Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Cancer symptoms : 'ही' आहेत कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं; वेळीच लक्ष दिल्यास टळेल भविष्यात उद्भवणारा मोठा धोका

Cancer symptoms : 'ही' आहेत कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं; वेळीच लक्ष दिल्यास टळेल भविष्यात उद्भवणारा मोठा धोका

Cancer symptoms : जर तुमची त्वचा नेहमी खाजवत असेल तर ते कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. उदाहरणार्थ, नाकपुडीत खाज सुटणे आणि गुप्तांगात खाज येणे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 03:41 PM2021-09-14T15:41:21+5:302021-09-14T15:53:47+5:30

Cancer symptoms : जर तुमची त्वचा नेहमी खाजवत असेल तर ते कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. उदाहरणार्थ, नाकपुडीत खाज सुटणे आणि गुप्तांगात खाज येणे.

Cancer symptoms : Health tips early signs of cancer disease cancer symptoms | Cancer symptoms : 'ही' आहेत कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं; वेळीच लक्ष दिल्यास टळेल भविष्यात उद्भवणारा मोठा धोका

Cancer symptoms : 'ही' आहेत कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं; वेळीच लक्ष दिल्यास टळेल भविष्यात उद्भवणारा मोठा धोका

Highlightsआपल्या सर्वांना माहीत आहे की कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत आणि जर त्यांना वेळेत त्यांच्याबद्दल माहिती मिळाली तर  उपचार करून रुग्ण पुन्हा निरोगी होऊ शकतो.

दैनंदिन जीवन जगत असताना जीवनशैलीतील बदलांमुळे गंभीर आजारांची लागण होत आहे. पण असे अनेक रोग आहेत जे आपल्या शरीरावर हळूहळू आक्रमण करत राहतात, पण हे लवकर समजण्यात येत नाही. अशा स्थितीत, हे महत्वाचे आहे की या समस्या वेळेत ओळखल्या गेल्या पाहिजेत, त्यांची लक्षणे ओळखली पाहिजेत आणि त्यांच्याकडे लक्ष दिल्यानंतर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधला पाहिजे. जेणेकरून डॉक्टर तुम्हाला औषधांच्या मदतीने पुन्हा निरोगी बनवू शकतील. अनेक घरात महिला  त्रास अंगावर काढतात. त्यामुळे आजाराची तीव्रता वाढत जाते. 

आपल्या सर्वांना माहीत आहे की कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत आणि जर त्यांना वेळेत त्यांच्याबद्दल माहिती मिळाली तर  उपचार करून रुग्ण पुन्हा निरोगी होऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल सांगणार आहोत. गॅस्ट्रोइंटेस्टायनल सर्जन डॉ. विजयंत कुमार सचान यांनी अमर उजालाशी बोलताना या लक्षणांबाबत माहिती  दिली आहे. 

त्वचेवर खाज येणं

जर तुमची त्वचा नेहमी खाजवत असेल तर ते कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. उदाहरणार्थ, नाकपुडीत खाज सुटणे आणि गुप्तांगात खाज येणे. म्हणून, प्रमाणाबाहेर त्वचेवर खाज सुटण्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे हा एक चांगला पर्याय आहे.

पोटाचे विकार

जर तुमचे पोट नेहमी अस्वस्थ असेल तर तुम्हाला सतर्क राहणे आवश्यक आहे कारण ते कोलन कॅन्सरचे लक्षण असू शकते. पातळ किंवा कठोर मल बाहेर येत असेल किंवा वारंवार शौचातून रक्त बाहेर येत असेल तर हे कॅन्सरचे लक्षण असू शकते. 

वजन कमी होणं

जेव्हा एखाद्याला पोटाचा कॅन्सर असतो तेव्हा त्या व्यक्तीचे वजन कमी होऊ शकते. एवढेच नाही, जर तुम्हाला अधिक खाण्याची इच्छा असते, पण खाऊ शकत नाहीत. मासांहार करण्याची इच्छा होत नाही. यासारख्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडल्या तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

घश्यात वेदना होणं

जर एखाद्या व्यक्तीला घशात बराच काळ दुखत असेल तर ही लक्षणे स्वरयंत्राच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात. जर  आवाज बदलणे, खोकताना तीव्रतेनं वेदना होणं. श्वास घेण्यास अडचण यासारख्या समस्या असतील. तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. 

Web Title: Cancer symptoms : Health tips early signs of cancer disease cancer symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.