Join us

रोज सकाळी १ ग्लास कोमट पाणी पिण्याचे ५ फायदे, वजन कमी-त्वचेवर ग्लो हवा तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2023 15:42 IST

What Are the Benefits of Drinking Hot Water? कोमट पाणी रोज सकाळी पिण्याचे फायदे, तज्ज्ञ सांगतात..

निरोगी आयुष्य जगण्यासाठी भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. मानसिक असो किंवा शारीरिक पाणी प्यायल्यामुळे अनेक समस्या सुटू शकतात. विशेषतः कोमट पाणी प्यायल्यामुळे जास्त फरक पडतो. अनेक लोकं आपल्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करतात. असे म्हटले की जाते, की नियमित कोमट पाणी प्यायल्याने आपण पूर्णपणे तंदुरुस्त राहतो. मुख्य म्हणजे पचनसंस्थेच्या निगडीत असणारा त्रास, कोमट पाणी प्यायल्यामुळे सुटतो.

परंतु, कोमट पाणी प्यायल्यामुळे खरंच आरोग्याच्या निगडीत समस्या सुटतात का? यासंदर्भात, आकाश हेल्थ केअरचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ज्ञ डॉ.शरद मल्होत्रा ​​यांनी सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल घडतात, याबद्दल माहिती शेअर केली आहे(What Are the Benefits of Drinking Hot Water?).

सकाळी कोमट पाणी पिण्याचे फायदे

- सकाळची सुरुवात कोमट पाणी पिऊन केल्याने, शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. यासह पचनसंस्था निरोगी राहते. ज्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, ब्लोटिंगसारख्या समस्येचा त्रास आपल्याला होत नाही.

भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम हवे- खा ७ गोष्टी, न्यूट्रिशन डेफिशियन्सी टाळा आणि हाडं ठेवा ठणठणीत

- सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे, त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे त्वचा निरोगी राहते. जेव्हा आपण कोमट पाणी पितो, तेव्हा शरीर आतून डिटॉक्स होते. ज्यामुळे त्वचेतील डेड सेल्स रिपेअर होतात. यासह कोलेजनच्या उत्पादनास प्रोत्साहन मिळते. या कारणामुळे चेहऱ्यावर पिंपल्सचा त्रास होत नाही, यासह त्वचेवर नैसर्गिक तेज येते.

- नियमित कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होते. ज्यामुळे अतिरिक्त चरबी बर्न होण्यास मदत होते.

- दररोज कोमट पाणी प्यायल्याने मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. कोमट पाण्यामुळे किडनी फिल्टरेशन होते. ज्यामुळे किडनी निरोगी राहते.

वजन कमी करण्यासाठी दिवसातून किती लिटर पाणी प्यावे? पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होते?

- गरम पाणी प्यायल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. यासह स्कॅल्पमधील रक्त प्रवाह वाढतो. ज्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात. व केस गळतीची स्मास्या दूर होते.

टॅग्स : पाणीहेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्सत्वचेची काळजी