lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Nails Care Tips : रात्री नखं कापली तर काय होतं? नखं कापण्याची योग्य वेळ अन् पद्धत कोणती; जाणून घ्या

Nails Care Tips : रात्री नखं कापली तर काय होतं? नखं कापण्याची योग्य वेळ अन् पद्धत कोणती; जाणून घ्या

Nails Care Tips : रात्रीच्यावेळी नखं कापू नये हे तुम्ही ऐकून असालच (why we should not cut nails at night). यामागचं कारण अनेकांना माहीत नसतं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 12:51 PM2021-09-26T12:51:09+5:302021-09-26T13:04:36+5:30

Nails Care Tips : रात्रीच्यावेळी नखं कापू नये हे तुम्ही ऐकून असालच (why we should not cut nails at night). यामागचं कारण अनेकांना माहीत नसतं. 

Nails Care Tips : Correct ways to cut nails & know why we should not cut nails at night | Nails Care Tips : रात्री नखं कापली तर काय होतं? नखं कापण्याची योग्य वेळ अन् पद्धत कोणती; जाणून घ्या

Nails Care Tips : रात्री नखं कापली तर काय होतं? नखं कापण्याची योग्य वेळ अन् पद्धत कोणती; जाणून घ्या

Highlightsपायाची नखं हातांच्या  नखांपेक्षा हळू हळू वाढतात, त्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं की पायांची नखं ट्रिम करण्याची गरज नाही. अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशनच्या मते, आपली नखं कापण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे आंघोळ केल्यानंतर. कारण अंघोळीनंतर आपली नखं पाण्याने किंवा साबणाने भिजलेले असतात. त्यामुळे ती सहज कापली जातात.

नखं आपल्या हातांची सुंदरता वाढवण्यासाठी महत्वाची असतात. नखं खराब झाली तर आपल्या हातांचा लूक बिघडू शकतो म्हणून त्वचेप्रमाणेच नखांची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं असतं. नखं व्यवस्थित वेळेवर कापली जायला हवीत. रात्रीच्यावेळी नखं कापू नये हे तुम्ही ऐकून असालच (why we should not cut nails at night). यामागचं कारण अनेकांना माहीत नसतं. 

रात्री नखं न कापण्यामागचं शास्त्रिय कारण तुम्हाला माहीत आहे का? खरंतर रात्री नखं कापल्यानं नखांचे तुकडे आजूबाजूला पडतात आणि त्यांना गोळा करून फेकणं कठीण होते. अशा परिस्थितीत, हे नखेचे तुकडे आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायक असतात आणि अनवधानाने अन्नपदार्थांमध्ये प्रवेश करू शकतात त्यामुळे एलर्जी होऊ शकते. त्यासाठी नखं कापण्याची योग्यवेळ माहीत असायला हवी.  

१) नखं कापण्याची योग्य वेळ?

अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशनच्या मते, आपली नखं कापण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे आंघोळ केल्यानंतर. कारण अंघोळीनंतर आपली नखं पाण्याने किंवा साबणाने भिजलेले असतात. त्यामुळे ती सहज कापली जातात.

२) रात्री नखं कापायची की नाही?

नखं केराटिनपासून बनलेली असतात आणि जेव्हा आपण त्यांना रात्री कापतो तेव्हा रात्री किंवा बराच वेळ पाण्याच्या संपर्कात न आल्यामुळे ते कठीण होतात. म्हणून, जेव्हा आपण सकाळी आंघोळ करतो किंवा दिवसा नखे कापतो, तेव्हा दिवसभर आपली नखं पुरेश्या प्रमाणात ओले राहतात, ज्यामुळे ती कोरडे होत नाहीत किंवा खराब होत नाहीत.

३) नेहमी नखं ओली असताना कापा

नखं कापण्याचा योग्य मार्ग म्हणजे प्रथम आपल्या नखांना तेल लावा किंवा पाण्यात ठेवा. यामुळे तुमचे नखे मऊ होतील आणि तुम्ही ते चांगले कापू शकाल. त्यामुळे नखे कापण्यासाठी आंघोळीनंतरची वेळ निवडा. जर तुम्ही रात्री नखे कापत असाल, तर तुमची नखे कोमट पाण्यात काही मिनिटे भिजवून ठेवा आणि नखे कापल्यानंतर त्यावर तेल लावा. यामुळे नखं मऊ राहतील.

नखे कापण्यासाठी योग्य नेल कटर असणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही नेल कटर किंवा नेल क्लिपर वापरू शकता. आपल्या पायाच्या बोटांसाठी नेल क्लिपर वापरा. नेल कटरच्या वापराबाबत काही गोष्टी लक्षात ठेवा.

  • सर्वप्रथम, आपले स्वतःचे वैयक्तिक नेल कटर ठेवा आणि ते कोणाशीही शेअर करू नका.
  • नखे कापण्यापूर्वी, नेल कटर डिस्इंफेक्टंटमध्ये ठेवा आणि नंतर ब्रशने घासून स्वच्छ करा.
  • नखं कापण्याआधी नेल कटर गरम पाण्यात धुवा आणि ठेवण्यापूर्वी ते पूर्णपणे वाळवा.

४) नखं कापण्यासाठी योग्य जागेचा वापर

बऱ्याच लोकांना सवय असते की ते कुठेही बसून नखे चावतात. जी खूप वाईट सवय आहे. नखं कापण्यासाठी बोर्ड वापरण्याचा प्रयत्न करा किंवा चांगल्या पृष्ठभागावर हात ठेवून आरामात नखं कापून घ्या. नखं कापल्यानंतर तो बोर्ड उचलून नखं डस्टबिनमध्ये टाका. कपडे किंवा फर्निचरसारख्या गोष्टींवर कधीही नखे कापू नका.

५) नखं ट्रिम करण्याची योग्य पद्धत

आपले नखे ट्रिम करण्यासाठी नखं जवळजवळ सरळ कट कापा. कोपऱ्यांवर किंचित नखे गोल करा. नखांचा आकार मोठा किंवा लहान नसावा. म्हणून पायांचे नखं ट्रिम करताना सरळ कापून टाका. पायाची नखे हातांच्या  नखांपेक्षा हळू हळू वाढतात, त्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं की पायांची नखं ट्रिम करण्याची गरज नाही. 

६) क्यूटिकल्स कापू नका

क्युटिकल्स नखांच्या मुळाचे रक्षण करतात, म्हणून तुमच्या क्यूटिकल्सला कापणे टाळा. जेव्हा तुम्ही तुमचे क्यूटिकल्स कापता तेव्हा बॅक्टेरिया आणि इतर जंतू तुमच्या शरीरात शिरतात आणि नखांना संसर्ग होऊ शकतो. अशा परिस्थितीत, बाजूच्या नखांमध्ये संसर्ग असल्यास, काहीवेळा बरे होण्यास बराच वेळ लागू शकतो. नखं कापल्यानंतर मॉईश्चरायजर किंवा तेल लावा. 

Web Title: Nails Care Tips : Correct ways to cut nails & know why we should not cut nails at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.