Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चमचाभर ओवा आणि ग्लासभर पाणी, अपचनापासून पोटावर वाढलेल्या चरबीपर्यंत सगळ्यांवर गुणकारी उपाय

चमचाभर ओवा आणि ग्लासभर पाणी, अपचनापासून पोटावर वाढलेल्या चरबीपर्यंत सगळ्यांवर गुणकारी उपाय

Here Is How You Should Consume Ajwain Or Carom Seeds For Weight Loss पोटावर-कंबरेवर वाढलेले फॅट्सही होतील कमी, पचनही सुधारेल-चमचाभर ओव्याचा खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2023 12:47 PM2023-05-08T12:47:29+5:302023-05-08T12:53:32+5:30

Here Is How You Should Consume Ajwain Or Carom Seeds For Weight Loss पोटावर-कंबरेवर वाढलेले फॅट्सही होतील कमी, पचनही सुधारेल-चमचाभर ओव्याचा खास उपाय

Here Is How You Should Consume Ajwain Or Carom Seeds For Weight Loss | चमचाभर ओवा आणि ग्लासभर पाणी, अपचनापासून पोटावर वाढलेल्या चरबीपर्यंत सगळ्यांवर गुणकारी उपाय

चमचाभर ओवा आणि ग्लासभर पाणी, अपचनापासून पोटावर वाढलेल्या चरबीपर्यंत सगळ्यांवर गुणकारी उपाय

भारतीय मसाल्यात असे अनेक पदार्थ आहेत, जे केवळ जेवणाची रंगत वाढवत नाही तर, आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात. ओवा. भारतीय पदार्थांमध्ये हमखास वापरला जाणारा पदार्थ. नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत ओव्याचा विविध पदार्थांमध्ये समावेश असतो. यासह मुखशुद्धी म्हणूनही याचा वापर केला जातो. सध्या लोकांमध्ये वजन वाढीची समस्या वाढत चालली आहे. तेलकट पदार्थ, जंक फूड, स्वीट डिश या पदार्थांमुळे लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत अनेकांना लठ्ठपणाची समस्या छळत आहे. यावर उपाय म्हणून आपण ओव्याचा वापर करू शकता.

वजन कमी करण्यासाठी ओवा हा प्रभावी उपाय मानला जातो. जे आयुर्वेदिक व औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे आहारतज्ञ डॉ. आयुषी यादव सांगतात, ''ओवा हा भारतीय मसाल्यांपैकी एक आहे. अपचन आणि पोट फुगणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी, ओवा चघळणे हा उत्तम पर्याय मानला जातो. ओव्याचे पाणी प्यायल्याने पोट आणि कंबरेची चरबी कमी होऊ शकते. व अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते''(Here Is How You Should Consume Ajwain Or Carom Seeds For Weight Loss).

ओव्याच्या पाण्याचा वापर

1. जर आपण रोज सकाळी काहीही न खाता ओव्याचे पाणी प्यायले तर, वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. यासह पोटाची चरबीही कमी होते.

मुळव्याधाचा त्रास आहे? तज्ज्ञ सांगतात, केळी खा! पण नेमकी कधी-किती खायची?

2. यासाठी सर्वप्रथम, पाणी गरम करण्यासाठी ठेवा, त्यात एक चमचा ओवा मिसळून पाण्याला उकळी येऊ द्या. व हे पाणी रोज सकाळी प्या. जर तुम्हाला उत्तम रिझल्ट हवं असल्यास आपण रोजच्या आहारात देखील ओव्याचा समावेश करू शकता.

3. दुसरी पद्धत - एका ग्लास पाण्यात ओवा रात्रभर भिजत ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी ओवा व त्याचे पाणी प्या.

वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मध घालून पिता? तब्येत सुधारेल की बिघडेल, खरं काय..

4. जर आपण रात्री ओवा भिजत ठेवण्यासाठी विसरला असाल तर, सकाळी एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा, त्यात एक चमचा ओवा व ५ ते ६ तुळशीची पाने घालून पाण्याला उकळी येऊ द्या, शेवटी, गॅस बंद करा आणि कोमट झाल्यावर प्या.

Web Title: Here Is How You Should Consume Ajwain Or Carom Seeds For Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.