Join us

दूधाचा ग्लास घेऊन मुलांच्या मागे पळता? १ उपाय- विकतच्या पावडरींपेक्षाही भारी चव-मुलांना आवडेलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2025 18:23 IST

What To Add To Kids Milk?: नुसतं दूध प्यायला मुलं नको म्हणत असतील, त्यांना साध्या प्लेन दुधाची चव आवडत नसेल तर हे काही उपाय करून बघाच..(home made milk powder for kids)

ठळक मुद्देमुलं त्या पावडरशिवाय दूध पितच नाहीत. पावडर बंद केल्या तर मुलांचं दूध पिणंच बंद होऊन जातं. असं होऊ नये म्हणून....

काही मोजके अपवाद सोडले तर बहुतांश मुलांना दुधामध्ये साखर आणि बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या पावडर घातलेलंच दूध प्यायला आवडतं. साखरेचं एकवेळ ठिक आहे, पण बाजारात दुधात मिसळण्यासाठी ज्या कोणत्या पावडर मिळतात त्या पावडरींमध्ये खूप जास्त प्रमाणात साखर असते. ते मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नसतेच. पण मुलं मात्र त्या पावडरशिवाय दूध पितच नाहीत. अगदी दुधाचा एक थेंबही तोंडात घेत नाहीत. पावडर बंद केल्या तर मुलांचं दूध पिणंच बंद होऊन जातं. असं होऊ नये म्हणून हे काही उपाय करून पाहा. वेगवेगळ्या पावडर मिसळलेलं दूध पिणं मुलं हळूहळू विसरून जातील.(What to add to kids milk?)

विकतच्या पावडरींऐवजी मुलांना दुधात काय घालून द्यावं?

 

आपल्या घरात असे काही पदार्थ असतात ज्यांचा वापर करून आपण मुलांसाठी खूप उत्तम चवीची दुधात मिसळण्याची पावडर तयार करून शकतो.

हा उपाय करण्यासाठी काजू, बदाम, भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया, अक्रोड असे सगळे पदार्थ एकसारख्या प्रमाणात घ्या.

रोज घासूनही बाथरुमच्या टाईल्सचा पिवळेपणा जात नाही? १ सोपी ट्रिक- १० मिनिटांत बाथरुम स्वच्छ

यामध्येच तुम्ही थोडे मखानाही घालू शकता. आता हे सगळे पदार्थ गॅसवर कढई ठेवून थोडे भाजून घ्या. भाजून घेतलेले पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये घाला आणि त्याची अगदी बारीक पावडर करून घ्या. 

आता ही पावडर एका भांड्यात काढा आणि त्या पावडरमध्ये दोन ते तीन चमचे साखर नसलेली प्लेन कोको पावडर घाला.

 

सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि ही पावडर एका डब्यामध्ये भरून ठेवा. मुलांना गरम दुधात ही पावडर टाकून द्या. कोको पावडरमुळे दुधाचा फ्लेवरही बदलेल आणि भरपूर पौष्टिक पदार्थ त्यांच्या पोटात जातील.

एरवी कधीही न मिळणारे 'हे' दागिने आता बाजारात आले आहेत! पटकन बघा- लगेच घ्या..

दुसरा उपाय म्हणजे ही पावडर दुधामध्ये घाला आणि त्यावर व्हॅनिला इसेन्सचे काही थेंब घाला. व्हॅनिला फ्लेवरमुळेही दुधाची मुळ चव बदलली जाईल आणि ही बदललेली चव मुलांना आवडेल. सुरुवातीला त्रास देतील, पण हळूहळू त्यांनाही सवय लागेल आणि नंतर तर विकतच्या पावडरींची आठवणही येणार नाही. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंदूधआरोग्यहेल्थ टिप्सअन्नपाककृती