Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > जास्ती स्क्रीन टाइममुळे तरूणांना डिजिटल डिमेंशियाचा धोका, पाहा २०-२०-२० चा फॉर्म्यूला कसा करेल मदत

जास्ती स्क्रीन टाइममुळे तरूणांना डिजिटल डिमेंशियाचा धोका, पाहा २०-२०-२० चा फॉर्म्यूला कसा करेल मदत

Digital Dementia : डिजिटल डिमेंशिया ही एकप्रकारची मेंदूसंबंधी समस्या आहे, ही समस्या जे लोक जास्त वेळ स्क्रीन बघतात त्यांना होते. अशात जाणून घेऊया की, डिमेंशियामुळे काय होतं आणि यापासून बचाव करण्यासाठी उपाय काय आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 10:40 IST2026-04-08T10:11:43+5:302026-04-08T10:40:17+5:30

Digital Dementia : डिजिटल डिमेंशिया ही एकप्रकारची मेंदूसंबंधी समस्या आहे, ही समस्या जे लोक जास्त वेळ स्क्रीन बघतात त्यांना होते. अशात जाणून घेऊया की, डिमेंशियामुळे काय होतं आणि यापासून बचाव करण्यासाठी उपाय काय आहे. 

More screen time and no exercise may push you to digital dementia, know how to prevent it | जास्ती स्क्रीन टाइममुळे तरूणांना डिजिटल डिमेंशियाचा धोका, पाहा २०-२०-२० चा फॉर्म्यूला कसा करेल मदत

जास्ती स्क्रीन टाइममुळे तरूणांना डिजिटल डिमेंशियाचा धोका, पाहा २०-२०-२० चा फॉर्म्यूला कसा करेल मदत

Digital Dementia : कॉम्प्युटर असो, लॅपटॉप असो वा मोबाइल असो या सगळ्यांच्या स्क्रीनमध्ये तासंतास डोकं घालून बसणं ही अनेकांनी सवय झाली आहे. आपणही जर कामासाठी किंवा टाइमपाससाठी तासंतास स्क्रीन बघत असाल आणि यादरम्यान कोणतीही शारीरिक हालचाल करत नसाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जसे की, फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्रामवर सतत स्क्रोल करत राहणे ही तरूणांमध्ये वाढणारी एक मोठी समस्या आहे. ही सवय जर जास्त काळ राहिली तर याचा मेंदूवर फार वाईट परिणाम होतो. जास्त स्क्रीन टाइममुळे 'डिजिटल डिमेंशिया' होऊ शकतो. डिजिटल डिमेंशिया ही एकप्रकारची मेंदूसंबंधी समस्या आहे, ही समस्या जे लोक जास्त वेळ स्क्रीन बघतात त्यांना होते. अशात जाणून घेऊया की, डिमेंशियामुळे काय होतं आणि यापासून बचाव करण्यासाठी उपाय काय आहे. 

डिजिटल डिमेंशिया कसा प्रभावित करतो?

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, डिजिटल डिमेंशियामध्ये जास्त वेळ स्क्रीनवर वेळ घालवल्याने मेंदूच्या कॉन्जीनेटिव्ह फंक्शनवर वाईट प्रभाव पडतो. जर व्यक्ती जास्त वेळ स्क्रीन बघत असेल तर यादरम्यान व्यक्तीच्या बसण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडतो. यामुळे आपल्याला आरोग्यासंबंधी वेगवेगळ्यांचा देखील सामना करावा लागतो. यात लठ्ठपणा, स्पाइनमध्ये समस्या या गोष्टींचा समावेश आहे.

डिजिटल डिमेंशिया मुख्यपणे आपल्या मेंदूच्या कॉन्जीनेटिव्ह कार्य विस्कळीत करतो. जर असं झालं तर आपल्याला रोजची कामे करण्यास अडचण येऊ शकते. डिजिटल डिमेंशियाबाबत रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, ही समस्या तरूणांसोबतच वृद्धांना अधिक प्रभावित करू शकते. ही समस्या तरूणांसाठी एक मोठं आव्हान आहे.

कसा कराल बचाव?

डिजिटल डिमेंशियापासून बचाव करण्यासाठी २०-२०-२० चा फॉर्म्यूला डोळ्यांसाठी आणि मेंदूच्या आरोग्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. कोणत्याही स्क्रीनकडे बघत असताना २० मिनिटांनंतर, २० सेकंदाचा ब्रेक घ्या आणि २० फूट दूर असलेल्या वस्तूकडे बघा. या सोप्या उपायाने स्क्रीनमुळे होणारं मानसिक आणि शारीरिक नुकसान टाळण्यास मदत मिळू शकते.

Web Title : ज़्यादा स्क्रीन टाइम से युवाओं को डिजिटल डिमेंशिया का खतरा: बचाव के उपाय

Web Summary : लम्बे समय तक स्क्रीन पर रहने से डिजिटल डिमेंशिया हो सकता है, जो संज्ञानात्मक कार्यों को प्रभावित करता है। इससे एकाग्रता प्रभावित होती है और मोटापा और रीढ़ की समस्याएँ हो सकती हैं। 20-20-20 नियम - 20 मिनट का ब्रेक, 20 सेकंड, 20 फीट की दूरी - मानसिक और शारीरिक नुकसान को रोकने में मदद करता है। यह युवाओं के लिए विशेष रूप से महत्वपूर्ण है।

Web Title : Excessive screen time threatens youth with digital dementia: Prevention tips.

Web Summary : Prolonged screen time can lead to digital dementia, impacting cognitive functions. It affects focus and can cause obesity and spinal issues. The 20-20-20 rule—20-minute breaks, 20 seconds, 20 feet distance—helps prevent mental and physical harm. This is especially important for young people.