lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > पाळी वेळेवर येत नाही? तज्ज्ञ सांगतात ३ घरगुती उपाय, त्रास होईल कमी

पाळी वेळेवर येत नाही? तज्ज्ञ सांगतात ३ घरगुती उपाय, त्रास होईल कमी

How to Get Regular Periods Naturally : मासिक पाळी नियमित येण्यासाठी आल्याचा चहा घ्यायला हवा. यामुळे शरीरात हिट तयार होते.  ज्यामुळे पाळी नियमित येते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 12:24 PM2023-06-28T12:24:27+5:302023-06-29T20:05:57+5:30

How to Get Regular Periods Naturally : मासिक पाळी नियमित येण्यासाठी आल्याचा चहा घ्यायला हवा. यामुळे शरीरात हिट तयार होते.  ज्यामुळे पाळी नियमित येते.

How to Get Regular Periods Naturally : Food for Regular Periods Home remedies for irregular periods | पाळी वेळेवर येत नाही? तज्ज्ञ सांगतात ३ घरगुती उपाय, त्रास होईल कमी

पाळी वेळेवर येत नाही? तज्ज्ञ सांगतात ३ घरगुती उपाय, त्रास होईल कमी

महिलांना मासिक पाळीशी (Menstrual cycle) संबंधित समस्यांचा सामना करावा लागणं हे फारच कॉमन आहे. कधी पाळी खूपच लवकर येते तर कधी  उशीरा.  पाळी वेळेवर येते असं फार क्वचित होतं. महिलांची मासिक पाळीची सायकल २८ दिवसांची असून ती नेहमीच मागे पुढे होत राहते.  पण  अनेक महिने पीरिएड्स न येण्याला अनियमित पीरिएड्स असं म्हणतात. (How to Get Regular Periods Naturally)

थायरॉईड, वजन  अचानक वाढणं, कमी होणं, ताण-तणाव, आहारात पोषणाची कमतरता, जास्त व्यायाम,  बर्थ कंट्रोल पिल्स यांमुळे पीरिएड्स अनियमित होतात. काही घरगुती उपायांनी तुम्ही मासिक पाळी नियमित करू शकता.  डायटिशियन शीनम मल्होत्रा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Effective Home Remedies For Irregular Periods)

आल्याचा चहा

मासिक पाळी नियमित येण्यासाठी आल्याचा चहा घ्यायला हवा. यामुळे शरीरात हिट तयार होते.  ज्यामुळे पाळी नियमित येते. याव्यितिरिक्त पाळीत जाणवणाऱ्या वेदनांपासूनही आराम मिळतो. यातील जिंजरोल एंटी  ऑक्सिडेंट आणि एंटी इंफ्लेमेमटरी गुणांनी समृद्ध असते. याव्यतिरिक्त जिंजरॉल मासिक पाळीतील वेदनांपासूनही आराम देते. सगळ्यात आधी आलं बारीक करून पॅनमध्ये  घाला मग त्यात थोडं पाणी झालून गॅसवर ठेवा. उकळ आल्यानंतर गॅस बंद करा. गरम पाण्यासह याचे सेवन करा.

कच्ची पपई

कच्ची पपई पिरिएडस्  नियमित होण्यास साहाय्यक ठरते. यातील कॅरोटीनमध्ये एंटी ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे महिलांच्या शरीरात एस्ट्रोजन हार्मोन लेव्हल कंट्रोल होतो. याव्यतिरिक्त पपई फायबर्स आणि फायटोकेमिकल्स, व्हिटामीन्स, मिनरल्स, कार्ब्स आणि प्रोटीन्स असतात. यात फ्लेवोनोईट्स असतात. जे शक्तीशाली एंटी ऑक्सिडंट्स असतात आणि मोनोसॅच्युरेडेट फॅटी एसिड्स असतात. यामुळे मासिक पाळीशी संबंधित त्रास दूर होतात.

व्हिटामीन डी

व्हिटामीन-डी केवळ हाडांसाठीच नाही तर एकूण आरोग्यासाठी आवश्यक आहे. तसेच, ते तुमची मासिक पाळी देखील नियमित करू शकते. हे इंसुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि जळजळ कमी करते, ज्यामुळे महिलांना त्यांच्या मासिक पाळी नियमित करण्यात मदत होते. व्हिटॅमिन-डीसाठी सकाळच्या उन्हात थोडा वेळ बसा किंवा मशरूम, मासे, काळे, अंड्यातील पिवळ बलक, गाईचे दूध, तृणधान्ये इत्यादींचा आहारात समावेश करा.

Web Title: How to Get Regular Periods Naturally : Food for Regular Periods Home remedies for irregular periods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.