उन्हाळा म्हटलं की आपल्याला सगळ्यांतआधी आठवतो तो आंबा. आंब्याच्या सिझनला सुरुवात झाली की, आपण आपल्या रोजच्या डाएटमध्ये आंब्याचा समावेश करतो. आंबा हे फळं चवीला इतकं सुंदर गोड (Right Way To Give Mangoes To Babies) लागते की, कुणीही आंबा खाण्याचा मोह आवरु शकत नाही. आंबा (How to Serve Mango to Babies) घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तितकाच आवडीचा. वर्षभर वाट पाहायला लावण्याऱ्या या फळाचा सिझन सुरु झाल्यावर, आपण सगळेच अक्षरशः आंब्याबर तुटून पडतो. आंबा फक्त चवीलाच भारी लागतो असे नाही, तर तो खाणे आरोग्याच्यादृष्टीने देखील अतिशय फायदेशीर असते(Easy ways to serve mango for baby).
आंब्यात वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक घटक असतात, यासाठीच आंबा घरातील लहान मुलांनां देखील खायला दिला जातो. परंतु लहान मुलांनी आंबा खाल्ल्यांनंतर काहीवेळा त्याच्या पोटात दुखणे, जुलाब होणे अशा इतर समस्या त्रास देतात. अशा परिस्थितीत, पालकांनाच काळजी वाटत नाही तर मुलांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. अशावेळी, मुलांना आंबा द्यावा की देऊ नये ? किंवा मुलांना आंबा कधी आणि किती द्यावा? मुलांना आंबा देण्याची योग्य पद्धत असे प्रश्न अनेक पालकांना पडतात. यासंदर्भात, onlymyhealth.com ला पोषणतज्ज्ञ उज्मा बानो (एमएससी, न्यूट्रिशन, डीएनएचई) यांनी दिलेल्या मुलाखतीत मुलांना आंबा खायला देताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल सांगितले आहे.
लहान मुलांना आंबा खायला देण्यापूर्वी...
आंब्यामध्ये नैसर्गिकरित्या फायटिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. हे आम्ल शरीरात जास्त उष्णता निर्माण करू शकते, ज्यामुळे लहान मुलांना जुलाब किंवा पोटदुखीची समस्या सतावू शकते. यासाठी, मुलांना आंबे खायला देण्यापूर्वी ते पाण्यात भिजवले पाहिजेत. आंबा कमीत कमी १ ते २ तास पाण्यात भिजवून ठेवल्याने त्यात असलेल्या फायटिक अॅसिडचे प्रमाण कमी होते. यामुळे आंबा खाल्ल्यानंतर शरीरात जास्त उष्णता निर्माण होणार नाही आणि बाळाला कोणत्याही आरोग्य आरोग्याच्या तक्रारी सहन न करता मनमुरादपणे आंब्याचा आस्वाद घेता येईल. घरातील लहान मुलांना आंबा देण्यापूर्वी चांगले पिकलेले, गोड आणि तंतुमय आंब्यांची निवड करावी. आंबा खाण्यापूर्वी कमीत कमी १ ते २ तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर आंबा धुवून सोलून घ्या आणि त्याचा गर काढा. बाळ जर लहान असेल ६ महिन्यांच्या पुढील असेल किंवा दात आले नसतील तर आंबा चांगला मॅश करा किंवा प्युरी करून खायला द्या. मग हळूहळू जेव्हा मूल चांगले चावू लागते, तेव्हा तुम्ही त्याला लहान तुकडे देखील करून देऊ शकता. घरातील लहान मुलांनाच नाही तर आपण देखील आंबा खाण्यापूर्वी तो १ ते २ तास पाण्यात भिजत ठेवून मगच खावा, म्हणजे आंबा पोटाला बाधत नाही.
हायपरअॅक्टिव्ह मूलं सांभाळताना पालकांची होते दमछाक ? ५ टिप्स - तज्ज्ञ देतात मोलाचा सल्ला...
आराध्याची उंची छान वाढावी म्हणून आई ऐश्वर्या राय घेतेय तिच्या डाएटची काळजी, देते ५ पदार्थ...
लहान बाळांना आंबे कधी खायला द्यावेत ?
लहान बाळांना आंबे देण्याचे योग्य वय ८ ते ९ महिन्यांनंतर आहे. यावेळी, बाळे हळूहळू सॉलिड पदार्थ खायला लागतात आणि फळांची प्युरी किंवा लहान तुकडे चघळायला लागतात, यावेळी तुम्ही तुमच्या बाळाला आंबा खायला देऊ शकता. सुरुवातीला, नेहमी पिकलेले गोड आंब्यांची निवड करा आणि ते चांगले मॅश करून खायला द्या जेणेकरून बाळ ते सहज खाऊ आणि पचवू शकेल.
एक चूक आणि वजन वाढेल भराभर, तज्ज्ञ सांगतात वेटलॉससाठी खाण्याची योग्य पद्धत - वजनात दिसेल फरक...
मुलांना आंबे खायला देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ?
१. तुमच्या बाळाला पहिल्यांदा आंबा खाऊ घालताना, तो कमी प्रमाणात द्या जेणेकरून बाळाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी होणार नाही किंवा पोटाशी संबंधित समस्या त्रास देणार नाही.
२. जर मुलाना आंबा खाल्ल्यानंतर त्वचेवर पुरळ, उलट्या, जुलाब किंवा पोटदुखी यासारख्या समस्या होत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
३. सुरुवातील मुलांना जास्त प्रमाणात आंबा खायला देऊ नका कारण त्यात भरपूर नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे पोट खराब होऊ शकते.
४. लहान मुलांना फक्त ताजे आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलेच आंबे खायला द्यावेत. मुलांना पॅकबंद आंब्याची प्युरी किंवा रस देणे टाळा कारण त्यात कृत्रिम साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हजचे प्रमाण जास्त असते.
लहान मुलांना किती प्रमाणांत आंबा खायला द्यावा ?
१. ८ ते १० महिने वयोगटातील बाळांना दिवसातून २ ते ३ चमचे मॅश केलेला आंबा खायला द्यावा.
२. १० ते १२ महिने वयोगटातील मुलांना दिवसातून अर्धी वाटी आंबे खायला द्यावे.
३. १ वर्षापेक्षा मोठ्या मुलांना तुम्ही एक छोटा आंबा किंवा आंब्याचे तुकडे एका लहान वाटीत खायला देऊ शकता.