>आरोग्य > दुखणीखुपणी > Heart attack Symptoms : अलर्ट! फक्त छातीत दुखणं नाही तर 'ही' ३ लक्षणं आहेत हार्ट अटॅकचे संकेत; जाणून घ्या बचावाचे उपाय

Heart attack Symptoms : अलर्ट! फक्त छातीत दुखणं नाही तर 'ही' ३ लक्षणं आहेत हार्ट अटॅकचे संकेत; जाणून घ्या बचावाचे उपाय

Heart attack Symptoms : हार्ट अटॅकची सुरूवातीची लक्षणं जाणून घेणं फार महत्वाचं आहे. जेणेकरून अशी स्थिती उद्भवल्यास तुम्ही त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधाल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 12:02 PM2021-09-24T12:02:30+5:302021-09-24T14:05:12+5:30

Heart attack Symptoms : हार्ट अटॅकची सुरूवातीची लक्षणं जाणून घेणं फार महत्वाचं आहे. जेणेकरून अशी स्थिती उद्भवल्यास तुम्ही त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधाल.

Heart attack Symptoms : World heart day 2021 heart attack symptoms and tips to prevent | Heart attack Symptoms : अलर्ट! फक्त छातीत दुखणं नाही तर 'ही' ३ लक्षणं आहेत हार्ट अटॅकचे संकेत; जाणून घ्या बचावाचे उपाय

Heart attack Symptoms : अलर्ट! फक्त छातीत दुखणं नाही तर 'ही' ३ लक्षणं आहेत हार्ट अटॅकचे संकेत; जाणून घ्या बचावाचे उपाय

Next
Highlightsजेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये हृदयाच्या आजारांची तीव्रता स्थिती वाढू लागते, तेव्हा त्याला कमी भूक लागते, वारंवार लघवी येते आणि हृदय देखील खूप वेगाने धडधडू लागते.

आपल्या आजूबाजूला अनेक लोक वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेले पाहायला मिळतात. फरक फक्त इतकाच आहे की काही लोक गंभीर आजारांचे शिकार आहे तर काहींना सामान्य समस्या उद्भवत आहेत. सध्याच्या  धावपळीच्या जीवनात फक्त पुरूषांमध्येच नाही तर मोठ्या संख्येनं महिलांमध्येही हृदयाचे आजार उद्भवताना दिसतात. दरवर्षी २९ सप्टेंबरला जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. 

जगभरातील लोकांना हृदयाच्या आजारांबाबत जागरूक करणं हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे.  हार्ट अटॅकची सुरूवातीची लक्षणं जाणून घेणं फार महत्वाचं आहे. जेणेकरून अशी स्थिती उद्भवल्यास तुम्ही त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधाल. हृदय रोग विशेषज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ मधुर जैन यांनी अमर उजालाशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

श्वास घ्यायला त्रास होणं

आपल्या सर्वांना माहित आहे की छातीत दुखणे आणि दम लागणे ही हृदयाच्या विकाराच्या झटक्याची सर्वात सामान्य लक्षणे आहेत. परंतु जर तुम्हाला काही पायऱ्या चढताना थकल्यासारखं वाटत असेल आणि  श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हे हार्ट अटॅकचे लक्षण  असू शकते.

 कपडे धुताना तुम्हीसुद्धा 'ही'च चूक करताय? थांबा, समोर आला डिटर्जेंट कंपनीचा आर्श्चयकारक रिपोर्ट

पाठीच्या वरच्या भागात वेदना

जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा रुग्णाला पाठीच्या वरच्या भागात वेदना होतात. परंतु जर यासह तुम्हाला छातीत कोणत्याही प्रकारची अस्वस्थता येत असेल, जडपणा जाणवत असेल, मळमळ किंवा उलटीसारखे वाटत असेल तर हे देखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते.

सावधान! 'असा' भात खाल्ल्यानं वाढतोय जीवघेण्या कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांनी सांगितली भात शिजवण्याची योग्य पद्धत

भूक कमी होणं, सूज येणं

जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये हृदयाच्या आजारांची तीव्रता स्थिती वाढू लागते, तेव्हा त्याला कमी भूक लागते, वारंवार लघवी येते आणि हृदय देखील खूप वेगाने धडधडू लागते. कधीकधी आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो, परंतु ती हृदय विकाराच्या झटक्याची चिन्हं असू शकतात. त्यामुळे त्यांची काळजी घेतली पाहिजे. 

अशी घ्या काळजी

हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी, तेळकट, उच्च कॅलरीयुक्त पदार्थ खाणे टाळावे.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी अक्रोड, बदाम, फ्लेक्ससीड, सोयाबीन आणि सॅल्मन मासे खाऊ शकता.

नियमित व्यायाम केला पाहिजे.

समस्या असल्यास, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका.
 

Web Title: Heart attack Symptoms : World heart day 2021 heart attack symptoms and tips to prevent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Healthy Desi Ghee Benefits : कोण म्हणतं तूप खाल्ल्यानं वजन वाढतं? चांगल्या तब्येतीसाठी पांढरं तूप खायचं की पिवळं, वाचा फायदे - Marathi News | Healthy Desi Ghee Benefits : Yellow vs white which variety of desi ghee is healthier and why | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढरं की पिवळं? चांगल्या तब्येतीसाठी कोणतं तूप खायचं? वाचा गुणकारी फायदे

Healthy Desi Ghee Benefits : काहीजणांना वाटतं तूप खाल्ल्यानं वजन वाढतं. म्हणून ते तूप खाणं टाळतात. गावठी तूप देखील दोन प्रकारचं आहे. एक पिवळं तूप आणि दुसरे पांढरं तूप. पांढरं तूप म्हशीच्या दुधापासून तर पिवळे तूप गाईच्या दुधापासून बनवले जाते. ...

खा चमचाभर गुलकंद, तबियत खुश! उत्तम गुलकंद करण्याची कृती, शुद्ध गुलकंदाचे फायदे खूप - Marathi News | Eat a spoonful of gulkand, good health! The best way to make a lot of sweetmeats is to use them | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Recipe: how to make gulkand at home, cooking tips, benefits for health

Recipe: how to make gulkand- गावरान गुलाबांचा (rose) मस्त गुलकंद.. रोज एक चमचा खा आणि मिळणारे भन्नाट फायदे (benefits of eating gulkand)स्वत:च अनुभवा..  ...

करीना कपूर म्हणतेय, फिट व्हायचं तर सूर्यनमस्कार घाला! करीनाचा फिटनेस मंत्र, ना जिम ना रन - Marathi News | Fitness: Bollywood actress Kareena Kapoor Khan is telling the importance of suryanamaskar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करीना कपूर म्हणतेय, फिट व्हायचं तर सूर्यनमस्कार घाला! करीनाचा फिटनेस मंत्र, ना जिम ना रन

Yoga by Kareena Kapoor करीना कपूरचा फिटनेस फंडा अगदी सोपा आहे.... प्रत्येकीला अगदी सहज आणि घरच्याघरी जमण्यासारखा, करून तर बघा..  ...

आवळे ना उकडायचे, ना शिजवायचे; गॅस न वापरता करा खुटखुटीत आंबट गोड आवळा कॅण्डी! - Marathi News | Food, Recipe: How to make aamla candy at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आवळे ना उकडायचे, ना शिजवायचे; गॅस न वापरता करा खुटखुटीत आंबट गोड आवळा कॅण्डी!

Aamla candy recipe without using gas: आवळा कॅण्डी बनविण्याची सोपी रेसिपी... गॅस न वापरताच तयार करा बाजारात मिळते तशी खुटखुटीत, रसरशीत आंबट- गोड आवळा कॅण्डी. ...

weight loss Tips : वजन कमी करायचं म्हणून रात्रीचं जेवण सोडलं? हेल्दी स्लिम व्हा, 4 चुका टाळा... - Marathi News | Weight Loss Tips: Did you skip dinner to lose weight? Be Healthy Slim, Avoid 4 Mistakes ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :weight loss Tips : वजन कमी करायचं म्हणून रात्रीचं जेवण सोडलं? हेल्दी स्लिम व्हा, 4 चुका टाळा...

वजन कमी करायचं असेल तर आहाराबाबत काही गोष्टी आवर्जून माहित असायला हव्यात.. ...

Housework lead to sharper memory : रोज घरकाम केल्यानं स्मरणशक्ती राहते तल्लख; रिसर्चमधून खुलासा - Marathi News | Housework lead to sharper memory : Doing daily housework keeps the memory brilliant; Revealed from research | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज घरकाम केल्यानं स्मरणशक्ती राहते तल्लख; रिसर्चमधून खुलासा

Housework lead to sharper memory : एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, घरकाम करणार्‍या व्यक्तींची स्मरणशक्ती चांगली राहते. ...