Join us

ऐन तारूण्यात कंबरदुखी-थकवा जाणवतो? कॅल्शियमने खच्चून भरलेत ५ पदार्थ-रोज खा, निरोगी राहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 15:26 IST

Top 7 High Calcium Foods (Had Majbut Honyasathi Kay Khave) : आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी हाडं मजबूत ठेवण्यासाठी रोजच्या आहारातील काही पदार्थ सांगितले आहेत.

कामाच्या बिझी रुटीनमध्ये महिलांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नसतो. (Tips for Healthy Bones)अशात ऑस्टिओपोरोसिस यासांरखे हाडांचे आजार होण्याचा धोका दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. रिपोर्ट्नुसार भारतात  ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ४२ टक्क्यांपेक्षा जास्त महिला आणि  २४.६ टक्के पुरूष  या आजाराने पिडीत आहेत. (Top 7 High Calcium Foods That Can Make Your Bones)

ऑस्टिओपेरोसिस हा नक्की काय आहे?

हा असा आहे ज्यात हाडं कमकुवत होतात आणि  हाडांची झिज होण्याचा धोकासुद्धा वाढतो. या आजारामुळे हाडांची गुणवत्ता खराब होते, संरचना बिघडू शकते. ज्यामुळे हाडं नाजूक होतात आणि वेदना होऊ शकतात. पाठदूखी, कंबरदुखीचा त्रास उद्भवतो.

आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी हाडं मजबूत ठेवण्यासाठी रोजच्या आहारातील काही पदार्थ सांगितले आहेत. ज्यांचा आहारात समावेश करून तुम्ही कॅल्शियमची कमतरता भरून काढू शकता ज्यामुळे आजारांचा धोकाही टळतो. 

हाडं मजबूत राहण्यासाठी तूप खा 

व्हिटामीन के-१२ ने परिपूर्ण असलेले तूप  शरीरात कॅल्शियम शोषण्यास करण्यास मदत करते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडंचे नुकसान होऊ शकते. 

तीळ

काळे तीळ असो किंवा पांढरे कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहेत. डेअरी उत्पादनांच्या तुलनेत यात अधिक कॅल्शियम असते. याव्यतिरिक्त हा कॉपरचाही चांगला स्त्रोत आहे. वेदना, सूज कमी करण्यासाठी तीळाचे सेवन केले जाते. 

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बीया मॅग्नेशियाचा सर्वात उत्तम स्त्रोत आहेत. मॅग्नेशियम हाडांना लागणारी पोषक तत्व प्रदान करते. ज्यामुळे हाडं मजबूत राहतात.

आळशीच्या बीया

आळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी एसिड्स आणि अल्फा लिनोलनिक एसिड असते ते सर्वात उत्तम स्त्रोतांपैकी एक आहे.  आळशीच्या बीया पाण्यासोबत किंवा लाडूंमध्ये तुम्ही खाऊ शकता.

डिंक

डिंकात प्रोटीन्स, फायबर्स, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. नियमित डिंकाचे सेवन केल्यासस हाडं मजबूत राहण्यास मदत होते. हळदीतील करक्युमिन ऑस्टियोक्लास्ट एक्टिव्हीज कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे हाडांची घनता अधिक वाढू शकते.

राजगिऱ्यात अन्य बियांच्या तुलनेत  कॅल्शियम जास्त असते. यामुळे राजगिरा एक उत्तम आहार आहे. हाडांना पोषण मिळण्यासाठी आणि हाडांच्या विकासात मदत करण्याासाठी राजगिरा उत्तम ठरतो. यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका टाळण्यास मदत होते. 

टॅग्स : फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स