आजकाल लोक पोटाच्या चरबीमुळे त्रस्त असतात. खाणंपिणं योग्य नसणं, लाईफस्टाईल अनिमयित असणं, ताण-तणाव, हॉर्मोनल इंबेंलेस या कारणामुळे पोट आणि कंबरेच्या भागावर चरबी जमा व्हायला सुरूवात होते. हे फॅट कमी करणं खूपच कठीण असतं. बेली फॅटमध्ये विसरल फॅट्स असतात (How To Reduce Belly Fat At Home In Easy Step).
जे फॅटी लिव्हर, हार्ट आणि पॅनक्रियाजच्या त्रासाचं कारण ठरतात. ज्यामुळे चरबी कमी करणं सहज शक्य होत नाही. आहारतज्ज्ञ नंदिनी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्या एक सर्टिफाईड आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ आहेत. (Homemade Drink To Reduce Belly Fat)
बेली फॅट कमी करणारे ड्रिंक (How To Reduce Belly Fat)
आल्यात एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यात जिंजरॉल असते ज्यामुळे बेली फॅट कमी होण्यास मदत होते. यातील जिंजरॉल अन्न पचवण्यास मदत करते. मेटाबॉलिझ्म बुस्ट होऊन चरबी जाळण्यासही मदत होते. आलं फॅट बर्न करण्यासोबतच गॅस, ब्लोटींगला दूर ठेवते (Ref). दालचिनीत एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. जे एका फॅट कटरप्रमाणे काम करतात. दालचिनी बेली फॅट कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते.
दालचिनी इंसुलिन रेजिस्टेंस कमी करते ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. हळदीतील करक्यूमिन फॅट बर्निंगची प्रोसेस सोपी बनवते. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होते, इम्यूनिटी मजबूत होते, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होते. जिऱ्यातील थायमोक्विनोन पोट आणि कंबरेची चरबी वितळवण्यास मदत करतात. स्वयंपाक करताना तुम्ही जिऱ्याचा वापर वाढवू शकता. ताकात किंवा दह्यात जीरं मिसळून खाऊ शकता.
२ कप पाणी, अर्धा इंच आलं, दालचिनीचा १ छोटा तुकडा, हळद अर्धा इंच, अर्धा चमचा जीरं, हे सर्व पदार्थ घालून पाण्यात उकळवून घ्या, हे ड्रिंक सकाळच्या नाश्त्याच्या आधी प्या किंवा संध्याकाळीसुद्धा पिऊ शकता. बेली फॅट कमी करण्यासाठी हे ड्रिंक फायदेशीर ठरू शकते.