आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव आणि चिंता सामान्य झाली आहे. अशा वेळी मनाला स्थिरता देण्यासाठी ऋषीमुनींनी सांगितलेला 'सावित्री प्राणायाम' हा एक उत्तम उपाय आहे. याला 'लयबद्ध श्वसन' असेही म्हणतात, कारण यात श्वासाची गती एका ठराविक लयीत चालते.
सावित्री प्राणायाम म्हणजे काय?
हा प्राणायाम प्रामुख्याने श्वास घेणे (पूरक), श्वास रोखून धरणे (कुंभक), श्वास सोडणे (रेचक) आणि पुन्हा श्वास बाहेरच रोखून धरणे (बाह्य कुंभक) यांच्या लयीवर आधारित आहे. यामध्ये श्वसनाचा दर २:१:२:१ या प्रमाणात राखला जातो.
सावित्री प्राणायाम करण्याची पद्धत:
१. अवस्था: जमिनीवर सुखासन किंवा पद्मासनात ताठ बसा. डोळे मिटून शरीर सैल सोडा. २. श्वास घेणे (पूरक): मनात ६ अंक मोजेपर्यंत (६ सेकंद) संथपणे खोल श्वास घ्या. ३. श्वास रोखणे (अंर्तकुंभक): श्वास घेतल्यावर ३ अंक मोजेपर्यंत तो फुफ्फुसात रोखून धरा. ४. श्वास सोडणे (रेचक): पुन्हा ६ अंक मोजेपर्यंत हळूहळू श्वास नाकावाटे बाहेर सोडा. ५. बाहेर रोखणे (बाह्यकुंभक): श्वास सोडल्यानंतर ३ अंक मोजेपर्यंत श्वास बाहेरच रोखून धरा.
(टीप: जर ६ सेकंद जमत नसेल, तर सुरवातीला ४:२:४:२ असे प्रमाण ठेवावे.)
या प्राणायामाचे फायदे:
मानसिक शांतता: हा प्राणायाम मेंदूला शांत करतो, ज्यामुळे राग, चिंता आणि तणाव कमी होतो.
एकाग्रता वाढते: लयीत श्वसन केल्यामुळे मन भरकटणे थांबते आणि कामात लक्ष लागते.
रक्ताभिसरण सुधारते: शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते, ज्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते.
अनिद्रा दूर होते: झोपण्यापूर्वी हा प्राणायाम केल्यास शांत आणि गाढ झोप लागते.
हृदयासाठी फायदेशीर: यामुळे हृदयाचे ठोके नियमित होतात आणि रक्तदाब (BP) नियंत्रणात राहतो.
Web Summary : Savitri Pranayama, a rhythmic breathing technique, reduces stress and anxiety. It involves controlled inhalation, retention, and exhalation in a 2:1:2:1 ratio. Benefits include mental calmness, improved concentration, better blood circulation, sound sleep, and a healthy heart.
Web Summary : सावित्री प्राणायाम, एक लयबद्ध श्वास तकनीक, तनाव और चिंता को कम करता है। इसमें 2:1:2:1 के अनुपात में नियंत्रित श्वास, प्रतिधारण और उच्छ्वास शामिल हैं। मानसिक शांति, बेहतर एकाग्रता, बेहतर रक्त परिसंचरण, गहरी नींद और स्वस्थ हृदय इसके लाभ हैं।