lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सतत थकवा-हाडं पोकळ-खिळखिळी? -कारण व्हिटामीन B-12 ची कमतरता; ५ पदार्थ खा, व्हा स्ट्रॉँग

सतत थकवा-हाडं पोकळ-खिळखिळी? -कारण व्हिटामीन B-12 ची कमतरता; ५ पदार्थ खा, व्हा स्ट्रॉँग

Vitamin B-12 Rich Foods For Vegetarian : व्हिटामीन ए आणि व्हिटामीन डी प्रमाणेच व्हिटामीन बी-१२ ची कमतरताही अनेकांमध्ये उद्भवते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 12:27 PM2024-04-04T12:27:12+5:302024-04-04T14:30:00+5:30

Vitamin B-12 Rich Foods For Vegetarian : व्हिटामीन ए आणि व्हिटामीन डी प्रमाणेच व्हिटामीन बी-१२ ची कमतरताही अनेकांमध्ये उद्भवते.

Vitamin B-12 Rich Foods For Vegetarian : Natural Source Of Vitamin B-12 Vegetarians | सतत थकवा-हाडं पोकळ-खिळखिळी? -कारण व्हिटामीन B-12 ची कमतरता; ५ पदार्थ खा, व्हा स्ट्रॉँग

सतत थकवा-हाडं पोकळ-खिळखिळी? -कारण व्हिटामीन B-12 ची कमतरता; ५ पदार्थ खा, व्हा स्ट्रॉँग

व्हिटामीन  बी-१२ ची कमतरता (Vitamin B-12 Deficiency) असणं एक  गंभीर समस्या बनली आहे. यामुळे मांसपेशी कमकुवत होतात. ज्यामुळे थकवा येणं, हार्ट बीट वाढणं, चालण्या-फिरण्यास त्रास होणं अशा समस्या उद्भवतात. (Best Vitamin B-12 Foods For Vegetarians) केस वेळेआधीच पांढरे होणं आणि स्किनवर सुरकुत्या येणं अशा समस्या व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे उद्भवू शकतात. (Natural Source Of Vitamin B-12 Vegetarians)

व्हिटामीन ए आणि व्हिटामीन डी प्रमाणेच व्हिटामीन बी-१२ ची कमतरताही अनेकांमध्ये उद्भवते. (Vegetarian Foods High in Vitamin B-12) महिला आणि लहान मुलांमध्ये व्हिटामीन बी-२ ची कमतरता सर्वाधिक असते. जेवणात, नाश्तात काही पदार्थांचा समावेश करून ही कमतरता भरून काढता येऊ शकते. (Veg Foods Foe Vitamin B-12)

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार व्हिटामीन बी-१२  अन्नातील प्रोटीन्सशी संबंधित आहे. अन्नात लाळ मिसळ्यानंतर तोंडात प्रक्रिया सुरू होते.  व्हिटामीन बी-१२ लाळेमध्ये हॅप्टोकोरीन, कोबालामिन-बाईंडींग प्रोटीनशी बांधले जाते. वनस्पतीयुक्त पदार्थांमद्ये नैसर्गिकरिकत्या व्हिटामीन बी-१२ नसते. पण फोर्टीफाईड तृणधान्य, मजबूत पौष्टीक यीस्ट हे व्हिटामीन बी १२ चे चांगला स्त्रोत आहेत. 

1) केळी

रोज १ केळी खाल्ल्याने व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर होण्यास मदत होते.  म्हणून नाश्त्यामध्ये केळीचा समावेश करा. केळी खाल्ल्याने बराचवेळ भूकही लागत नाही अनावश्यक क्रेव्हींग्स टाळता येतात. 

2) प्लांट बेस्ड दूध

दूध आणि डेअरी प्रोडक्टस व्हिटामीन बी-१२ चा चांगला स्त्रोत आहे. काही लोक दूधाच्या सेवनाने पोट फुलण्याच्या समस्या उद्भवू शकतात. दूधाऐवजी दूध, सोया मिल्क  किंवा राईस मिल्कचे सेवन करू शकता. 

ओटी पोट लटकतंय-मागून फिगर जाड दिसते? सकाळी उपाशी पोटी 'हा' पदार्थ घ्या-स्लिम व्हाल

3) पालक

पालकाची भाजी पोषक तत्वांचा खजिना आहे. यात शरीरासाठी आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व असतात. व्हिटामीन बी-१२ बरोबरच आयर्न,कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत आहे.

4) मशरूम

मशरूम शाकाहारी लोकांच्या आवडत्या भाजीपैकी एक आहे. यात व्हिटामीन बी-१२ चे प्रमाण जास्त असते. मशरूम खाल्ल्याने अनेक व्हिटामीन्स शरीराला मिळतात. सॅलेड, सॅण्डविच, भाजी कशातही मशरूम घालून तुम्ही खाऊ शकतात. मशरूम खाल्ल्याने व्हिटामीन डी मिळण्यासही मदत होते. 

सतत चष्मा लावणं नको वाटतं? रोज हे ५ पदार्थ खा; चष्म्याचा नंबर कमी होईल-तीक्ष्ण होईल नजर

5) दही

उन्हाळ्याच्या दिवसांत दही खाल्ल्याने अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो. दही खाल्ल्याने शरीरातील व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर होण्यास मदत होते. याशिवाय दही, ताक, कढी कशाही स्वरूपात दह्याचे सेवन करू शकता.

Web Title: Vitamin B-12 Rich Foods For Vegetarian : Natural Source Of Vitamin B-12 Vegetarians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.