lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज सकाळी मूठभर चणे खा; बळकट हाडं-पोलादी होईल शरीर; कायम मेंटेन राहाल

रोज सकाळी मूठभर चणे खा; बळकट हाडं-पोलादी होईल शरीर; कायम मेंटेन राहाल

Roasted Chana Nutrition Roasted Chana Protein Benefits : भाजलेले चणे हा एक पौष्टीक पदार्थ असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उत्तम आहार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 04:15 PM2024-04-05T16:15:28+5:302024-04-06T01:10:54+5:30

Roasted Chana Nutrition Roasted Chana Protein Benefits : भाजलेले चणे हा एक पौष्टीक पदार्थ असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उत्तम आहार आहे.

Roasted Chana Nutrition Roasted Chana Protein Benefits : Amazing Health Benefits Of Roasted Chana | रोज सकाळी मूठभर चणे खा; बळकट हाडं-पोलादी होईल शरीर; कायम मेंटेन राहाल

रोज सकाळी मूठभर चणे खा; बळकट हाडं-पोलादी होईल शरीर; कायम मेंटेन राहाल

रिकाम्यापोटी भाजलेले चणे खाणं एक हेल्दी सवय आहे. असं मानलं जातं की आयुर्वेदात हे हिलींग प्रॉपर्टीजमुळे हे प्रसिद्ध आहे. (Roasted Chana Benefits) याला आयुर्वेदीक चिकीत्सेत शक्तीशाली औषध मानले जाते. रिकाम्या पोटी चणे खाल्ल्ल्याने हेल्दी निरोगी राहण्यास मदत होते.  यासाठी योग्य डाएटची निवड करणं फार महत्वाचे असते.  (Amazing Health Benefits Of Roasted Chana)

 लोक रिकाम्या पोटी काही ना काही खाण्यासाठी शोधत असतात अशावेळी तुम्ही रिकाम्या पोटी चण्यांचे सेवन केले तर तब्येतीच्या समस्याही उद्भवणार नाहीत.  भाजलेले चणे हा एक पौष्टीक पदार्थ असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उत्तम आहार आहे. (Roasted Chana Nutrition Roasted Chana Protein Benefits) 

ट्रू मेडच्या रिपोर्टनुसार चणे तब्येतीसाठी पोषक  ठरतात. यात कॅलरीजचे प्रमाण कमी  असते. कॅलरीजबरोबरच प्रोटीन्स आणि फॅट्सही यात असतात.  यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. एक कप चण्यांमध्ये जवळपास २६९ कॅलरीज असतात. यात कार्ब्सचे प्रमाण कमी असते. चण्यांच्या सेवनाने जास्तीत जास्त प्रोटीन्स मिळतात.

भाजलेले चणे खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात?

१) भाजलेले चणे खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते. पचनक्रिया चांगली राहते याशिवाय पोटात गॅस तयार होणं, एसिडीटीची समस्या उद्भवत नाहीत. 

२) भाजलेल्या चण्यांमध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट् आणि  व्हिटामीन्स, मिनरल्स असतात ज्यामुळे रिकाम्यापोटी शरीराला एनर्जी मिळते आणि दिवसभर एनर्जेटीक आणि एक्टिव्ह राहता येते.

३)  भाजलेल्या चण्यांच्या सेवनाने वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. यात प्रोटीन्स आणि फायबर्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे जेवणानंतर तुम्हाला भरलेलं वाटतं. 

सतत चष्मा लावणं नको वाटतं? रोज हे ५ पदार्थ खा; चष्म्याचा नंबर कमी होईल-तीक्ष्ण होईल नजर

४) भाजलेले चणे खाल्ल्याने शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. यातील व्हिटामीन्स आणि मिनरल्स डायबिटीजचा धोका कमी होतो. 

सतत थकवा-हाडं पोकळ-खिळखिळी? -कारण व्हिटामीन B-12 ची कमतरता; ५ पदार्थ खा, व्हा स्ट्रॉँग

५) भाजलेल्या चण्यांमध्ये फायबर्स, फॉलेट आणि व्हिटामीन्स असतात ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. बॅड कोलेस्टेरॉलही वाढत नाही.

६) भाजलेल्या चण्यांमध्ये प्रोटीन्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्स असतात ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात. 

7) चणे प्रोटीन्सचा स्त्रोत आहे. यात एमिनो एसिड्स असतात ज्यामुळे शरीरातील मांसपेशी मजबूत आणि हेल्दी राहण्यास मदत होते. चण्यांमध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे दिवसभर एनर्जेटीक राहता येते. चण्यांमध्ये व्हिटामीन्स फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. 

Web Title: Roasted Chana Nutrition Roasted Chana Protein Benefits : Amazing Health Benefits Of Roasted Chana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.