आजकाल मानसिक समस्यांचे प्रमाण फार वाढले आहे. लोकांना मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व कळायला लागले आहे. त्यामुळे येणारा ताण किंवा डोक्यात झालेला गुंता ते लपवत नाहीत. (3 solutions will relieve stress and will make daily life easier) ताणतणावावर नियंत्रण कसे करावे, यासाठी तर भरपूर प्रमाणात काम सुरू आहे. कारण डोक्यात जर अति विचार असतील तर, पुढे जाऊन गंभीर आजार होतात. अति ताण घेतल्याने हृदयावर परिणाम होतो. मेंदूवर परिणाम होतो. हे सगळं आपण टाळू शकतो. डोकं शांत ठेवण्यासाठी काही सोपे उपाय आहेत.(3 solutions will relieve stress and will make daily life easier)
१. पाणवठ्या शेजारी बसा
पाण्याचे जे नैसर्गिक उगम स्त्रोत असतात. जसे की तलाव, समुद्र, नदी अशा ठिकाणी फिरायला जा. पाण्याकडे बघितल्यावर मन शांत होतं. पंच महाभुतांपैकी एक म्हणजे पाणी. पाण्याकडे पाहून मन प्रसन्न होते. हा उपाय नक्कीच कामी येतो. पाण्याजवळ जाता येत नसेल तर, घरीच कोमट पाण्यात पाय बूडवून शांत बसून राहा.
२. ऑर्गेनाइजिंग अॅक्टिव्हीटी(3 solutions will relieve stress and will make daily life easier)
घर आवरणे, वस्तूंच्या जागा बदलणे अशा प्रकारची कामे करा. किंवा कपड्यांचा खण आवरा करा. घराची आवराआवरी करा. जेव्हा आपण गोष्टींचे आयोजन करण्यात मन गुंतवतो, तेव्हा आपण डोक्यातून नको ते विचार बाजूला करतो. फार वेगळाच उपाय वाटत असला, तरी फार कामी येते. आजुबाजूला स्वच्छता असेल तर मनही प्रसन्न राहतं.
३. प्राणायाम
डोकं शांत ठेवण्याचा सर्वात मस्त उपाय म्हणजे प्राणायाम. वर्षानुवर्षे प्राणायाम केल्याने लोकांना फायदा झाला आहे. स्वत:च्या श्वासावर लक्ष केंद्रीत करून, प्राणायाम करा. दिवसातून किमान दहा मिनिटे जरी प्राणायाम केला तरी फायदा होईल. मात्र रोज नियमितपणे करा.
खरंतर आपण रोजच्या लहान साहान गोष्टींमध्ये मन रमवून, डोक्यातले नको ते विचार काढून टाकू शकतो. गाणी ऐकायला तर सगळ्यांनाच आवडतं. गाणी ऐका. त्यामुळेही मन , मेंदू दोन्ही आनंदी राहतात. एकदा का समस्या हाताबाहेर गेली की, मग मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याखेरीज उपाय उरत नाही. आपल्याला या समस्या जेवढ्या छोट्या वाटतात तेवढ्या त्या नाहीत. त्यामुळे मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या.