Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Cancer Research : सावधान! 'असा' भात खाल्ल्यानं वाढतोय जीवघेण्या कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांनी सांगितली भात शिजवण्याची योग्य पद्धत

Cancer Research : सावधान! 'असा' भात खाल्ल्यानं वाढतोय जीवघेण्या कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांनी सांगितली भात शिजवण्याची योग्य पद्धत

Cancer Research : जर तुम्ही तांदूळ व्यवस्थित शिजवल्याशिवाय खात असाल तर ते खूप हानिकारक असू शकते. काही प्रकरणांमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 01:23 PM2021-09-19T13:23:20+5:302021-09-19T13:42:04+5:30

Cancer Research : जर तुम्ही तांदूळ व्यवस्थित शिजवल्याशिवाय खात असाल तर ते खूप हानिकारक असू शकते. काही प्रकरणांमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते. 

cancer Research : Can rice cause cancer know what study says | Cancer Research : सावधान! 'असा' भात खाल्ल्यानं वाढतोय जीवघेण्या कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांनी सांगितली भात शिजवण्याची योग्य पद्धत

Cancer Research : सावधान! 'असा' भात खाल्ल्यानं वाढतोय जीवघेण्या कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांनी सांगितली भात शिजवण्याची योग्य पद्धत

Highlightsअभ्यासादरम्यान, शास्त्रज्ञांना आढळले की ज्या प्रकारे शेतात पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी खते आणि रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे, त्यामुळे आरोग्याला मोठी हानी होऊ शकते. शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की तांदूळ शरीरात कॅन्सरच्या समस्यांना उत्तेजन देणाऱ्या कार्सिनोजेन्सचे कारण असू शकतो. कार्सिनोजेन हा एक असा घटक आहे ज्यामुळे माणसांमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते.

आपल्या सगळ्यांच्याच घरी भाताचं एक वेगळं महत्व आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भारतात  प्रत्येक घरात भात खाल्ला जातो.  भात कार्बोहायड्रेड्सचा मुख्य स्त्रोत मानला जातो. शरीराला उर्जा मिळण्यसाठी भात हा उत्तम आहार आहे. अनेकांना जेवणात भात खाल्ल्याशिवाय समाधान मिळत नाही. भात, खिचडीचा कुकर लावला की जास्त काही बनवायची गरज लागत नाही म्हणून सर्वाधिक महिला या  जेवणासाठी डाळ भात किंवा मसालेभात यांसारखे पदार्थ करतात.

जास्त प्रमाणात भात खाल्ल्यानं डायबिटीससह लठ्ठपणाचा धोका वाढतो म्हणून या आजारांनी ग्रस्त असलेल्यांना भात कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. हे तुम्ही ऐकून असाल पण भातामुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्याा रोगाचा धोका वाढू शकतो हे वाचून तुम्हीही अवाक् व्हाल. तज्ज्ञांनी केलेल्या  दाव्यानुसार तांदळाचं सेवन कॅन्सरचा धोका वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. 

 'ही' आहेत कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं; वेळीच लक्ष दिल्यास टळेल भविष्यात उद्भवणारा मोठा धोका

इंग्लंडमधील क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्टच्या संशोधकांनी त्यांच्या अलीकडील संशोधनात सांगितले आहे की जर तुम्ही तांदूळ व्यवस्थित शिजवल्याशिवाय खात असाल तर ते खूप हानिकारक असू शकते. काही प्रकरणांमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते. 

तांदळामुळे वाढतो कॅन्सरचा धोका

अभ्यासादरम्यान, शास्त्रज्ञांना आढळले की ज्या प्रकारे शेतात पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी खते आणि रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे, त्यामुळे आरोग्याला मोठी हानी होऊ शकते. औद्योगिक विषारी पदार्थ आणि कीटकनाशके मातीला बरीच विषारी बनवत आहेत. अशा परिस्थितीत, त्यातून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये त्याचे काही भाग असू शकतात. म्हणून तांदूळ नेहमी धुतल्यानंतर पूर्णपणे शिजवल्यानंतर खावा.

आता कॅन्सरमुळे वाढणारा मृत्यूचा धोका १४ टक्क्यांनी कमी होणार; तज्ज्ञांनी सांगितले २ प्रभावी उपाय

तांदळातील अर्सेनिक धोकादायक ठरतं

अभ्यासादरम्यान, शास्त्रज्ञांना आढळले की आर्सेनिक रसायनांचा वापर अनेक प्रकारचे औद्योगिक कीटकनाशके तयार करण्यासाठी केला जातो. ही रसायने बराच काळ जमिनीत राहतात, त्याचा परिणाम त्या पिकांवरही होऊ शकतो. जर आपण या रसायनांच्या दीर्घकाळ अन्न किंवा पाण्याद्वारे संपर्कात राहिलो तर यामुळे आर्सेनिकमुळे विषबाधा होऊ शकते.

यामुळे उलट्या, ओटीपोटात दुखणे, अतिसार यांपासून कॅन्सरपर्यंत गंभीर आजार पसरू शकतात.  अभ्यासानुसार, तांदळामध्ये आर्सेनिकचे प्रमाण जास्त असू शकते, त्यामुळे जर ते योग्य प्रकारे शिजवले नाही तर भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

याआधीही, तांदळाचे आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी केलेल्या अभ्यासात शास्त्रज्ञांनी लोकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. दुसऱ्या अभ्यासात, शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की तांदूळ शरीरात कॅन्सरच्या समस्यांना उत्तेजन देणाऱ्या कार्सिनोजेन्सचे कारण असू शकतो. कार्सिनोजेन हा एक असा घटक आहे ज्यामुळे माणसांमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. कार्सिनोजेन्स नैसर्गिक असू शकतात आणि मुख्यत्वे साठवलेल्या धान्यांमध्ये किंवा तंबाखूच्या धुरामध्ये आढळतात.

महिलांमध्ये स्तनांच्या कॅन्सरचा धोका

९० च्या दशकात केलेल्या अभ्यासादरम्यान शास्त्रज्ञांना आढळले की ज्या स्त्रिया जास्त तांदूळ वापरतात त्यांच्यात स्तन आणि इतर प्रकारच्या कॅन्सरचा धोका जास्त असतो. सुमारे 9,400 सहभागींच्या अभ्यासात, शास्त्रज्ञांना आढळले की तांदळाचे सेवन आणि इतर अनेक घटकांसह स्तन आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरचे प्रमाणात वाढू शकते. भात व्यवस्थित शिजवल्याशिवाय खाल्ल्यास धोका वाढतो.

तांदूळ शिजवण्याची योग्य पद्धत कोणती? 

क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्ट अभ्यासातील शास्त्रज्ञ म्हणतात की कॅन्सरचा धोका पाहता भात खाणे थांबवण्याची गरज नाही. तांदळामध्ये असलेल्या आर्सेनिकपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वयंपाक करण्यापूर्वी भात काहीवेळ  पाण्यात भिजवा आणि नंतर ते पाणी फेकून द्या. या प्रक्रियेचे पालन केल्याने त्यात उपस्थित असलेल्या विषांचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत कमी होते. यानंतर, भात व्यवस्थित शिजवल्यानंतर खा, असे केल्याने हा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

Web Title: cancer Research : Can rice cause cancer know what study says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.