Lokmat Sakhi >Parenting > वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत मुलांनी आई- वडिलांजवळच झाेपणं याेग्य असतं? तज्ज्ञ सांगतात...

वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत मुलांनी आई- वडिलांजवळच झाेपणं याेग्य असतं? तज्ज्ञ सांगतात...

Parenting Tips About Co-sleeping With Kids: वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत मुलांनी आई-वडिलांजवळच आणि विशेषकरून आईजवळच झोपणं योग्य असतं, बघा याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2024 12:30 PM2024-01-19T12:30:18+5:302024-01-19T12:31:07+5:30

Parenting Tips About Co-sleeping With Kids: वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत मुलांनी आई-वडिलांजवळच आणि विशेषकरून आईजवळच झोपणं योग्य असतं, बघा याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती...

Up to what age should children sleep with their parents? Parenting Tips About Co-sleeping With KidsExperts say... | वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत मुलांनी आई- वडिलांजवळच झाेपणं याेग्य असतं? तज्ज्ञ सांगतात...

वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत मुलांनी आई- वडिलांजवळच झाेपणं याेग्य असतं? तज्ज्ञ सांगतात...

Highlightsआपण जाणतोच की परदेशात अगदी २ ते ३ वर्षांच्या मुलांनाही रात्री स्वतंत्र खोलीत झाेपवलं जातं. पण असं करणं खरंच योग्य आहे की अयोग्य?

वयाचा एक विशिष्ट टप्पा असतो, तो गाठेपर्यंत मुलांनी आपल्या पालकांजवळ झोपणं गरजेचं असतं. त्यानंतर  मात्र मुलांच्या आयुष्यात असंही एक वळण येतं, जिथून पुढे त्यांनी स्वतंत्रपणे झोपण्याची गरज असते. यासाठी वेगळी खोलीच पाहिजे, असं नाही. पण अंथरुणं, गादी मात्र वेगवेगळी असणं गरजेचं आहे. आपण जाणतोच की परदेशात अगदी २ ते ३ वर्षांच्या मुलांनाही रात्री स्वतंत्र खोलीत झाेपवलं जातं. पण असं करणं खरंच योग्य आहे की अयोग्य तसेच मुलांनी वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत आई- वडिलांजवळ झोपावं अशा मुलांबाबतच्या शंका तुमच्याही मनात असतील, तर तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती एकदा बघायला पाहिजे.(Parenting Tips About Co-sleeping With Kids)

 

याविषयीचा एक व्हिडिओ mickey_mehta या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये डॉक्टर सांगतात की वयाच्या सातव्या वर्षीपर्यंत मुलांचे मिरर न्यूरोन्स अतिशय संवेदनशील असतात.

आयरा खान म्हणते नुपूरने प्रपोज केल्यावर पहिल्यांदा त्याला ठामपणे 'नाही' सांगितलं होतं, कारण......

त्यामुळे आजुबाजुला होणाऱ्या सगळ्या घटना ते झोपेतही अनुभवत असतात. यामुळे मग बऱ्याचदा मुलं रडत- रडत उठतात, स्वप्नात घाबरल्यामुळे अंथरुण ओले करतात. अशावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई असेल तर ती मुलाला लगेच हाताने थोपटते. आईचा तो स्पर्श मुलांना आधार देतो आणि त्यांना पुन्हा शांत झोप लागण्यास मदत होते. सातव्या वर्षीनंतर मात्र मुलांना हळूहळू एकटं झोपविण्याची सवय केली तरी हरकत नाही.

 

परदेशात किंवा आपल्याकडे भारतातही ज्या मुलांना खूपच कमी वयात आई- वडील एकटं झोपवतात, त्या बहुतांश मुलांच्या मनात एक प्रकारची भीती, असुरक्षितता, काही गोष्टींचा फोबिया दिसून येतो.

तंदुरी चहा ते दह्यासाठी मटका- बघा संक्रांतीच्या सुगड्यांचे कसे करायचे एकापेक्षा एक भन्नाट उपयोग

अशी मुलं रात्री दचकून उठण्याचे किंवा त्यांनी अंथरुण ओले करण्याचे प्रमाणही जास्त असते, असं काही अभ्यासावरून दिसून आलं आहे, असंही तज्ज्ञ सांगतात. 
 

Web Title: Up to what age should children sleep with their parents? Parenting Tips About Co-sleeping With KidsExperts say...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.