lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पूनम पांडेचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन, हा कॅन्सर नेमका काय असतो? प्रतिबंधात्मक लस घेणं गरजेचं कारण..

पूनम पांडेचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन, हा कॅन्सर नेमका काय असतो? प्रतिबंधात्मक लस घेणं गरजेचं कारण..

reason behind Poonam Pandey Death is Cervical Cancer : सर्व्हायकल कॅन्सरवर उपलब्ध लस प्रत्येक महिलेने घ्यायलाच हवी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2024 02:42 PM2024-02-02T14:42:37+5:302024-02-02T14:46:13+5:30

reason behind Poonam Pandey Death is Cervical Cancer : सर्व्हायकल कॅन्सरवर उपलब्ध लस प्रत्येक महिलेने घ्यायलाच हवी...

reason behind Poonam Pandey Death is Cervical Cancer : Poonam Pandey died of cervical cancer, what exactly is this cancer? The reason why preventive vaccination is necessary.. | पूनम पांडेचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन, हा कॅन्सर नेमका काय असतो? प्रतिबंधात्मक लस घेणं गरजेचं कारण..

पूनम पांडेचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन, हा कॅन्सर नेमका काय असतो? प्रतिबंधात्मक लस घेणं गरजेचं कारण..

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री असलेली पूनम पांडे हीचं काल निधन झालं. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबतची पोस्ट करण्यात आली आणि सर्वांनाच धक्का बसला. अवघ्या ३२ व्या वर्षी पूनमचं निधन होण्याचं कारण ठरला आहे सर्व्हायकल कॅन्सर हा आजार. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वेगाने वाढले असून यामुळेच पूनम पांडेला आपला जीव गमवावा लागला आहे. महिलांमध्ये होणारे ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर अशा विविध कॅन्सरपैकी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण २० टक्के असून याबाबत महिलांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करायला हवेत (reason behind Poonam Pandey Death is Cervical Cancer).

भारतात दरवर्षी १ लाख २३ हजार महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग झाल्याचे निदान होते तर ६७ हजार महिलांचा या आजारामुळे मृत्यू होतो.हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी या कर्करोगाला प्रतिबंध करणारी लस प्रभावी आहे. मात्र परदेशी बनावटीची असलेली ही लस परवडणारी नसल्याने महिलांमध्ये ती घेण्याचे प्रमाण खूपच नगण्य होते. पण पुण्यातील सिरम  इन्स्टिट्यूटने 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस'(HPV)ही स्वदेशी लस विकसित केली आहे. ही लस प्रत्येक महिलेने घेणे आवश्यक असून त्याबाबत महिलांमध्ये जास्तीत जास्त जागरुकता निर्माण होणे आवश्यक आहे. 

(Image : Google)
(Image : Google)

काय असतो सर्व्हायकल कॅन्सर? 

एचपीव्ही म्हणजेच व्हूमन पॅपिलोमा व्हायरस लैंगिक संबंधातून झालेल्या इन्फेक्शनमधून शरीरात पसरतो. कमी वयात लग्न होणे, एकामागे एक मूल होणे, एकाहून अधिक जणांशी शारीरिक संबंध या कारणांमुळे गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. एचपीव्ही १६ आणि एचपीव्ही १८ या जीवाणुंमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो. योनीतून नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात व्हाईट डीस्चार्ज होणे, रक्तस्त्राव होणे ही या कॅन्सरची काही महत्त्वाची लक्षणे आहेत. ही लक्षणे वेळीच न समजल्यास हा कॅन्सर गंभीर रुप धारण करतो. पॅप स्मिअर ही गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान करण्याची महत्त्वाची चाचणी आहे. याशिवाय डीएनए टेस्टींग, व्हीज्युअल इन्स्पेक्शन यांसारख्या चाचण्या करुन हा कॅन्सर ओळखता येऊ शकतो. 

कॅन्सर रोखण्यासाठी लस कशी काम करते?

(Image : Google)
(Image : Google)

याबाबत आपल्या मनात शंका असू शकते. तर लैंगिक संबंध आल्यानंतर गर्भाशयाच्या मुखाला HPV नावाच्या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग बरीच वर्षे टिकून राहिला तर त्याचे कॅन्सरमध्ये रुपांतर होऊ शकते.त्यामुळे HPV vaccine म्हणजेच ही लस या संसर्गापासून स्त्रीचे रक्षण करते.साहजिकच कोणताही लैंगिक संबंध येण्याआधी ही लस दिल्यास ती सर्वात जास्त प्रभावी ठरते.त्यामुळे मुली वयात आल्यावर सोळा ते अठरा वर्षे वयाआधी ही लस देण्यात यावी. नंतरही लैंगिक संबंध यायच्या आधी देणे जास्त प्रभावी ठरते. पंधरा वर्षे वयाआधी ही लस दिल्यास दोन डोस द्यावे लागतात आणि त्यानंतर तीन डोस द्यावे लागतात. 
 

Web Title: reason behind Poonam Pandey Death is Cervical Cancer : Poonam Pandey died of cervical cancer, what exactly is this cancer? The reason why preventive vaccination is necessary..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.