lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > मुलांना 'ढ' बनवतात पालकांच्या या सवयी; मुलं मागे पडू नयेत यासाठी मनोविकारतज्ज्ञ सांगतात....

मुलांना 'ढ' बनवतात पालकांच्या या सवयी; मुलं मागे पडू नयेत यासाठी मनोविकारतज्ज्ञ सांगतात....

How To Raise Successful Kids : पालकांनी चांगले संस्कार द्यायला हवेत असं त्या सांगतात. डॉक्टर माला यांनी सांगितलेल्या काही पेरेंटींग टिप्स फायदेशीर ठरतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 01:43 PM2024-05-09T13:43:42+5:302024-05-09T13:48:12+5:30

How To Raise Successful Kids : पालकांनी चांगले संस्कार द्यायला हवेत असं त्या सांगतात. डॉक्टर माला यांनी सांगितलेल्या काही पेरेंटींग टिप्स फायदेशीर ठरतील.

How To Raise Successful Kids : Psychologist Doctor Mala Give Tips On How To Raise A Successful Child | मुलांना 'ढ' बनवतात पालकांच्या या सवयी; मुलं मागे पडू नयेत यासाठी मनोविकारतज्ज्ञ सांगतात....

मुलांना 'ढ' बनवतात पालकांच्या या सवयी; मुलं मागे पडू नयेत यासाठी मनोविकारतज्ज्ञ सांगतात....

मुलांसाठी आणि वडीलांचे प्रेम खूपच मौल्यवान असते पण जगात आई वडीलांइतकं प्रेम कोणीही करू शकत नाही.  (Parenting Tips In Marathi) अनेकदा आई-वडीलांनी जास्त लाड केल्यामुळे मुलं बिघडतात. आपल्या मुलांबाबत आई वडील ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतात आणि प्रेम व्यक्त करतात. (Psychologist Doctor Mala Give Tips On How To Raise A Successful Child)

सायकोलॉजिस्ट डॉक्टर माला वोहरा यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्या व्हिडीओमध्ये दाखवले आहे की मुलांचे पालनपोषण कसे करायला हवे. पालकांनी चांगले संस्कार द्यायला हवेत असं त्या सांगतात. डॉक्टर माला यांनी सांगितलेल्या काही पेरेंटींग टिप्स फायदेशीर ठरतील. (How To Raise A Successful Child)

डॉक्टर माला यांनी व्हिडिओमध्ये सांगितले की आई वडील आपल्या मुलांची सगळी कामं स्वत: करतात. मुलांना आपल्या हाताने भरवतात पण मुलांना जसजसं कळायला लागतं तसतसं त्यांना स्वत: काम करायला शिकवा. जेणेकरून मुलं प्रत्येकवेळी कोणावर अवलंबून राहणार नाहीत.

डॉक्टर सांगतात की आई वडीलांना आपल्या मुलांना यशस्वी बनवायचे असेल तर त्यांना स्वत:ची काम स्वत: करण्याची सवय लावा. ज्यांना जबाबदार आणि आत्मनिर्भर बनवा. मुलांना समजावून सांगा. ६ वर्षांची मुलं स्वत:चे कपडे स्वत: घालू शकते. या कामात मदत करायला हवी. सायकोलॉजिस्ट मालाने सांगितले की मुलांचं प्रत्येक काम तुम्ही करणं बंद करा.  मुलांना कपडे घालणं येत नसेल तर त्यांना स्वत: शिकवा. 

प्रत्येक स्थितीत प्रत्येक जागी मुलांसोबत तुम्ही तिथे राहू शकत नाही. अशावेळी मुलांना अभ्यासासाठी तयार करा. मुलांना जबाबदारी समजावून सांगा.  त्यांन आत्मनिर्भर बनवा. खाण्याची प्लेट ठेवा आणि स्वत: पाणी घ्या. काही बेसिक स्किल्स तुम्हाला मोटिव्हेट करण्यास मदत करतील.

सतत विचार येतात-चित्त थाऱ्यावर नाही? जया किशोरी सांगतात आनंदी राहण्याचा मंत्र; बदलेल जीवन

मुलं जर स्टडी टेबलवर अभ्यास करत असतील त्यांना स्टडी टेबल स्वत: साफ करायला सांगा.  यामुळे मुलांना चांगले फिल होईल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल. मुलांना काम करण्यास अडचण येत असेल त्यांना मार्गदर्शन करा आणि स्वत:चे काम स्वत करा.  मुलांना त्यांची खेळणी व्यवस्थित लावून ठेवायला सांगा. 

Web Title: How To Raise Successful Kids : Psychologist Doctor Mala Give Tips On How To Raise A Successful Child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.