Join us

डॉक्टरांचा महत्वाचा सल्ला, मुलांच्या झोपण्याची ‘हीच’ वेळ याेग्य, नाहीतर खुंटते वाढ -थांबतो विकास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2025 14:12 IST

What Is The Right Time For Children To Sleep To Accelerate Brain Growth Know From Doctor : How Much Sleep Do Kids Need : Healthy sleep for your child : मुलांना नेमके रात्री किती वाजता झोपवावे असा प्रश्न प्रत्येक पालकांना पडतोच, पाहा डॉक्टर काय सांगतात...

लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत पुरेशी झोप ही सगळ्यांनाचं तितकीच गरजेची असते. खरंतर, मुलांच्या झोपेची वेळ आणि त्याची गुणवत्ता त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असते. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांना विशिष्ट प्रमाणात झोप आवश्यक असते, ज्यामुळे त्यांचे शरीर आणि मेंदू योग्य प्रकारे कार्य करू (What Is The Right Time For Children To Sleep To Accelerate Brain Growth Know From Doctor) शकतात. लहान मूल जन्माला आल्यानंतर दिवसांतील कित्येक तास झोपूनच असते. या झोपेमुळेच त्यांची वाढ होते असं म्हटलं जात. जसजसे मूल मोठे (How Much Sleep Do Kids Need) होते तशी त्याची झोप कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत, जसं मूल मोठे होतं तसं ते झोपतं तेवढाच वेळ काय ते घर शांत असत... नाहीतर मूल दिवसभर दंगा, मस्ती करतात. परंतु मुलांना नेमके रात्री किती वाजता झोपवावे असा प्रश्न प्रत्येक पालकांना पडतोच(Healthy sleep for your child).

मुलं दिवसभर शाळा आणि इतर ॲक्टिव्हिटी करून दमतात, त्यातही शाळा - क्लासच्या वेळा असं सगळं सांभाळून मुलांची पुरेशी झोप होणे देखील तितकेच गरजेचे असते. मुलांना रात्री नेमके किती वाजता झोपवावे, जेणेकरून त्यांची झोप पूर्ण होईल आणि त्यांना दुसऱ्या दिवशी उठल्यावर फ्रेश वाटेल, असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर यावर डॉक्टर नेमकं काय सांगतात ते पाहूयात..   

मुलांच्या झोपण्याची योग्य - वेळ कोणती ? 

बालरोगतज्ज्ञ डॉ. पवन मांडविया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन मुलांच्या झोपेचे महत्त्व याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते सांगतात की, मुलांना रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान झोपवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण यावेळी शरीरातील ग्रोथ हार्मोन्स हे अधिक जास्त प्रमाणात स्रवतात.  

डॉ. मांडविया यांच्या मते, मुलांच्या झोपेची वेळ आणि त्याची गुणवत्ता त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर मुलांना या वेळेत गाढ झोप मिळाली, तर त्यांचे शरीर आणि मेंदू योग्य प्रकारे कार्य करू शकतात, ज्यामुळे त्यांचा विकास सुरळीतपणे होतो.

मूल झालं -घरी बस, दीपिका पादूकोण-राधिका आपटेलाही असे सल्ले मिळतात, करिअर की मातृत्व निवड एकच...

शिल्पा शेट्टी ते सारा अली खान : अभिनेत्री पितात 'हे' मॉर्निंग ड्रिंक, त्यांच्या परफेक्ट फिगरचे सिक्रेट!

त्याचप्रमाणे, झोपेच्या कमतरतेमुळे मुलांना चिडचिड, थकवा आणि कमकुवतपणा जाणवतो, तसेच गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची आणि शिकण्याची क्षमता देखील कमी होते. यासाठीच, मुलांच्या झोपेची योग्य वेळ ठरवणे आणि त्यानुसार दिनचर्या आखणे आवश्यक आहे.  

मुलांना लवकर झोप येण्यासाठी काय करावे ? 

डॉक्टरांच्या मते, मुलांना झोपवणे फार कठीण काम असते. यासाठीच, त्यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत ज्या अनेक पालकांना फायदेशीर ठरु शकतील. 

१. झोपण्याचे टाईमटेबल तयार करा :- मुलांच्या झोपण्याची एक निश्चित वेळ ठरवा. या वेळेपर्यंत त्यांनी झोपी जाणे गरजेचे असे असा नियमच तयार करा. दररोज झोपण्याचे हेच टाईमटेबल फॉलो केल्याने, मुलांच्या शरीराला आणि मनाला झोपण्याची वेळ झाल्याचा संकेत मिळतो आणि ते झोपी जातात. 

२. झोपण्याचे वातावरण तयार करा :- झोपण्यापूर्वी खोलीतील लाईट बंद करा आणि खोलीत पूर्णपणे अंधारात ठेवा. जाड आणि चांगले पडदे वापरा जेणेकरून बाहेरचा प्रकाश आत येऊ शकणार नाही. यामुळे मुलांना झोपण्यासाठी योग्य वातावरण तयार होते. 

३. गॅझेट्सपासून लांब राहा :- झोपण्याच्या किमान २ तास आधी मुलांना मोबाईल, टीव्ही किंवा टॅबलेट वापरू देऊ नका. हे गॅझेट्स मुलांचे मन आणि मेंदू ॲक्टिव्ह ठेवतात, ज्यामुळे त्यांना झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

४. खेळणे आवश्यक :- मुलांसाठी दिवसातून किमान एक तास बाहेर खेळणे आवश्यक आहे. यामुळे त्यांची ऊर्जा योग्य दिशेने खर्च होते आणि थकव्यामुळे ते लवकर झोपी जातात.

५. योग्य कपडे :- मुलांचे झोपतानाचे कपडे हलके, मऊ आणि सैल असावेत जेणेकरून त्यांना झोपताना अस्वस्थ वाटू नये.

६. दुपारची जास्त वेळ झोप टाळा :- या सर्वांव्यतिरिक्त, डॉक्टर म्हणतात की २ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी, दुपारची खूप जास्त झोप देखील रात्रीच्या झोपेत व्यत्यय आणू शकते. म्हणून, दुपारी मुलांना जास्त वेळ झोपू देऊ नका.

टॅग्स :पालकत्वलहान मुलंआरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स