lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > रिसर्च : आता कॅन्सरमुळे वाढणारा मृत्यूचा धोका १४ टक्क्यांनी कमी होणार; तज्ज्ञांनी सांगितले २ प्रभावी उपाय

रिसर्च : आता कॅन्सरमुळे वाढणारा मृत्यूचा धोका १४ टक्क्यांनी कमी होणार; तज्ज्ञांनी सांगितले २ प्रभावी उपाय

Cancer : खर्च वाढेल, तात्पुरत्या उपचारांनी आपण बरं होऊ अस समजून अनेकजण व्यवस्थित उपचार घेणं टाळतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 02:52 PM2021-08-31T14:52:07+5:302021-08-31T15:02:34+5:30

Cancer : खर्च वाढेल, तात्पुरत्या उपचारांनी आपण बरं होऊ अस समजून अनेकजण व्यवस्थित उपचार घेणं टाळतात. 

Cancer : How to prevent cancer aerobic and strength training exercises for cancer patients | रिसर्च : आता कॅन्सरमुळे वाढणारा मृत्यूचा धोका १४ टक्क्यांनी कमी होणार; तज्ज्ञांनी सांगितले २ प्रभावी उपाय

रिसर्च : आता कॅन्सरमुळे वाढणारा मृत्यूचा धोका १४ टक्क्यांनी कमी होणार; तज्ज्ञांनी सांगितले २ प्रभावी उपाय

Highlightsमेयो क्लिनिकच्या अहवालानुसार, कॅन्सर हा असामान्य पेशींच्या वाढीमुळे होणारा एक गंभीर आजार आहे. कॅन्सर शरीराच्या एका ठिकाणी लहान ट्यूमर म्हणून सुरू होतो, जो हळूहळू सामान्य पेशींमध्ये वाढतो.

आजही अनेक बायका स्वतःला उद्भवत असलेल्या समस्यांना साध्या समजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजारांमध्ये वाढ होत आहे. खर्च वाढेल, तात्पुरत्या उपचारांनी आपण बरं होऊ अस समजून अनेकजण व्यवस्थित उपचार घेणं टाळतात. कोरोना संक्रमणानं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम केला आहे.  आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या एका वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये उल्लेखनीय वाढ झालेली पाहायला मिळाली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार माहामारीदरम्यान इतर आजारांच्या रुग्णांवर लक्ष न दिल्यानं कॅन्सरच्या रुग्णांमध्येही वाढ झाली. 

डॉक्टर म्हणतात, ''कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे वेळेवर निदान आणि उपचार आवश्यक आहे. कोरोना महामारीने कॅन्सरच्या रुग्णांसाठी मोठी समस्या निर्माण केली आहे. उपचारांना विलंब झाल्यास स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.'' याबाबत नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात, एक पर्याय म्हणून, शास्त्रज्ञांनी दोन व्यायाम प्रकारांबद्दल सांगितले आहे ज्यांच्या सरावाने कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. 

कॅन्सरचा धोका लक्षात घ्या

मेयो क्लिनिकच्या अहवालानुसार, कॅन्सर हा असामान्य पेशींच्या वाढीमुळे होणारा एक गंभीर आजार आहे. कॅन्सर शरीराच्या एका ठिकाणी लहान ट्यूमर म्हणून सुरू होतो, जो हळूहळू सामान्य पेशींमध्ये वाढतो. कॅन्सरचा आजार जसजसा वाढत जातो तसतसे त्याचे उपचार खूप कठीण होतात. प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरचे नाव सामान्यतः ज्या पेशींमध्ये सुरू होते त्यावरून ठेवले जाते. 

आकडेवारीनुसार, हा रोग जगातील मृत्यूंंचे दुसरे प्रमुख कारण आहे. अलिकडच्या काही वर्षांत कॅन्सरच्या रूग्णांच्या जगण्याच्या दरात लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे  तपासणी, उपचार आणि प्रतिबंध यात प्रगती झाली आहे. संशोधकांचा असा विश्वास आहे की दोन प्रकारचे व्यायाम केल्यानं कॅन्सरच्या रुग्णांमध्ये मृत्यूची तीव्रता आणि जोखीम कमी करता येऊ शकते. 

व्यायामानं कमी होतो कॅन्सरचा धोका

साओ पाउलोमधील यूनिवर्सिटीतील डिपार्टमेंट ऑफ प्रिवेंटिव मेडिसिनचे प्राध्यापक डॉ लिएंड्रो रेज़ेंडे यांनी सांगितलं की, शारीरिक हालचालींमुळे अनेक प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. याबद्दल  अधिक तपशिलात जाणून घेण्यासाठी, डॉ रेझेन्डे आणि त्यांच्या टीमने १२ अभ्यासांचे पुन्हा परिक्षण केले. यात 1.3 दशलक्ष लोकांचा डेटा तपासला गेला. शास्त्रज्ञांना आढळले की अनेक प्रकारचे व्यायाम कॅन्सरमुळे वाढणारा मृत्यूचा धोका १४ टक्क्यांपर्यंत कमी करू शकतात.

स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि एरोबिक व्यायाम कॅन्सरचा धोका २८ टक्क्यांनी कमी करते.   2016 च्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांना असे आढळून आले की जे लोक दररोज व्यायाम करतात त्यांना फुफ्फुस, मूत्रपिंड, कोलन, गुदाशय, मूत्राशय आणि स्तन कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो.

1) एरोबिक्स व्यायाम

तज्ज्ञांच्यामते एरोबिक्स व्यायाम शरीरातील ऑक्सिजन सर्व अवयवांपर्यंत पोहोचवण्यास फायदेशीर ठरतो. एरोबिक व्यायामामुळे केवळ वजन नियंत्रणात राहतं. या सर्व गोष्टींशिवाय, एरोबिक व्यायामांमुळे शरीराची ऊर्जा वाढते. या व्यायामांमुळे एंडोर्फिन हार्मोनही वाढतो, ज्यामुळे रुग्णांचा आत्मविश्वासही वाढतो. यामुळेच कॅन्सरच्या रुग्णांना एरोबिक व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

2) स्ट्रेंथ ट्रेनिंगचे फायदे

अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनचे सल्लागार यांनी सगळ्यांनाच आढवड्यातून २ ते ३ वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंगचा सल्ला  दिला आहे. मासपेशी टोन होण्यासह हाडं चांगली राहण्यासाठी हा व्यायामप्रकार फायदेशीर ठरतो. यामुळे रोगप्रतिकराकशक्ती चांगली झाल्यानं कॅन्सरच्या पेशी वाढू शकत नाहीत. लिंम्फॅटिक सिस्टम शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत करते. 

Web Title: Cancer : How to prevent cancer aerobic and strength training exercises for cancer patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.