lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > परीक्षा आहे म्हणून आईबाबा मुलांचा मोबाइल हिसकावून घेतात? त्याच फायदा होतो की तोटा?

परीक्षा आहे म्हणून आईबाबा मुलांचा मोबाइल हिसकावून घेतात? त्याच फायदा होतो की तोटा?

आईबाबाच मुलांना मोबाइल घेऊन देतात आणि तो वापरु नको म्हणतात, या प्रश्नाचं करायचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2024 08:00 AM2024-04-05T08:00:00+5:302024-04-05T08:00:02+5:30

आईबाबाच मुलांना मोबाइल घेऊन देतात आणि तो वापरु नको म्हणतात, या प्रश्नाचं करायचं काय?

Why do parents take their kids phone away? Exam and Mobile phone use, punishment for time management | परीक्षा आहे म्हणून आईबाबा मुलांचा मोबाइल हिसकावून घेतात? त्याच फायदा होतो की तोटा?

परीक्षा आहे म्हणून आईबाबा मुलांचा मोबाइल हिसकावून घेतात? त्याच फायदा होतो की तोटा?

Highlightsचर्चेतून जबाबदारी मुलांसाठीही ठरवायला हवी. आपला स्वत:चा मोबाइल वापर किती आहे हे पालकांनी पहायला हवं.

डाॅ. श्रुती पानसे

परीक्षा आहे म्हणून फोन काढून घेतला आहे, आता मित्रांशी कसं बोलू? अनेक मुलं आता चिडतात. आईबाबा अभ्यास कर म्हणत त्यांचा स्मार्टफोन काढून घेतात. त्यापायी घरोघर भांडणं होतात. मुलं रडतात. पूर्वी पालक टीव्ही आणि केबल बंद करत आता फोन काढून घेतात. आता मूळ प्रश्न पालकांनी असं करावं का? जर कोणेएकेकाळी विशेषत कोरोना काळात ऑनलाइन अभ्यास करण्यासाठी पालकांनी मुलांना  फोन घेऊन दिला, मग आत्ताच तो मोबाइल अचानक व्हिलन कसा ठरला?

मुलं काय करतात?

१. खूप जास्त वेळ मोबाईलवर वेळ वाया घालवतात.
२. गेम्स खेळण्यात वेळ घालवतो.
३. उगाचच काही बाही बघत कधी मित्रांशी / मैत्रिणींशी खूप वेळ गप्पा मारत बसतात.
४. एकदा मोबाईल हातात घेतला की त्यात किती वेळ गेला याचं  भानच राहत नाही. अर्धा तास – एक तास सुद्धा कसा गेला हे समजत नाही.
५. अशा काही कारणांसाठी आईबाबांना हातातला मोबाईल काढून घ्यावा लागतो. कारण अभ्यासात एकाग्रता राहत नाही.

 

(Image :google)
 

मोबाइल महत्त्वाचा की.. 

महत्वाच्या एखाद्या विषयावर मित्रांशी बोलायचं असेल, त्यांना काही विचारायचं असेल किंवा त्यातली पीडीएफ बघायची असेल तर आईबाबांना सांगा. त्यासाठी पालकांनी नक्की फोन द्यायला हवा मात्र काम झाल्याक्षणी फोन जागेवर ठेवून अभ्यासाला बसा. ते होत नाही म्हणून आईबाबा रागावतात.
सर्वात महत्वाचं म्हणजे जी गोष्ट आपलं नुकसान करते ती बाजूला ठेवायची असते. आणि जी गोष्ट फायद्याची असते तिला जपायचं असतं. मग आता कोणती गोष्ट आपल्या फायद्याची आहे आणि कोणती नुकसान करू शकते, हे आईबाबांनी मुलांना सांगून त्यांच्याशी चर्चेतून मोबाइल वापर ठरवायला हवा.  हिसकावला -बंदी घातली की मुलं चिडतात. चर्चेतून जबाबदारी मुलांसाठीही ठरवायला हवी. आपला स्वत:चा मोबाइल वापर किती आहे हे पालकांनी पहायला हवं.


(लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.)
shruti.akrodcourses@gmail.com

Web Title: Why do parents take their kids phone away? Exam and Mobile phone use, punishment for time management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.