>ब्यूटी > How to stop hair fall : केस फार गळतात; शॅम्पू बदलूनही उपयोग होत नाही? शहनाज हुसैननं सांगितले लांबसडक केसांसाठी उपाय

How to stop hair fall : केस फार गळतात; शॅम्पू बदलूनही उपयोग होत नाही? शहनाज हुसैननं सांगितले लांबसडक केसांसाठी उपाय

How to stop hair fall : कमीत कमी खर्चात घरच्याघरी या टिप्सचा वापर करून तुम्ही सुंदर, लांबसडक केस मिळवू शकता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 11:37 AM2021-10-19T11:37:49+5:302021-10-19T11:44:39+5:30

How to stop hair fall : कमीत कमी खर्चात घरच्याघरी या टिप्सचा वापर करून तुम्ही सुंदर, लांबसडक केस मिळवू शकता. 

How to stop hair fall : Shahnaz hussainsuggest these hair care tips to prevent hair fall | How to stop hair fall : केस फार गळतात; शॅम्पू बदलूनही उपयोग होत नाही? शहनाज हुसैननं सांगितले लांबसडक केसांसाठी उपाय

How to stop hair fall : केस फार गळतात; शॅम्पू बदलूनही उपयोग होत नाही? शहनाज हुसैननं सांगितले लांबसडक केसांसाठी उपाय

Next

केस गळण्याची समस्या सध्या सर्वाधिक महिलांमध्ये उद्भवते. शॅम्पू वापरून वेगवेगळ्या हेअर ट्रिटमेंट्स करूनही फायदा होत नाही.  सध्याची व्यस्त जीवनशैली, खाण्यापिण्यातील अनिमितता, शरीरात पोषक घटकांचा अभाव यामुळे केस गळण्याची समस्या उद्भवते. सौंदर्यतज्ज्ञ शेहनाज हुसैन यांनी केस गळणं थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. कमीत कमी खर्चात घरच्याघरी या टिप्सचा वापर करून तुम्ही सुंदर, लांबसडक केस मिळवू शकता. 

नारळाचं तेल

केसांची चमक आणि आरोग्य राखण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल वापरावे. शहनाज हुसैन ते लावण्याची योग्य पद्धत सांगत आहेत. त्यानुसार, खोबरेल तेल हलके गरम करा. आता या तेलाने टाळूला मसाज करा. हे तेल मुळांपासून केसांच्या टोकापर्यंत चांगले लावा आणि जास्त दाबाने मसाज करू नका. हे तेल एका तासासाठी डोक्यावर ठेवल्यानंतर शॅम्पू करा.

नारळाचं दूध

नारळाचे दूध घ्या आणि त्यात काही थेंब पाणी मिसळा. आता हे मिश्रण तुमच्या डोक्यावर लावा, विशेषत: जेथे केस हलके होत आहेत किंवा जेथे केस वेगाने गळत आहेत. हे मिश्रण रात्रभर टाळूवर सोडा आणि नंतर दुसऱ्या दिवशी केस धुवा. यामुळे तुमच्या डोक्यावर नवीन केसांची वाढही सुरू होईल आणि केस चमकदार, चांगले  होतील. 

शहनाज हुसैन यांच्यामते हेल्दी फॅट्स , खनिजे आणि प्रथिनं केसांच्या चांगल्या वाढीसाठी कारणीभूत ठरतात. नारळाचं तेल किंवा नारळाचं दूध या पोषक तत्वांनी भरपूर असल्यानं तुमचे केस चांगले राहण्यास मदत होईल. नारळाच्या दुधात पोटॅशियम आणि लोह देखील भरपूर प्रमाणात आढळतात. जे केसांचे नुकसान, केस तुटणे आणि केस गळणे नियंत्रित करते. म्हणून, आपण आपल्या केसांमध्ये नारळाचे दूध आणि नारळाचे तेल दोन्ही वापरू शकता.

लसूण

शहनाज हुसैनच्या म्हणण्यानुसार, लसणाच्या काहीपाकळ्या घेऊन त्यांना बारीक करा आणि ही पेस्ट नारळाच्या तेलात मिसळून थोडी गरम करा. जेव्हा हे तेल थंड होईल, तेव्हा ते आपल्या केसांच्या मुळांमध्ये मसाज करा आणि 30 मिनिटे सोडा. नंतर शॅम्पूनं केस स्वच्छ धुवा. लसणामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते, जे केसांना पुन्हा वाढण्यास मदत करते. हे कारण आहे की प्राचीन काळापासून लसणाचा वापर केसांच्या वाढीसाठी औषधांमध्ये केला जात आहे.

कांद्याचा रस

शहनाज सांगतात की कांद्याचा रस योग्य प्रकारे लावल्याने केसांना झटपट फायदा होतो. तुम्ही 1 कांदा चिरून मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घ्या आणि रस काढा. हा रस फक्त 15 ते 20 मिनिटांसाठी केसांच्या मुळांवर लावा आणि नंतर सौम्य शॅम्पू करा. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून दोनदा केसांमध्ये कांद्याचा रस लावा. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तुमचे केस गळणे झपाट्याने कमी होते.

Web Title: How to stop hair fall : Shahnaz hussainsuggest these hair care tips to prevent hair fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Skin Care Tips Winter Care : पिंपल्स, काळपटपणानं चेहरा खराब झालाय? फक्त दह्याचा असा वापर करून मिळवा सॉफ्ट, ग्लोईंग त्वचा - Marathi News | Skin Care Tips Winter Care : Curd makes your face fairer best homemade face pack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पिंपल्स, काळपटपणानं चेहरा खराब झालाय? फक्त 'या' पद्धतीनं दही लावून मिळवा सॉफ्ट, ग्लोईंग त्वचा

Skin Care Tips Winter Care : तुमच्या त्वचेचा रंग खराब झालाय आणि तुम्हाला चेहरा स्वच्छ करायचा असेल तर दही तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. ...

केस पांढरे व्हायला लागलेत, तेलात फक्त 'एक' गोष्ट टाका! लावा हे तेल, केस काळेभोर - Marathi News | White, gray hair at a young age? Just put Bottle Gourd in the oil and apply it on the hair ... the hair will be dark and shiny | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस पांढरे व्हायला लागलेत, तेलात फक्त 'एक' गोष्ट टाका! लावा हे तेल, केस काळेभोर

Gray hair in young age ही समस्या तर आता बहुसंख्य तरूणाईला छळत आहे. कॉलेजमध्ये जाण्याचं, नटण्यामुरड्याचं वय आणि त्यात चक्क पांढरे केस, म्हणजे काय... म्हणूनच तर या समस्येवर हा घ्या नैसर्गिक उपाय.  home remedies for gray hair. ...

थंडीत त्वचा काळवंडली म्हणून टेन्शन आलंय? ५ घरगुती उपाय, त्वचा झटक्यात उजळेल, येईल ग्लो - Marathi News | Tension caused by blackening of skin due to winter? 5 home remedies, skin will glow instantly, glow will come | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत त्वचा काळवंडली म्हणून टेन्शन आलंय? ५ घरगुती उपाय, त्वचा झटक्यात उजळेल, येईल ग्लो

थंडीचा जोर वाढला की त्वचेवर खूप परिणाम होतो आणि त्वचा काळवंडायला सुरूवात होते. काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळविण्यासाठी करून बघा हे सोपे घरगुती उपाय...  ...

कॉटनची साडी चापूनचोपून नेसायची, एकदम स्मार्ट लूक हवा तर करा 5 गोष्टी! साडीत दिसाल सुंदर - Marathi News | If you want a smart look in cotton saree, do 5 things! Looks beautiful in a saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॉटनची साडी चापूनचोपून नेसायची, एकदम स्मार्ट लूक हवा तर करा 5 गोष्टी! साडीत दिसाल सुंदर

कॉटनची साडी तुम्हाला एक खास लूक देते, पण ती योग्य पद्धतीने नेसली गेली तरच...पाहूया कॉटनची साडी नेसताना लक्षात ठेवायच्या गोष्टी ...

आवडत्या साड्या जुन्या झाल्या, आता साडी जुनी, आयडीया नवी! करा जुन्या साड्यांचे ७ भन्नाट वापर - Marathi News | Favorite sarees are old? Use these 7 innovative ideas and give new look to your old saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आवडत्या साड्या जुन्या झाल्या, आता साडी जुनी, आयडीया नवी! करा जुन्या साड्यांचे ७ भन्नाट वापर

साड्या म्हणजे महिला वर्गाचा वीक पाॅईंट.. प्रत्येक साडीसोबत इतक्या आठवणी जोडलेल्या असतात, की जुनी झाली तरी साडीवरचं प्रेम काही कमी होत नाही. म्हणूनच तर जुन्या साड्यांचा असा झकासपैकी एकदम हटके उपयोग करा.... ...

रोज 'ही' चूक केल्यानं लवकर खराब होतात तुमचे केस; जावेद हबीबनं दूर केले ३ गैरसमज - Marathi News | Jawed Habib Hair Care Tips : jawed habib said no to hot towel treatment hair steam  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : रोज 'ही' चूक केल्यानं लवकर खराब होतात तुमचे केस; हेअर एक्सपर्ट जावेद हबीबनं दूर केले ३ गैरसमज

Jawed Habib Hair Care Tips : काहीजण घरीत गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून केसांना वाफ देण्यासाठी गुंडाळतात. जावेद यांच्या म्हणण्यानुसार असं करणं केसांच्या आरोग्यासाठी घातक ठरतं. ...