lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोट बिघडले? करपट ढेकर, गॅसेसचा त्रास? ५ सोपे उपाय, पोटातली गुडगुड होईल कमी

पोट बिघडले? करपट ढेकर, गॅसेसचा त्रास? ५ सोपे उपाय, पोटातली गुडगुड होईल कमी

How to get rid of gas pain fast: 5 natural home remedies पोटाचा त्रास प्रत्येकाला सतावतो, त्यावर ५ उपाय, पोट फुगणे, गुडगुड आवाज येणे होईल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2023 05:51 PM2023-08-06T17:51:33+5:302023-08-06T17:52:29+5:30

How to get rid of gas pain fast: 5 natural home remedies पोटाचा त्रास प्रत्येकाला सतावतो, त्यावर ५ उपाय, पोट फुगणे, गुडगुड आवाज येणे होईल बंद

How to get rid of gas pain fast: 5 natural home remedies | पोट बिघडले? करपट ढेकर, गॅसेसचा त्रास? ५ सोपे उपाय, पोटातली गुडगुड होईल कमी

पोट बिघडले? करपट ढेकर, गॅसेसचा त्रास? ५ सोपे उपाय, पोटातली गुडगुड होईल कमी

अनेकदा जेवल्यानंतर पोट फुगलेले राहते. करपट ढेकर येते, पोटात गॅसेसचा त्रास जाणवू लागतो. असे नेहमी का होते? जर तुम्हाला देखील हा त्रास जाणवत असेल तर, आतड्यांमध्ये काहीतरी गडबड असू शकते. आजकाल लोकं साखरयुक्त, मसालेदार, तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थ जास्त खातात. या सर्व गोष्टींचा पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे वेळीच हे पदार्थ खाणे टाळा, याजागी हेल्दी आहार घ्या.

फॅट टू स्लिमच्या संचालिका व आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा सांगतात, ''जेवल्यानंतर पोटात गडबड, कमी खाल्ल्यानंतर पोट भरलेले वाटणे, करपट ढेकर, मळमळ. यांसारखा त्रास जर तुम्हाला छळत असतील तर, वेळीच आहाराकडे लक्ष द्या. कारण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपण उलट - सुलट पदार्थ खातो, जे आरोग्यासाठी चांगले नाही. ज्याचा आतड्यांवर परिणाम होतो. अशावेळी ५ पदार्थ खा, यामुळे आतडे स्वच्छ होतील, व पोटाला आतून थंडावा मिळेल''(How to get rid of gas pain fast: 5 natural home remedies).

हळद

हळद हे औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. हा पिवळा मसाला आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामधील अँटिऑक्सिडंट्स पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे आहारात हळदीचा समावेश करा, अथवा कोमट पाण्यात हळद घालून प्या.

रोज सकाळी उपाशी पोटी खा खोबऱ्याचे २ तुकडे, उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर - वजनही होईल कमी

ताक

ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे जेवल्यानंतर एक ग्लास ताक पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. ताक प्यायल्याने पचनसंस्था मजबूत होते. यासह बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

आवळा

आवळा हा एक देसी सुपरफूड आहे, जो व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. आवळा अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, ज्यामुळे पचनसंस्था मजबूत होते, यासह पोटासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे नियमित एक आवळा खा.

तूप

तूप खाल्ल्याने पोटाला असंख्य फायदे होतात. तुपामध्ये ब्युटीरिक ऍसिड असल्याने ते पचनसंस्थेसाठी फायदेशीर मानले जाते. हे ऍसिड हानिकारक जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करते. बद्धकोष्ठता किंवा मूळव्याधाचा त्रास होत असेल तर, तूप जरूर खा.

वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफीमध्ये घाला मध, पाहा कॉफी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत

ओवा

पोट खराब झाल्यावर ओवा खाण्याचा सल्ला दिला जातो. ओव्यामध्ये थायमॉल ऑइल असते. जे आतड्यांमधील हानिकारक जीवाणूंशी लढण्यास मदत करतात. जर पचनाच्या निगडीत त्रास असेल तर, ओवा खा. व आहारात याचा समावेश करा.

Web Title: How to get rid of gas pain fast: 5 natural home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.