Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सतत थकवा-चिडचिड, गळून गेल्यासारखं वाटतं, ओटीपोटही सुटलं? तुमच्या शरीराला 'या' पदार्थाची गरज आहे

सतत थकवा-चिडचिड, गळून गेल्यासारखं वाटतं, ओटीपोटही सुटलं? तुमच्या शरीराला 'या' पदार्थाची गरज आहे

How To Identify Deficiency Of Minerals And Vitamins In Our Body: आपलं शरीर आपल्याला काही गोष्टी सांगत असतं पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्या नेमक्या कोणत्या ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2024 04:10 PM2024-05-22T16:10:26+5:302024-05-22T16:32:18+5:30

How To Identify Deficiency Of Minerals And Vitamins In Our Body: आपलं शरीर आपल्याला काही गोष्टी सांगत असतं पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्या नेमक्या कोणत्या ते पाहा...

how to identify deficiency of minerals and vitamins in our body, 5 main symptoms of vitamins and minerals deficiency | सतत थकवा-चिडचिड, गळून गेल्यासारखं वाटतं, ओटीपोटही सुटलं? तुमच्या शरीराला 'या' पदार्थाची गरज आहे

सतत थकवा-चिडचिड, गळून गेल्यासारखं वाटतं, ओटीपोटही सुटलं? तुमच्या शरीराला 'या' पदार्थाची गरज आहे

Highlightsशरीर सांगत असलेल्या लक्षणांवरून आपल्या शरीरात कोणत्या घटकाची कमतरता आहे हे ओळखण्याच्या काही टिप्स आहारतज्ज्ञांनी शेअर केल्या आहेत.

सगळेच डॉक्टर नेहमीच असं सांगतात की आपल्याला कोणताच आजार अचानक होत नसतो. किंवा कोणताच आजार एकदम गंभीर स्वरुप घेत नसतो. त्या आजाराची जेव्हा आपल्या शरीरात सुरुवात होऊ लागते, तेव्हा आपलं शरीर आपल्याला सूचना द्यायला सुरुवात करतं. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. एवढंच नाही तर जेव्हा आपल्या शरीरात एखाद्या घटकाची कमतरता निर्माण होते, तेव्हाही आपलं शरीर त्याची लक्षणं आपल्याला दाखवतं. ती लक्षणं नेमकी कोणती आणि कोणत्या लक्षणांवरून आपल्या शरीरात कोणत्या खनिजांची किंवा व्हिटॅमिन्सची कमतरता आहे हे कसं ओळखायचं (how to identify deficiency of minerals and vitamins in our body) याविषयी बघा आहारतज्ज्ञांनी सांगितलेली ही खास माहिती... (5 main symptoms of vitamins and minerals deficiency)

 

आपल्या शरीरात कशाची कमतरता आहे हे कसं ओळखायचं?

शरीर सांगत असलेल्या लक्षणांवरून आपल्या शरीरात कोणत्या घटकाची कमतरता आहे हे ओळखण्याच्या काही टिप्स आहारतज्ज्ञांनी dt.ramitakaur या पेजवर शेअर केल्या आहेत. ती लक्षणं नेमकी कोणती आणि त्यासाठी आहारात कोणते पदार्थ घ्यावेत ते पाहा..

गळणाऱ्या केसांना द्या बायोटीनचा सुपरडोस, ५ पदार्थ खा, मुळं पक्की होऊन केस होतील दाट- लांब

१. नेहमीच अंगदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या शरीरात पोटॅशियमची कमतरता आहे. त्यासाठी केळी, रताळी, पालक, बीट, ॲव्हाकॅडो, नारळपाणी हे पदार्थ नियमितपणे खा.

२. त्वचा कोरडी आणि रखरखीत झाली असे तर ते झिंकच्या कमतरतेमुळे होते. त्यासाठी ओट्स, काजू, भोपळ्याच्या बिया, हरबरे असे पदार्थ खावेत.

 

३. ओटीपोटाचा भाग जास्त सुटला असेल तर तुमच्या शरीरात इस्ट्रोजीन हा हार्मोन अधिक प्रमाणात आहे. तो नियंत्रित ठेवण्यासाठी कोबी, ब्रोकोली, फ्लॉवर, गाजर हे पदार्थ खा.

४. जर पायात गोळे येत असतील ते मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे असू शकते. ती उणीव भरून काढण्यासाठी पालक, काजू, ॲव्हाकॅडो, भोपळ्याच्या बिया खा.

बघा दह्याविषयीचे 'हे' गैरसमज तुम्हालाही आहेत का? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात दही पौष्टिक आहेच, पण... 

५. शरीरात लोहाची कमतरता असेल तर बर्फ खावा वाटतो. असं झालं तर पालक, मनुका असे पदार्थ नियमितपणे खा.

६. हात- पाय थरथर कापल्यासारखे होत असतील तर ते व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे होतं. त्यासाठी पालक, चीज, दूध हे पदार्थ तुमच्या आहारात जास्त प्रमाणात घ्या.. 

 

Web Title: how to identify deficiency of minerals and vitamins in our body, 5 main symptoms of vitamins and minerals deficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.