lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > Menstrual health : मासिक पाळीत ब्राऊन रक्त? हे नॉर्मल की आजार, दुष्परिणाम कसे टाळाल?

Menstrual health : मासिक पाळीत ब्राऊन रक्त? हे नॉर्मल की आजार, दुष्परिणाम कसे टाळाल?

Menstrual health : ब्राऊन रक्त मासिक पाळी दरम्यान जास्त प्रमाणात बाहेर येत असेल तर हे मेड‍िकल कंडीशन पीसीओएस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (PCOS) चे लक्षण असू शकते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 12:44 PM2021-07-19T12:44:55+5:302021-07-19T15:00:44+5:30

Menstrual health : ब्राऊन रक्त मासिक पाळी दरम्यान जास्त प्रमाणात बाहेर येत असेल तर हे मेड‍िकल कंडीशन पीसीओएस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (PCOS) चे लक्षण असू शकते. 

Menstrual health : Is brown period blood normal know from expert | Menstrual health : मासिक पाळीत ब्राऊन रक्त? हे नॉर्मल की आजार, दुष्परिणाम कसे टाळाल?

Menstrual health : मासिक पाळीत ब्राऊन रक्त? हे नॉर्मल की आजार, दुष्परिणाम कसे टाळाल?

Highlightsपिरिएड्सदरम्यान एक, दोन किंवा तीनवेळा ब्राऊन रक्त बाहेर आल्यास काळजी करू नका. आपोआप हे रक्त येणं बंद होईल. ओले इनरवेअर्स घालू नका. शक्यतो दिवसातून २ वेळा अंघोळ करून इनरवेअर्स बदला.

मासिक पाळीदरम्यान लाल रंगाचा रक्तस्त्राव होतो असं आपल्याला वाटतं पण कधीकधी सामान्य तर कधी असामान्य कारणांमुळे ब्राऊन रंगाचा रक्तस्त्रावही होतो. पाळीच्या त्या दिवसात ब्राऊन रंगाचे रक्त का बाहेर  येते? रक्ताचा रंग काळा किंवा ब्राऊन अशावेळी होतो  जेव्हा रक्त ऑक्सिडाईज होते. ऑक्सिडाईज होणं म्हणे रक्त ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यामुळे रंगात बदल होतो. तुम्ही असंही म्हणू शकता की रक्त फ्रेश नसल्यामुळे याचा रंग बदलतो.

पीर‍ियड्सदरम्यान ब्राऊन रंगाचे रक्त बाहेर येणं हे कॉमन आहे. पण काहीवेळा बॅक्‍टीर‍ियल इंफेक्‍शन, पीसीओएस, मेनोपॉज या स्थितीमध्ये असं रक्त बाहेर येणं आजाराचं लक्षणंही असू शकतं. गाइनोकॉलोज‍िस्‍ट डॉ दीपा शर्मा यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.

 पिरिएड्सच्या सुरूवातीला ब्राऊन रक्त बाहेर येण्याचे कारण

 शेवटच्या पिरिएड सायकलमध्ये उरलेलं रक्त थेंबांच्या स्वरूपात बाहेर येतं. त्यामुळे त्याचा रक्त ब्राऊन असू शकतो.

पीर‍िएडसच्या शेवटी ब्राऊन रक्त बाहेर येण्याचे कारण

गर्भाशयात परिएड्सदरम्यान दीर्घकाळ रक्त जमा झाल्यामुळे सायकल  संपल्यानंतरही ब्राऊन रक्त बाहेर येते. 

पिरिएड्स दरम्यान कमी रक्त बाहेर का येतं?

जर पिरिएड्स दरम्यान तुम्हालाही कमी प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल किंवा रक्त शरीरातून बाहेर पडण्यास वेळ लागत असेल याचा अर्थ असा की ब्‍लड ऑक्‍सीडाइज होत आहे. त्यामुळे रक्ताचा रंग बदलतो. 

असामान्य कारणं

प्रचंड, असह्य्य वेदना होणं

सामान्य दिवसांपेक्षा जास्त दिवस रक्तस्त्राव होणं

रक्ताच्या गुठळ्या तयार होणं

हेवी ब्लिडींग, एकापेक्षा जास्तवेळा पॅड बदलणं

रक्ताचा दुर्गंध येणं

ब्राऊन रक्त बाहेर येण्याची कारणं

ब्राऊन रक्तासह आपल्याला असामान्य लक्षणे दिसल्यास, डॉक्टर आपल्या वय आणि लक्षणांनुसार काही चाचण्यांची शिफारस करू शकतात, त्यातील एक म्हणजे अल्ट्रासाऊंड, जे आपल्या गर्भाशय आणि आसपासच्या क्षेत्राची चाचणी घेऊ शकते. या व्यतिरिक्त बायोप्सी देखील करता येते जेणेकरुन कर्करोगाबाबत माहिती मिळवता येऊ शकते. ब्राऊन रक्त बाहेर येणं सामान्य आहे असे नाही, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका, शंका असल्यास वैद्यकीय मदत घ्या.
मेनोपोज (menopause) दरम्यान ब्राऊन रक्त बाहेर येण्याची समस्या असू शकते.

गर्भावस्थेचे सुरूवातीचे  (early pregnancy) लक्षण असल्यास ब्राऊन रक्त बाहेर येते.

ब्राऊन रक्त मासिक पाळी दरम्यान जास्त प्रमाणात बाहेर येत असेल तर हे मेड‍िकल कंडीशन पीसीओएस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (PCOS) चे लक्षण असू शकते. 

पीसीओएस अशावेळी होतो जेव्हा बॉडी टेस्टोस्टेरोनचे जास्त प्रमाणात उत्पादन करते. त्यामुळे ओवरीजचा आकार वाढतो आणि लक्षणं दिसायला सुरूवात होते. 

पिरिएड्स नसतानाही तुम्हाला ब्राऊन ब्लड डिस्चार्ज होत असेल तर यीस्ट बॅक्टेरिअल इंफेक्शनचं (Bacterial infection)  लक्षण असू शकतं. डॉक्‍टर एंटी-बॅक्‍टीर‍ियल औषध घेण्याचा सल्लाही देऊ शकतात. बर्थ कंट्रोल पिल्स घेतल्यानंतरही ब्राऊन ब्लड डिस्चार्ज होऊ शकतो. 

बचावाचे उपाय

पिरिएड्सदरम्यान एक, दोन किंवा तीनवेळा ब्राऊन रक्त बाहेर आल्यास काळजी करू नका. आपोआप हे रक्त येणं बंद होईल. 

इन्फेक्शनमुळे डिस्चार्ज होत असेल तर वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्या

ब्राउन रक्तासह तुम्हाला वेदना होत असतील डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरू करा.

ओले इनरवेअर्स घालू नका. शक्यतो दिवसातून २ वेळा अंघोळ करून इनरवेअर्स बदला.

ब्राऊन रक्ताची समस्या असल्यास डॉक्टर तुम्हाला एंटी-फंगल किंवा एंटी-बॅक्टेरिअल औषधंही देऊ शकतात. 

Web Title: Menstrual health : Is brown period blood normal know from expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.