर्वोच्च शिखरावर असलेली ही अभिनेत्री.तिला तिच्या वजनाचं काहीच वाटू नये , अशा शब्दात लोकांनी टीका करत वजनाच्या बाबत तिला निष्काळजी ठरवलं.

विद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला !

पण एका टप्प्यानंतर या टीकेला विद्या मोठ्या आत्मविश्वासानं सामोरी गेली. आजही वजनाच्या बाबतीत तिला कोणी प्रश्न विचारला, टीका केली तर बॅकफूटवर ना जाता फ्रंटफूटवर येऊन उत्तरं देते.

विद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला !

तुमच्या वाढणाऱ्या वजनाचं तुम्हाला काहीच वाटत नाही का? अशा तुसड्या प्रशनांना उत्तर देताना विद्या म्हणते की, माझ्या वाढत्या वजनाची काळजी मला वाटतं नसेल का? पण मी आयुष्यभर हार्मोनल बदलाच्या समस्येला तोंड देते आहे. त्यामुळे माझं वजन माझ्या हातात नाही.

विद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला !

पण मी जशी आहे तशी छान असं विद्या अभिमानानं सांगते. एकेकाळी वाढत्या वजनामुळे स्वतः ला नाकारणाऱ्या विद्यासाठी स्वतः ला स्वीकारणं हा 'इझी टास्क' नव्हता. विद्या म्हणते अजूनही मी स्वतः:ला पूर्णपणे स्वीकारलं आहे असं नाही. स्वतः:ला स्वीकारणं ही प्रदीर्घ प्रक्रिया आहे.

विद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला !

किशोरवयात असताना विद्याला लोक म्हणायचे की, किती सुंदर आहेस तू दिसायला. तेवढं वजन कमी केलंस की अजून छान दिसशील. विद्यालाही हे खरं वाटायचं. आणि ती झपाटल्यासारखी व्यायाम करायची. अवघड अवघड डाएट करायची. कधीतरी वजन कमी झाल्यासारखं वाटायचं की परत काही काळानं शरीर बंड करत वाढत राहायचं.

विद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला !

विद्या म्हणते मला जे हवं होतं ते शरीर होऊ देत नव्हतं. माझ्या अपेक्षा आणि माझं शरीर यांच्यातला झगडा वाढतच गेला. मी निराश होत होते. आरशात स्वतः कडे पाहाताना मला मी नंतर आधी मला माझं वाढलेलं वजनच दिसायचं.

विद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला !

पण एक टप्पा आला जेव्हा मी मला या चष्म्यातून बघणं सोडून दिलं. मी स्वतः:ला स्वीकारण्याची सुरुवात केली. पण त्यासाठी मला स्वतः वर काम करावं लागलं. स्वतः शी बोलावं लागलं. विद्या म्हणते की स्वतः चा स्वीकार करायला लागलं की गोष्टी सोप्या व्हायला लागतात.

विद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला !

स्वतः चा स्वीकार करायला लागल्यावर विद्याला स्वतः:चे विचार आणि हार्मोन बदल यातला गुंताही कळायला लागला. विद्या म्हणते वजनामुळे माझ्या मनात निर्माण होणाऱ्या नकारात्मक भावनांनी हार्मोन बदलता होते. आणि हार्मोन बदल्यामुळे वजन वाढत होतं.

विद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला !

कदाचित नकारात्मक विचार हेही हार्मोन बदलाचं कारण असावं . हे उमगल्यानंतर विद्याने वजनाचा नकारात्मक विचार करणं सोडून दिलं. स्वतःला स्वीकारलं. तेव्हापासून वाढत्या वजनाच्या समस्येनं विद्याला त्रास होण्याचंही थांबलं.

विद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला !

विद्या म्हणते, प्रश्न असेच तर सुटतात. स्वतः पुढाकार घेतला, स्वतः चा दृष्टिकोन बदलला की जगही बदलतं. तेही छान दिसायला लागतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी आपण आपल्याला छान वाटू लागतो. आपण आपल्या प्रेमात पडतो.

विद्या बालनला छळत होतं वाढणारं वजन.. यातून सुटण्याचा मार्ग तिनेच शोधला !

विद्याने लहानपणापासून तिला छळणारा प्रश्न असा सोडवला आहे.