अवघ्या विशीतच केस झालेत पांढरे? तज्ज्ञांचा सल्ला, ६ सवयी बदला-म्हातारपणापर्यंत केस राहतील काळेभोर

Updated:February 27, 2026 19:21 IST2026-02-26T18:00:16+5:302026-02-27T19:21:02+5:30

Prevent early grey hair naturally : Foods to stop grey hair : योग्य पोषण, नैसर्गिक घटक आणि सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने केस अकाली पांढरे होण्याची समस्या होते दूर...

अवघ्या विशीतच केस झालेत पांढरे? तज्ज्ञांचा सल्ला, ६ सवयी बदला-म्हातारपणापर्यंत केस राहतील काळेभोर

आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या आपल्यापैकी बऱ्याचजणांना त्रास देते. बदलती लाईफस्टाईल, ताण-तणाव, चुकीचा आहार, झोपेची कमतरता आणि प्रदूषण यांसारख्या अनेक कारणांमुळे तरुण वयातच केसांचा (Prevent early grey hair naturally) नैसर्गिक काळेपणा कमी होताना दिसतो. पांढरे केस दिसू लागले की अनेकजण लगेच मेहेंदी, हेअर डाय किंवा केमिकलयुक्त हेअर कलरचा वापर करतात; मात्र अशा उपायांचा वारंवार वापर केल्याने केस कोरडे, कमजोर आणि निर्जीव होण्याची शक्यता वाढते. पण हे तात्पुरते उपाय केसांचे नैसर्गिक सौंदर्य आणि आरोग्य कायमचे हिरावून घेऊ शकतात.

अवघ्या विशीतच केस झालेत पांढरे? तज्ज्ञांचा सल्ला, ६ सवयी बदला-म्हातारपणापर्यंत केस राहतील काळेभोर

योग्य पोषण, नैसर्गिक घटक आणि काही सोपे घरगुती उपाय (Foods to stop grey hair) यांच्या मदतीने केस अकाली पांढरे होण्याची समस्या कमी करता येऊ शकते, असे न्यूट्रिशनिस्ट सांगतात. केसांना बाहेरून रंगवण्यापेक्षा ते मुळापासून काळे (Diet for grey hair reversal) आणि निरोगी राहण्यासाठी आतून पोषण मिळणे जास्त महत्त्वाचे असते. न्यूट्रिशनिस्ट रुची चावडा अशा ६ घरगुती उपायांबद्दल सांगत आहेत, जे केसांना आतून पोषण देऊन अकाली पांढरे होणाऱ्या केसांचा वेग कमी करण्यास मदत करू शकतात.

अवघ्या विशीतच केस झालेत पांढरे? तज्ज्ञांचा सल्ला, ६ सवयी बदला-म्हातारपणापर्यंत केस राहतील काळेभोर

आवळा केसांमधील नैसर्गिक रंगद्रव्य (Natural Pigment) सुरक्षित ठेवण्यास मदत करतो. १ ते २ चमचे ताज्या आवळ्याचा रस किंवा अर्धा चमचा आवळा पावडर कोमट पाण्यात मिसळून प्या. शक्यतो हा उपाय सकाळी रिकाम्या पोटी केल्यास उत्तम. हे केसांना अकाली कमकुवत होण्यापासून आणि पांढरे होण्यापासून वाचवण्यासाठी मदत करतात.

अवघ्या विशीतच केस झालेत पांढरे? तज्ज्ञांचा सल्ला, ६ सवयी बदला-म्हातारपणापर्यंत केस राहतील काळेभोर

काळे तीळ केसांच्या मुळांना पोषण देऊन मेलॅनिन निर्मितीला (Melanin Formation) मदत करतात. १ चमचा काळे तीळ रोज हळूहळू चावून खा किंवा अन्नपदार्थांमध्ये मिसळून घ्या. हा उपाय केसांची वाढ आणि रंग या दोन्ही गोष्टी मजबूत बनवण्यास मदत करतो. रोज सकाळी किंवा दुपारी एक चमचा काळे तीळ चावून खाणे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते.

अवघ्या विशीतच केस झालेत पांढरे? तज्ज्ञांचा सल्ला, ६ सवयी बदला-म्हातारपणापर्यंत केस राहतील काळेभोर

कडीपत्त्यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे हेअर फॉलिकल्सना पोषण देतात. रोजच्या आहारात कडीपत्त्याचा समावेश करा किंवा कडीपत्ता घालून बनवलेले ताक प्या. कढीपत्ता केसांच्या मुळांना मजबूत करतो आणि अकाली पांढरे होणाऱ्या केसांचा (Premature Greying) वेग मंदावतो. रोज कडीपत्त्याची ८ ते १० ताजी पाने चावून खा किंवा अन्नामध्ये (फोडणीत) टाका. कडीपत्त्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स केसांचे आरोग्य आणि सौंदर्य वाढवण्यास मदत करतात.

अवघ्या विशीतच केस झालेत पांढरे? तज्ज्ञांचा सल्ला, ६ सवयी बदला-म्हातारपणापर्यंत केस राहतील काळेभोर

अळशी ताणतणाव (Stress) आणि सूज (Inflammation) यामुळे केसांचे पांढरे होणे कमी करण्यास मदत करते. दररोज १ चमचा भाजलेल्या अळशीची पावडर दही, डाळ किंवा कोमट पाण्यात मिसळून घ्या. हे स्काल्पच्या आरोग्यासाठी (Scalp Health) आणि हार्मोनल संतुलनासाठी अत्यंत फायदेशीर असते.

अवघ्या विशीतच केस झालेत पांढरे? तज्ज्ञांचा सल्ला, ६ सवयी बदला-म्हातारपणापर्यंत केस राहतील काळेभोर

तांबे हे मेलॅनिन निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असलेले खनिज आहे. तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले पाणी सकाळी प्यावे. सकाळी १ ग्लास पाणी पिणे पुरेसे आहे. हे पाणी मर्यादित प्रमाणातच प्यावे, याची काळजी घ्यावी. हे केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास मदत करते.

अवघ्या विशीतच केस झालेत पांढरे? तज्ज्ञांचा सल्ला, ६ सवयी बदला-म्हातारपणापर्यंत केस राहतील काळेभोर

पांढरे झालेले केस पुन्हा नैसर्गिक काळ्या रंगात येणे ही कोणतीही जादू नसून, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या घरगुती उपायांचा दररोज वापर केल्यास साधारण ३ ते ६ महिन्यांत त्याचा चांगला परिणाम दिसून येऊ शकतो. संयम, योग्य आहार आणि लाईफस्टाईलमध्ये केलेले सकारात्मक बदल हेच या समस्येवरचे सोपे आणि फायदेशीर उपाय आहेत.