Join us

कम्प्युटरपेक्षा जास्त वेगानं चालेल मुलांचं डोकं, ४ सोपे उपाय- एकाग्रता वाढेल आणि मुलं होतील स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 18:44 IST

4 Remedies For Improving Kids Concentration And Memory: मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी रामदेव बाबा यांनी काही उपाय सुचविले आहेत..(how to boost kids memory?)

ठळक मुद्देमुलं अभ्यासाला बसली तरी त्यांचं त्याकडे मुळीच लक्ष नसतं. कारण त्यांचं मन एकाग्र होतच नाही. यामुळे मग परीक्षेतही कमी गूण मिळतात.

दोन ते अडीच महिन्यांची उन्हाळी सुट्टी संपून आता पुन्हा एकदा शाळांना सुरुवात झाली आहे. शाळा सुरु झाल्या की त्यापाठोपाठ अभ्यास, परीक्षा असं सुरू होतंच. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुलांना अभ्यासाला बसवणं, त्यांच्याकडून योग्य ते पाठांतर करून घेणं हे काम आता पालकांच्या मागे पुन्हा सुरू झालंच आहे. काही मुलं मुळातच समजूतदार आणि अभ्यासाची आवड असणारे असतात. त्यामुळे त्यांना वारंवार अभ्यासाला बसण्याविषयी सांगावं लागत नाही. पण बहुतांश पालकांचा मात्र असा अनुभव आहे की मुलांकडून अभ्यास करून घेताना त्यांना फार कसरत करावी लागते. मुलं अभ्यासाला बसली तरी त्यांचं त्याकडे मुळीच लक्ष नसतं. कारण त्यांचं मन एकाग्र होतच नाही. यामुळे मग परीक्षेतही कमी गूण मिळतात (how to boost kids memory?). असं तुमच्या मुलांच्या बाबतीतही नेहमीच होत असेल तर रामदेव बाबा सांगतात ते काही उपाय करून पाहा.(Ramdev Baba suggests 4 remedies for improving kids concentration and memory) 

मुलांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी काय उपाय करावे?

 

१.  भ्रस्त्रिका प्राणायाम

रामदेव बाबा सांगतात की मुलांचा आळस दूर करण्यासाठी हे प्राणायाम खूप उपयुक्त ठरतं. या प्राणायामुळे मेंदूला चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे शरीरात एक उर्जा निर्माण होते. याशिवाय एकाग्रता वाढविण्यासाठीही भ्रस्त्रिका प्राणायाम उपयुक्त ठरतं.

उदबत्ती, लिक्विड कशाचीच गरज नाही! फक्त १ रोप लावा- घरातले सगळे डास होतील गायब

२. अनुलोम विलोम

काही मुलं खूपच चंचल असतात. त्यांचं लक्ष अजिबातच कशात लागत नाही. त्यामुळे मग अभ्यासाला बसली तरी ती सारखं उठतात. एकाजागी मुळीच बसत नाहीत. अशा मुलांचं मन शांत करून त्यांची एकाग्रता वाढावी यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम उपयुक्त ठरतं.

 

३. भ्रामरी प्राणायाम

काही मुलांना अभ्यासाला बसलं की ताण येतो. ते खूप टेन्शन घेऊन अभ्यास करतात. त्यामुळे मग मनात सतत भीती असल्याने त्यांनी कितीही पाठांतर केलं तरी ते त्यांच्या लक्षात राहात नाही. अशा मुलांच्या मनावरचा ताण, भीती कमी करण्यासाठी त्यांच्याकडून नियमितपणे भ्रामरी प्राणायाम करून घ्यावं.

केस एवढे गळतात की टक्कल पडण्याची भीती वाटते? 'हे' पाणी वापरा- केस गळणं थांबेल

४. सर्वांगासन

सर्वांगासन नियमितपणे केल्यानेही मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती, उर्जा वाढण्यासाठी मदत हाेते. कारण ते केल्याने मेंदूला खूप चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मिळते. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंविद्यार्थीयोगासने प्रकार व फायदेसाधना