>आरोग्य >गरोदरपण > Miscarriage causes and symptoms : ....म्हणून ८ पैकी एक गर्भवती महिला होते मिसकॅरेजची शिकार; NHS ने सांगितली लक्षणं

Miscarriage causes and symptoms : ....म्हणून ८ पैकी एक गर्भवती महिला होते मिसकॅरेजची शिकार; NHS ने सांगितली लक्षणं

Miscarriage causes and symptoms : नॅशनल हेल्थ सर्विस (NHS)च्या रिपोर्टनुसार मिसकॅरेज होणं ही सामान्य समस्या आहे.  आठपैकी एका गर्भवती महिलेला या समस्येचा सामना करावा लागतो. वाढत्या वयात गर्भधारणा  असल्यास  हा धोकाही वाढत जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 12:03 PM2021-10-21T12:03:12+5:302021-10-21T12:18:55+5:30

Miscarriage causes and symptoms : नॅशनल हेल्थ सर्विस (NHS)च्या रिपोर्टनुसार मिसकॅरेज होणं ही सामान्य समस्या आहे.  आठपैकी एका गर्भवती महिलेला या समस्येचा सामना करावा लागतो. वाढत्या वयात गर्भधारणा  असल्यास  हा धोकाही वाढत जातो.

Miscarriage causes and symptoms in early pregnancy affecting one in eight women | Miscarriage causes and symptoms : ....म्हणून ८ पैकी एक गर्भवती महिला होते मिसकॅरेजची शिकार; NHS ने सांगितली लक्षणं

Miscarriage causes and symptoms : ....म्हणून ८ पैकी एक गर्भवती महिला होते मिसकॅरेजची शिकार; NHS ने सांगितली लक्षणं

Next
Highlights३० वर्षांपेक्षा कमी वयातील १० पैकी एका महिलेला मिसकॅरेजचा सामना करावा लागतो तर ४५ पेक्षा जास्त वयाच्या १० पैकी ५ महिला या समस्येच्या शिकार होतात. 

गर्भधारणा झाल्यानंतर  २४ आठवड्यांच्या आत गर्भ नष्ट होणं याला वैद्यकिय परिभाषेत मिसकॅरेज असं म्हणतात.  ही स्थितीत आई वडील दोघांसाठीही एखाद्या मानसिक धक्क्यापेक्षा कमी नसते. मिसकॅरेजबाबत अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत. मिसकॅरेज नेमकं कोणत्या स्थितीमुळे उद्भवते,  त्याची लक्षणं काय असतात हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. (Miscarriage causes and symptoms)   

गर्भ नष्ट होण्याची किंवा त्याला ईजा पोहोचण्याची अनेक कारणं असू शकतात. पण यासाठी प्रत्येकवेळी  होणाऱ्या बाळाची आईच जबाबदार असेल असं नाही. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये असं दिसून येतं की शेवटची स्टेज येईपर्यंत मिसकॅरेजबाबत आईला काहीही कल्पना नसते. त्यामुळे अचानक गर्भाला धोका पोहोचल्याचं समजताच आईला मानसिक धक्का बसतो. 

साधारणपणे प्रेग्नंसीच्या पहिल्या ३ महिन्यात मिसकॅरेज अनबॉर्न बेबीला उद्भवलेल्या एखाद्या समस्येचा परिणाम असतो. नॅशनल हेल्थ सर्विस (NHS) नं दिलेल्या माहितीनुसार यासाठी भ्रुणातील असामान्य  क्रोमोजोम्सला  जबाबदार ठरवलं जातं.  भ्रणात कमी, जास्त क्रोमोजोम्सची संख्या मिसकॅरेजसाठी कारणीभूत ठरते. कारण अशावेळी भ्रणाचा संपूर्ण विकास होऊ शकत नाही. 

केस फार गळतात; शॅम्पू बदलूनही उपयोग होत नाही? शहनाज हुसैननं सांगितले लांबसडक केसांसाठी उपाय

मिसकॅरेजच्या २ ते ५ टक्के प्रकरणांमध्ये जेनेटिक्सला दोषी ठरवलं जातं.  अनेकदा पार्टनरच्या असामान्य क्रोमोजोम्सबाबत माहिती नसल्यानं ही स्थिती उद्भवते. त्यामुळे प्लेसेंटा विकासात समस्या निर्माण होतात. भ्रुणात रक्ताची कमतरता, पोषक घटकांचा अभाव जाणवतो. तर ३ महिन्यांच्या गर्भधारणेनंतर मिसकॅरेज होत असेल तर कमकवत गर्भाशय, इंफेक्शन, सेक्शुअल ट्रासंमिशन डिसिस, गर्भाशयाचा आकार, पीसीओएस किंवा फूड पॉयजनिंग हे कारण असू शकतं.  

ऐकावं ते नवलंच! लग्नानंतर तब्बल ४५ वर्षांनी घरात पाळणा हलला; ७० वर्षीय आजींनी दिला चिमुकल्याला जन्म

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सतत गर्भपात होण्याची अनेक  कारणं असू शकतात.  ब्लड क्लोटिंग डिसॉर्डर, थायरॉईडची समस्या, सर्वाकल कमकुवतपणा, इम्यून सेल्सचाही प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. वारंवार असा त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच जीवनशैलीत बदल करावेत. 
 

४५ नंतर मिसकॅरेज होण्याची शक्यता जास्त असते.

नॅशनल हेल्थ सर्विस (NHS)च्या रिपोर्टनुसार मिसकॅरेज होणं ही सामान्य समस्या आहे.  आठपैकी एका गर्भवती महिलेला या समस्येचा सामना करावा लागतो. वाढत्या वयात गर्भधारणा  असल्यास  हा धोकाही वाढत जातो. ३० वर्षांपेक्षा कमी वयातील १० पैकी एका महिलेला मिसकॅरेजचा सामना करावा लागतो तर ४५ पेक्षा जास्त वयाच्या १० पैकी ५ महिला या समस्येच्या शिकार होतात. 

काय आहेत मिसकॅरेजची लक्षणं

ब्लिडींग किंवा कपड्यांवर रक्ताचे सौम्य, गडद डाग दिसणं हे मिसकॅरेजचं लक्षणं असू शकतं. पण हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की प्रेग्नंसीच्या पहिल्या तीन महिन्यात ब्लिडींग किंवा ब्लड स्पॉट खूप साधारण आहे.  अशा स्थितीत घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला वेळीच घ्यायला हवा. ओटीपोटात दुखणं, प्रायव्हेट पार्टसमधून स्त्राव होणं मिसकॅरेजचं लक्षण असू शकते. 

Web Title: Miscarriage causes and symptoms in early pregnancy affecting one in eight women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Sexual Health : खूप कमी लोकांना माहीत असतं हॅप्पी Sex लाईफचं 'हे' सिक्रेट; समोर आला रिसर्च - Marathi News | Sexual health : Sex life secrets emotional understanding fantasy in bedroom relationship experts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :....म्हणून पार्टनर कितीही चांगला असला तरी जोडप्यांचं Sex लाईफ खराब असतं; समोर आला रिसर्च

Sexual health : संशोधकांच्यामते सेक्स हा स्वत:सोबत पार्टनरला जाणून घेण्याचा एक मार्ग आहे. संशोधकांनी लैगिंक जीवन चांगलं बनवण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. ...

PCOS ही समस्या नेमकी काय? PCOSमुळे वंध्यत्व येण्याचा धोका असतो? - Marathi News | What exactly is PCOS? Is PCOS a risk factor for infertility? what's treatment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOS ही समस्या नेमकी काय? PCOSमुळे वंध्यत्व येण्याचा धोका असतो?

PCOS ही समस्या जीवनशैली आणि अनुवंशिकता दोन्हीमुळे निर्माण होते, त्यामुळे वेळीच काळजी घ्या. ...

दुपारी झोपावंसं वाटतं, डुलकी लागते? झोपा बिंधास्त; नियम एकच 'वेळेचं' गणित पाळा, मिळवा पॉवर नॅप! - Marathi News | Feeling sleepy in the afternoon, then have Power Nap! read the benefits of power nap | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुपारी झोपावंसं वाटतं, डुलकी लागते? झोपा बिंधास्त; नियम एकच 'वेळेचं' गणित पाळा, मिळवा पॉवर नॅप!

Nap in afternoon: सकाळच्या फर्स्ट हाफमध्ये दणादण सगळी कामं उरकली आणि दुपारचं जेवण झालं की घरी असलेल्या प्रत्येकाला थोडीशी डुलकी (power nap) मारण्याची जाम इच्छा होते.. (benefits of power nap) तुमचंही तसंच होत असेल आणि तुम्ही झोपायचं टाळत असाल, तर हे न ...

रोज प्या 1 ग्लास गाजर-बीट ज्यूस, एक दोन नाही तर मिळतील 14 फायदे - Marathi News | Healthy Drink for winter: Drink 1 glass of carrot-beet juice daily and get 14 benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज प्या 1 ग्लास गाजर-बीट ज्यूस, एक दोन नाही तर मिळतील 14 फायदे

अनेक आरोग्यविषयक समस्यांवर सोपं आणि स्वस्त उत्तर म्हणजे बीट गाजराचं ज्यूस. महागडी सौंदर्य उत्पादनं जे काम करु शकत नाही ते थंडीत रोज एक ग्लास बीट गाजराचं ज्यूस पिल्यानं सहज होतं. बीट गाजराच्या ज्यूसचे फायदे सविस्तर वाचलेत तर चव आवडत नाही म्हणून नाक मु ...

Longevity Test : खुर्चीवर बसल्या बसल्या 'असं' ओळखा तुम्हाला किती आयुष्य मिळणार; तज्ज्ञांनी सांगितली सोपी चाचणी - Marathi News | Longevity Test : How long you will live take the chair test | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खुर्चीवर बसल्या बसल्या 'असं' ओळखा आपण किती वर्ष जगणार; तज्ज्ञांनी सांगितली सोप्पी चाचणी

Longevity Test : खुर्चीवर बसून तुम्ही तुमच्या म्हातारपणाकडे योग्य मार्गाने जात आहात की नाही हे कळू शकते. . याशिवाय तुम्ही किती दिवस जगू शकता हे देखील कळू शकते ...

Gardening Tips : घरच्याघरीच मिळवा फ्रेश, लालबुंद टोमॅटो; 'या' पद्धतीने लावा कुंडीत टोमॅटोचं झाड, मिळवा भरपूर टोमॅटो - Marathi News | Gardening Tips : Kitchen Garden Tips How to grow tomato in home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : घरच्याघरीच मिळवा फ्रेश, लालबुंद टोमॅटो; 'या' पद्धतीने लावा कुंडीत टोमॅटोचं झाड, मिळवा भरपूर टोमॅटो

Gardening Tips : . सध्या टोमॅटो महागलेत. यामुळे घरीच टोमॅटोचं झाड लावण्याचा प्रयत्न एकदा नक्की करून पाहायला हवा. ...