lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > भारतातल्या बहुतांश प्रोटीन पावडर आरोग्यासाठी घातक, नवीन संशोधन म्हणते- सावध व्हा कारण..

भारतातल्या बहुतांश प्रोटीन पावडर आरोग्यासाठी घातक, नवीन संशोधन म्हणते- सावध व्हा कारण..

Truth About The Quality Of Protein Powder: प्रोटीन पावडर घेणं हे आता एक प्रकारचं फॅड झालं आहे.. पण त्याबाबतीत समोर आलेलं हे धक्कादायक सत्य एकदा पाहायलाच हवं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2024 04:56 PM2024-04-11T16:56:25+5:302024-04-11T16:59:43+5:30

Truth About The Quality Of Protein Powder: प्रोटीन पावडर घेणं हे आता एक प्रकारचं फॅड झालं आहे.. पण त्याबाबतीत समोर आलेलं हे धक्कादायक सत्य एकदा पाहायलाच हवं...

Most protein powders in India are hazardous to health, says new research - beware because.. | भारतातल्या बहुतांश प्रोटीन पावडर आरोग्यासाठी घातक, नवीन संशोधन म्हणते- सावध व्हा कारण..

भारतातल्या बहुतांश प्रोटीन पावडर आरोग्यासाठी घातक, नवीन संशोधन म्हणते- सावध व्हा कारण..

Highlightsअभ्यासातून असंही समोर आलं आहे की भारतात तयार होणारे बहुतांश हर्बल प्रोटीन बेस सप्लिमेंट्स हे अतिशय सुमार दर्जाचे असून त्यांच्यात लिव्हरसाठी धोकादायक ठरणारे काही विषारी पदार्थ आढळून आले आहेत.  

भारतातल्या बहुसंख्य लोकांमध्ये आणि त्यातही शाकाहारी लोकांमध्ये प्रोटिन्सची कमतरता दिसून येते. त्यामुळे मग काही जण स्वत:च्या मनाने तर काही जण इतर कोणाचं ऐकून प्रोटीन सप्लिमेंट्स सुरू करतात. खरंतर आहारात काही पदार्थ योग्य प्रमाणात घेतले तर प्रोटीन्स पुरेशा प्रमाणात मिळू शकते. पण सध्यातरी प्रोटीन पावडरचे खूळ खूप वाढले असून प्रोटीन सप्लिमेंट घेणे ही एक प्रकारची फॅशनच झाली आहे. पण आरोग्यदायी समजून जे प्रोटीन पावडर किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स आपण घेत आहोत ते आरोग्यासाठी किती घातक आहेत, याविषयीचा अभ्यास नुकताच समोर आला आहे. (observational analysis of the most popular protein powders)

 

भारतात उपलब्ध असणाऱ्या प्रोटीन पावडरची गुणवत्ता तपासणारा एक अभ्यास नुकताच करण्यात आला आहे. ‘मेडिसिन’ नावाच्या जर्नलमध्ये नुकताच तो अभ्यास प्रसिध्द झाला.

कस्टमाईज मंगळसूत्र पेंडंटचा भन्नाट ट्रेण्ड, सांगा तुम्हाला कोणतं आवडलं?

 या अभ्यासाचे निष्कर्ष असं सांगतात की भारतात विकल्या जाणाऱ्या प्रसिद्ध ब्रॅण्डपैकी बहुतांश ब्रॅण्ड गुणवत्तेच्या बाबतीत अगदीच सुमार दर्जाचे असून ते ज्या प्रकारचा दावा करतात, त्यातले बरेच दावे सपशेल चुकीचे आहेत.

 

या अभ्यासात ज्या कोणत्या ३६ प्रोटीन सप्लिमेंट्सचा अभ्यास करण्यात आला आहे, त्यापैकी ७० टक्के प्रोटीन सप्लिमेंटवर चुकीची माहिती देण्यात आली आहे. तसेच ते ब्रॅण्ड जेवढे प्रोटीन्स देण्याचा दावा त्यांच्या जाहिरातींमधून करतात, वास्तविक पाहता त्याच्या अर्धेच प्रोटीन्स पुरवून त्या एकप्रकारे ग्राहकांची फसवणूक करत आहेत.

औषधी गोळ्यांची रिकामी पाकिटं फेकून देता? पाहा २ खास उपयोग, ही ट्रिक एकदाच माहिती करुन घ्या..

एवढंच नाही तर त्या प्रोटीन्स पावडरच्या सॅम्पलपैकी १४ टक्के सॅम्पलमध्ये बुरशीजन्य अफ्लाटॉक्सिन आहेत. त्यामुळे श्वसन यंत्रणेचे विकार होऊ शकतात. तर ८ टक्के सॅम्पलमध्ये किटकनाशकांचे अंश आढळून आले आहेत.

नव्या झाडूने झाडताना खूपच भुसा बाहेर येतो? २ सोप्या ट्रिक्स, झाडू होईल स्वच्छ

केरळ येथील राजगिरी हॉस्पिटल आणि अमेरिकेतील काही संशोधक यांनी केलेल्या या अभ्यासातून असंही समोर आलं आहे की भारतात तयार होणारे बहुतांश हर्बल प्रोटीन बेस सप्लिमेंट्स हे अतिशय सुमार दर्जाचे असून त्यांच्यात लिव्हरसाठी धोकादायक ठरणारे काही विषारी पदार्थ आढळून आले आहेत.  
 

 

Web Title: Most protein powders in India are hazardous to health, says new research - beware because..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.