Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दातांना आतून कीड-वरून पिवळा थर आलाय? १ उपाय करा-चमतील दात

दातांना आतून कीड-वरून पिवळा थर आलाय? १ उपाय करा-चमतील दात

Teeth Kida Removal Tips (Datachi kid kashi kadhaychi) : एलोवेराचा वापर केल्यास ओरल हेल्थच्या समस्या टाळता येतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 06:22 PM2023-12-12T18:22:07+5:302024-01-01T12:26:47+5:30

Teeth Kida Removal Tips (Datachi kid kashi kadhaychi) : एलोवेराचा वापर केल्यास ओरल हेल्थच्या समस्या टाळता येतात.

Teeth Kida Removal Tips : Cavity Home Remedies How Clean Teeth Properly at Home | दातांना आतून कीड-वरून पिवळा थर आलाय? १ उपाय करा-चमतील दात

दातांना आतून कीड-वरून पिवळा थर आलाय? १ उपाय करा-चमतील दात

दातांच्या समस्या (Oral care Tips) आजकाल प्रत्येकालाच उद्भवतात कोणाचे दात पिवळे झालेत तर कोणाच्या दातांना कीड लागलेली दिसून येते. हिरव्या रंगाचा एलोवेरा दातांच्या त्रासावर गुणकारी ठरतो. एलोवेरा एंटी बॅक्टेरिअल गुणांनी परिपूर्ण असतो. याच्या वापराने ग्लोईंग फेस आणि केस दाट होतात. एलोवेराचा वापर करून तुम्ही दातांच्या समस्याही टाळू शकता. तोंडातून दुर्गंधी येऊ नये, दातांना किड लागू नये यासाठी तुम्ही एलोवेराचा गुणकारी आहे. (Aloe vera For Teeth)

न्यू टन ब्रुक डेनस्ट्री न्यु यॉर्कच्या अहवालानुसार एलोवेरा रोगप्रतिराकशक्ती वाढवून कोलोजनचे उत्पादन वाढवते. हिरड्यांना सूज असलेल्या रुग्णांवर केलेल्या संशोधतनात असं दिसून आलं की एलोवेरामुळे हिरड्यांचे आजार बरे होण्यास गती कमी मिळते. यासह हिरड्यांमधून रक्त बाहेर येण्याच्या समस्याही उद्भवत नाहीत.

तोंडाच्या आरोग्यासाठी एलोवेरा कसा फायदेशीर ठरतो? (How To Cure Teeth Problem At Home)

1) एलोवेराचा वापर केल्यास ओरल हेल्थच्या समस्या टाळता येतात. यात एंटी बॅक्टेरिअल, एंटी व्हायरल गुणधर्म असतात.  यामुळे तब्येतीशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.  

2) जर तुमच्या हिरड्या सुजल्या असतील तर एलोवेराच्या मदतीने हिरड्या स्वच्छ करू शकता. यात एंटी इफ्लेमेटरी गुण असतात ते सूज कमी करण्यास मदत करतात.  यासाठी हिरड्यांवर एलोवेरा जेलच्या मदतीने हलक्या हाताने मसाज करा. गरम पाण्यात माऊथवॉश मिसळून तुम्ही याचा वापर करू शकता.  

3) अनेकदा जखम झाल्यानतंर हिरड्यांमधून रक्त बाहेर येऊ लागते. ब्लिडिंग रोखण्यासाठी तुम्ही एलोवेराचा वापर करू शकता. ब्लिडिंग रोखण्यासाठी एलोवेरा जेल लावा. ज्यामुळे तुम्हाला वेदनांपासून आराम मिळेल. 

ढेरी सुटलीये-धड व्यायामही होत नाही? सकाळी रिकाम्या पोटी हा पदार्थ घ्या, झरझर घटेल चरबी

4) तोंडात असे काही बॅक्टेरियाज तयार होतात जे हिरड्यांना नुकसान पोहोचवता आणि दातांनाही किड येते.  हे नष्ट करण्यसाठी एलोवेरा एक उत्तम उपाय आहे. यासाठी एलोवेरा जेलमध्ये थोडं राईचे तेल मिसळून आतल्या बाजूने फिरवा आणि तोंड स्वच्छ धुवून घ्या. 

थंडीत चेहरा काळवंडला-त्वचा ताणल्यासारखी झाली? मुल्तानी मातीचा १ उपाय, सॉफ्ट-ग्लोईंग दिसेल त्वचा

5) पूर्ण दिवसभरात आपण जे काही खातो त्यामुळे दुर्गंध येऊ लागतो. अनेकदा तोंड धुतल्यानंतरही दुर्गंध जात नाही. अशावेळी एलोवेरा तुमचं काम सोपं करू शकतो. तोंडातील दुर्गंध दूर करण्यासाठी एलोवेरा जेलमध्ये राईचे तेल आणि १ चुटकी मीठ मिसळून दातांवर मंजनप्रमाणे लावा. यामुळे दात स्वच्छ होतील. ज्यामुळे दुर्गंध येणार नाही.

Web Title: Teeth Kida Removal Tips : Cavity Home Remedies How Clean Teeth Properly at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.